Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Apr 4, 2021, 11 tweets

सर्वप्रथम, ‘छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते’ हे त्रिवार सत्य मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

या वेळेला तर तुम्ही कहरंच केलात. रायगडाच्या वाताहतीसाठी पेशव्यांसोबत पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना पण दोषी ठरवलत🤦🏻‍♂️

पुन्हा एकदा सत्य काय आहे ते बघूयात.

१/११

१७७३, १७८६-८७, १७९६-९७ या साली रायगडावर उत्सव असो, सिंहासनासाठी तख्त पुजारी नेमणे असो, सिंहासनाची डागडूची असो, नगारखान्याची व्यवस्था असो -

हे सगळं असून पण तुम्ही पुण्यश्लोक शाहू महाराज आणि पेशव्यांना रायगडाच्या वाताहती साठी कसं दोषी ठरवता, हे तुम्हालाच ठाऊक🤷🏻‍♂️

२/११

एवढंच नाही तर, जेम्स डगलस ने ‘Book of Bombay’ मधे ‘दुसऱ्या बाजीरावाची बायको १८१८ मधे रायगडावर राहत होती’ हे नमूद केलेलं आहे.

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कि एप्रिल १८१८ पर्यंत रायगडची अवस्था ‘चांगली’ होती.

मग वाताहात कशामुळे झाली?

याचं उत्तर खूप सोप्पं आहे.

३/११

१८१८ मधे इंग्रजांना रायगड काबीज करायला १४ दिवस लागले.

या १४ दिवसात तोफांचा वापर करुन इंग्रजांनी रायगड चं खूप नुकसान केलं.

हे सत्य माहीत असून देखील ‘काही लोकांनी’ इंग्रजांना दोष देण्याऐवजी पेशव्यांना दोषी ठरवलं.

इंग्रजांपेक्षा पेशव्यांबद्दल एवढा आकस असणं, हेच दुर्दैव आहे.

४/११

अहो पाटील, मी दिलेलं पत्र ‘शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २’ मधलं आहे.

आता ‘सार’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहिती असेल.

दोन्ही पत्र १००% ‘अस्सल’ आहेत.

आणि काल तुम्ही दिलेल्या संदर्भातून हे साफ होतं कि श्रीसमर्थ हे शिवछत्रपतींचे ‘अधायत्मीक गुरु’ होते.

५/११

इथे सवयीचा प्रश्नंच नाहये.

‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ असो, ‘महाराजांच्या सैन्यात ३०%/५७% मुसलमान होते’ असो वा ‘महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवणं’ असो - इतिहासाचं हे विकृतीकरण केलं जातं म्हणून या बाबतीत बोलावं लागतं.

६/११

आता तुम्ही ‘समकालीन’ शिवभारताकडे काव्य म्हणून दुर्लक्ष केलंत तर कसं चालेल?

खास तुमच्यासाठी शिवभारत सोडून दुसरे संदर्भ देतो. (ते कल्याण-भिवंडी बद्दल नाहीत).

संदर्भ:
१) शिवचरित्र साहित्य खंड ८, ले.४९
२) Histoire détaillée des rois du Carnatic by Gnanou Diagou

७/११

मेहेंदळे गुरुजी १००% सत्य बोलत आहेत.

शिवछत्रपती हे ‘fanatic’ नव्हते.

पण तेच मेहेंदळे गुरुजी हे देखील म्हणतात कि “शिवछत्रपतींनी कधीही कुठेही मशीद बांधली नाही”.

कुठल्याही ‘समकालीन’ पुराव्यात (पत्र/बखर/दानपत्र/इनामपत्र) मशीद बांधल्याचा उल्लेख नाही.

८/११

देऊन देऊन ‘मराठ्यांना लूटेरा’ म्हणणाऱ्या जदुनाथ सरकार यांचे संदर्भ🤦🏻‍♂️

सरकार यांनी कुठलेही ‘मराठी समकालीन पत्र’ न वाचता फक्त बखरींचा आणि शत्रूंच्या साक्षीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहीलय हे तुम्हाला माहीत नाही का?

सुरेंद्रनाथ सेन त्यांच्याबद्दल काय म्हणालेले ते वाचा👇🏼

९/११

आता तुम्ही ज्या दोन गोष्टी संदर्भ देऊन कबूल केल्यात त्या म्हणजे:

१) श्रीसमर्थ हे शिवछत्रपतींचे ‘अधायत्मीक गुरु’ होते.

२) छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते

ह्या दोन्ही गोष्टी तुमचे थ्रेड RT करणाऱ्या सर्व बाजारु विचारवंतांना सांगायला विसरु नका.

१०/११

मी मागे पण तुम्हालाच सांगितलेलं. आज पुन्हा सांगतो.

शिवछत्रपती हे ‘सहिष्णु’ होते. त्या काळी ‘धर्मनिरपेक्षता’ नावाची संकल्पनाच नव्हती.

असती तर खुद्द धर्मवीर छत्रपती शंभूराजेंनी स्वत:च्या वडिलांना ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ संबोधलं नसतं.

११/११

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling