परवा गिरीश कुबेर म्हणले तसं.. या देशात अत्याचारांची दखल घेण्यासाठी काही अटींची पूर्तता व्हावी लागते. त्या अटी पूर्ण केल्यासच सदर घटनेची दखल घेऊन व्यवस्था सामाजिक आणि व्यवस्थात्मक दोन्ही आघाड्यावर तुमच्यावर परत अत्याचार करण्यास तयार होते. हे कटू असलं तरी सत्य आहे. #म 1/n
अत्याचारीत व्यक्ती स्त्री की पुरुष,लैंगिक आणि स्त्री अत्याचार असल्यास किती जण,वय,जात ,तीव्रता हे सगळं सनसनाटी निर्माण करण्याइतपत भयाण हवं. महत्वाचे म्हणजे गुन्ह्याचे स्थळ शहरी/ग्रामीण यावरून आपण ठरवतो की गुन्ह्याची दखल (न्याय न्हवे) घ्यायची की नाही ते.युगानुयुगे हेच सुरुय.2/n
निर्भया आणि हाथरस या दोन्हीत समान धागे आहेत.दोन्ही ठिकाणी पीडित मेल्यानंतर समाज जागा झाला.तावातावाने दंगा करू लागला. निर्भयातून आपला समाज काहीच शिकला नाही..हे हाथरस ने सिद्ध केलं असं म्हणण्यास वाव आहे. कारण,मूळ विषय बाजूला पडून आता आपण राजकीय चर्चा आणि हेवेदावे यात रंगलोय.3/n
नेहमीप्रमाणे आठेक दिवसात वातावरणात शिथिलता येईल तो थंडावा पुढच्या पीडितेला वारसा म्हणून दिला जाईल. पुढे हीच आपली परंपरा बनेल. बनेल कसली बनलीयच.फक्त आपण त्याकडे डोळेझाक करून संतापाचा आव आणतोय. हे माझं बोलणं कटू आणि आत्मक्लेशी असलं तरी वस्तूस्तिथी आहे ही. भिडायला हवं तिला. 4/n
'मायावती राजकारण करतायत-आठवले' आणि 'राहुल न्यायासाठी नाही राजकारणासाठी हाथरसला चाललेत- इराणी बाई' ही वाक्ये आपल्याला वेळेचं गांभीर्य कस नाही हेच सिद्ध करतात. वास्तविक हाथरस पिडीता पंधरा दिवस मृत्यूशी झुंजत होती तेंव्हा आपण काय करत होतो? हा सवाल मन जाळतोय माझं..5/n
ती या जगातून गेल्यानंतर आपण संधीसाधू डोमकावळे मिळेल त्या मार्गाने आपलीच लक्तरे वेशीवर टांगली..यास काय म्हणायचे? परिस्थिती इतकी रसातळाला गेलीय की आपण आपल्या व्यवस्थेवर तसूभरही विश्वास दाखवू शकत नाही..हे अपयश कोणाचं? इथं लिंग ,जात, धर्म हे विषय चव्हाट्यावर आलेत.. 6/n
याची सुरवात आपणच 'गर्व से कहो हम..' म्हणत केली ना? माझा धर्म आणि जात या खाजगी बाबी आहेत त्या इतर खाजगी बाबी सारख्या गुप्त हव्यात किंवा स्वतःपुरत्या मर्यादित हव्यात. हा साधा नियम आपण काल पाळला नाही..आज व्यवस्था तीच भाषा बोलत असेल तर आपण कोणत्या तोंडाने तिला विरोध करणार? 7/n
माणसाला माणूस म्हणून पहायला हवं.तरच हे सगळं सुरळीत होण्याची आशा आपण बाळगू शकू.अन्यथा हे असंच सुरू राहील..फरक असेल तो आज लोक पीडित आहेत उद्या आपण स्वतः असू. n/n
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
