"फाशी सारख्या उपायांनी बलात्कार थांबणार नाहीत.उलट गुन्हेगारांचा पीडितेला संपवण्याकडे कल राहील." आठवतं का काही? निर्भया केस वर नेहमीप्रमाणे आपण एक समिती नेमली होती.त्या न्या.J.S.वर्मा समितीचे हे बोल आहेत.निर्भया वेळीही आपला संताप अस्मान फाडत होता.आज हाथरसवेळी तर विचारूच नका.#म 1/n
अधिक कठोर आणि जास्त मुदतीच्या शिक्षेची तरतूद हवी अस वर्मा यांचं मत.पण त्याविषयी सुद्धा ते साशंक होते.कारण,इतिहासात त्याने फार काही फरक पडलेला दिसला नाही. दिल्ली घटनेनंतर जनक्षोभ इतका तीव्र होता की लोकांनी आठेक हजार सूचनावजा उपाय सुचवले होते..पण त्यातही आत्ता सारख तर्क आणि 2/n
वस्तुनिष्ठ विचार न्हवता. सध्या असणारे कायदे हे सर्वोत्तम आहेत.पण त्याची अंमलबजावणी विश्वासार्ह आणि कार्यक्षम यंत्रणेकडून व्हायला हवी. हे एक मत वर्मा यांनी मांडले.ते किती योग्य मत होतं ते सध्या पोलीस,न्याय, कायदे यंत्रणा याद्वारे जो खेळ हाथरसमध्ये सुरुय त्यातून कळेल. 3/n
कार्यक्षमता आणि विश्वासार्हता या गोष्टी अतीव महत्वाच्या आहेत कारण,कोणतीही समस्या उग्र रूप धारण करण्याआधी त्यास अटकाव करण्यास या गोष्टी मस्ट आहेत. पण आपल्या समाजात नेमका त्याचाच अभाव असल्याने निर्भया,कोपर्डी आता हाथरस घडले.अजून किती केसेस अंधारातच राहिल्या असतील कोणास ठाऊक. 4/n
राज्य यंत्रणा प्रत्येक सत्ताधारी बटीक म्हणून वापरतो त्यामुळे व्यवस्थेत एक निलाजरेपणा येतो. पोलीस यंत्रणा हे त्याचे उत्तम उदाहरण.वास्तविक 20-25 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सात सुधारणा सुचविल्या होत्या त्यास आपण हात देखील लावला नाही तीच गत वेगवेगळ्या सुधारणा अहवालांची आहे.5/n
.त्यावर धूळ बसून आता तप लोटला..त्यामुळे समाज अनिश्चिततेच्या खाईत ढकलला गेला..कारण समाजास निश्चित न्यायस्थळी पोहचवून न्याय वागणूक मिळण्याची शाश्वती ही पोलिसांच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यावर अवलंबून असते. यासाठी पोलीस यंत्रणेत आता सुधारणा हवीच. ती काळाची गरज मानायला हवी.6/n
न्यायव्यवस्थेतील विलंब आणि त्याचा दर्जा याविषयी 2013 साली वर्मानी चिंता व्यक्त केली होती..त्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणे हा विषय होता..तो ही आपण सोडवला नाही. निर्भया वातावरण एवढं तापूनही जलद न्याय द्यायला आपल्याला सात वर्षे लागले. न्यायव्यवस्थेतील राज्यसंस्थेचा हस्तक्षेप7/n
हाही सध्या गहन प्रश्न आहे..त्याबद्दल सामान्यजन सोडा तज्ञ आणि सुज्ञ ही शांत आहेत.हे जिवंतपणाची लक्षणं असणं शक्य नाही. अलीकडे बऱ्याच गुन्ह्यात बाल गुन्हेगार सापडू लागलेत. पुढे ते वयाची ढाल करून शिक्षेत सूट मिळवतात.यावर गुन्ह्याची तीव्रता/स्वरूप हा निकष हवा की वय हे ठरवावं लागेल.8/n
वरच्या या सगळ्या गोष्टी एक समाज घटक म्हणून आपण विचारात घेऊन त्यासम वागणं ठेवलं पाहिजे..कारण, समाज आणि व्यवस्था या माणसांच्याच बनल्या बनवल्या गेलेल्या यंत्रणा आहेत..माणूस म्हणून आपण बदललो तर बदल निश्चित घडेल ही आशा आहे. n/n
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
