Devashish Kulkarni (Modi Ka Parivar) Profile picture
| Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|
CHINTAN Profile picture Keyur  Kulkarni Profile picture Rohidas Profile picture Vishal Profile picture Hinduism Discord Profile picture 5 subscribed
Mar 13, 2023 7 tweets 4 min read
#Thread: समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद खंडपीठाचा ‘तो’ निकाल!

इतिहासाचे विकृतीकरण हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक बाष्कळ वाद आपण सर्वांनीच ऐकले/वाचले आहेत. त्यात दोन्ही बाजूंचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे शिवसमर्थ संबंध.

१/७ शिवसमर्थ संबंधांवर वाद सुरु झाला की आजकाल एक नवीनंच गोष्ट ऐकायला मिळेत. ती म्हणजे औरंगाबाद उच्चन्यायालयाने या संबंधांवर दिलेल्या निकालाची.

या सोबतंच कुठल्यातरी फालतू स्थानिक वृत्तपत्रातील हे👇🏼कात्रण फिरवून लोकांनी दिशाभूल केली जाते.

२/७
Mar 6, 2023 13 tweets 5 min read
#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.

रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.

१/१२ Image होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.

२३ जुलै, १८५६ रोजी आजच्या टिळक आळीतील या वाड्यात जन्माला आलेला केशव गंगाधर टिळक पुढे जाऊन तत्कालीन भारताच्या…

२/१२ ImageImageImageImage
Jan 20, 2023 10 tweets 3 min read
#Thread: छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ही कुठे ही मशीद बांधली नाही!

राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर कधी थांबेल कोणासठाऊक. दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे महाराजांच्या अद्वितीय इतिहासाचे विकृतीकरण महाराष्ट्रात होत आहे.

१/१० Image शिवछत्रपतींनी मशिदी पाडल्या, भ्रष्ट केल्या, त्यांची धान्य कोठारे केल्याचे समकालीन पुरावे:

🔸 समकालीन जेझुईट पाद्री आंद्रे फ्राईर याचे पत्र. Andre freire's letter of 1678 published in historical miscellany published by BISM, Pune 1928, p.13

dspace.gipe.ac.in/xmlui/handle/1…

२/१०
Nov 4, 2022 7 tweets 2 min read
“कैलासवासी सुभेदार होते, त्यांनी एकनिष्ठतेनें श्रीमंतांची चाकरी करुन उत्तम परिणाम करुन गेले”.

- अहिल्यादेवी होळकर

(कै.सुभेदार - मल्हारराव होळकर;
श्रीमंत - थोरले बाजीराव)

संदर्भः महेश्वर दरबाराची बातमीपत्रे

नेहमीप्रमाणे, पाटीलांनी अर्धवट इतिहास मांडलाय. असो.

१/७ गंगाधर यशवंत आणि राघोबादादा यांचे कारस्थान - ही मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या सत्तासंघर्षाची एक बाजू आहे.

नेहमीप्रमाणे, नाण्याची एकंच बाजू दाखवून काँग्रेस च्या चमच्याने त्याचे काम चोख बजावले आहे.

पण इतरांना दुसरी बाजू कळणे गरजेचे आहे.

२/७
Oct 22, 2022 22 tweets 8 min read
अभ्यासपूर्ण लेख लिहीण्याचा प्रयत्न केलास पण गर्वाने “सत्य उशिरा येत पण पद्धतशीर घोडा लावून जात” - ही टिप्पणी करुन स्वतःचा विचारदळिद्रीपणा सिद्ध करायला विसरला नाहीस.

असो, बघ आता ‘घोडे कसे लागतात ते’😋

आणि हो, #Thread: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालकंच’!

१/२२ हे माझे कालचे ट्वीट. ज्यामुळे तू आणि तुझी टोळी सैरभैर झाली आहे.

एक साध्या प्रश्नाचे उत्तर दे - या ट्वीट मध्ये मी कुठेही असे म्हंटले आहे का की 'छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणत आहेत?

नाही ना? मग🤷🏻‍♂️ कशाला आभाळ हेपलताय🤦🏻‍♂️

असो, मुद्याकडे येऊयात.

२/२२
Sep 18, 2022 10 tweets 8 min read
पुण्याचा गणेशोत्सव - २०२२ (वर्ष १३० वे)

यंदाच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच मजा होता. एक वेगळाच उत्साह होता. पाऊसातही तो उत्साह काही कमी झाला नाही. पाऊसातल्या गर्दीत ही श्रींना माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह काही मी आवरु शकलो नाही. त्यातील काही छायाचित्रे या थ्रेडमध्ये टाकत आहे.

१/१० मानाचा पहिला - श्री कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत ज्याची स्थापना दस्तुरखुद्द हिंदुराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केली होती.

२/१०
Jun 15, 2022 16 tweets 4 min read
#Thread: पंतप्रधानांचा देहू दौरा आणि पुरोगाम्यांची अस्वस्थता

महाराष्ट्र ही संतांची भूमि. महाराष्ट्रावर वारकरी संप्रदायातील संतांचा विशेष प्रभाव पडला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत प्रत्येकाने भागवत धर्माची पताका अभिमानाने मिरवली.

१/१६ अनेक शतकांपासून भक्ती मार्गाने चालत आलेल्या वारकरी संप्रदायासाठी काल खूप विशेष दिवस होता.

इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्री क्षेत्र देहू येथे दर्शनास आले होते.

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे भाग्य लाभले ह्याचा मला स्वतःला सार्थ अभिमान आहे.

२/१६
Jun 12, 2022 17 tweets 5 min read
#Thread: शिवराज्याभिषेकाचे समकालीन वर्णन आणि महत्त्व

“शाहण्णव कुलीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहसनारुढ होऊन छत्र धरुन छत्रपति म्हणविलें. धर्मोद्धार करुन देवब्राह्मण संस्थानीं स्थापून यजन याजनादि वर्णविभागें चालविलीं…

१/१६ …तस्करादी आन्याई यांचे नांव राज्यांत नाहींसें केलें. देश-दुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करुन येकरुप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली”.

- हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र

२/१६
Jun 8, 2022 17 tweets 5 min read
#Thread: नुपूर शर्मा, नरेंद्र मोदी आणि अल-कायदा ची धमकी

गेल्या काही दिवसांपासून काय सुरु आहे हे आपण सर्वेजण जाणतोच.

नुपूर शर्मा यांनी केलेलं वक्तव्य हे चूक की बरोबर या पेक्षा (याच विषयातील) जास्तं महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

१/१७ नुपूर शर्मा यांनी केलेलं विधान काही संदर्भहीन नाही.

इस्लाम मध्ये मान्यता असलेल्याच एका ग्रंथामध्ये ‘ती’ माहिती नमूद केलेली आहे.

एवढंच नाही, तर स्वतःला इस्लाम चा प्रचारक म्हणवणाऱ्या गद्दार झाकिर नाईक या इस्माने भूतकाळात देखील हेच वक्तव्य केलेलं होतं.

असो.

२/१७
Jun 6, 2022 6 tweets 3 min read
#Thread: शिवराज्याभिषेकाची हकीकत

मराठ्यांच्याच नव्हे तर हिंदुस्थाच्या इतिहासात शिवराज्यभिषेकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

०६/०६/१६७४ रोजी प्रत्यक्ष रायगडावर हजर राहून राज्याभिषेकाचे वर्णन आपल्या डायरीत एका व्यक्तिने लिहून ठेवले होते - Henry Oxinden ने!

१/६ गागाभट्टकृत श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः असो वा अनेक बखरी, राज्याभिषेकाची अनेक स्वकीय साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत.

परंतु त्या दिवशी तिथे हजर असणाऱ्या परकीय Henry Oxinden या इंग्रज अधिकाऱ्याने नमूद करुन ठेवलेली हकीकत इतिहासातले एक सुवर्ण पान आहे.

२/६
May 29, 2022 7 tweets 3 min read
#Thread: छत्रपतींचे वंशज आणि राजकारण

हिंदुनृसिंह शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणे - हे महाराष्ट्राला काही नवीन नाही.

आजकाल तर छत्रपतींच्या वंशजांचा सोयीनुसार वापर उघड-उघड बघायला मिळतो.

राष्ट्रवादीत असणारे उदयनराजे चालतात पण भाजप मध्ये असणारे उदयनराजे नाही.

१/७ येवढंच काय तर भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्यापासून निवडणूकीचा निकाल येईपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर वयक्तिक पातळीवर गलिच्छ टीका ही करण्यात आली.

त्या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहेत हे महाराष्ट्र विसरलेला का?

२/७
May 19, 2022 13 tweets 7 min read
#Thread: अफजल खानाच्या थडग्याची हकीकत

भारतवर्षात सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग सारखे अभेद्य जलदुर्ग एकाच राजा ने बांधले - शिवछत्रपतींनी.

पण हे सांगायचे सोडून काही अज्ञानी लोक “अफझलखानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधली” असे बाष्कळ दावे करण्यात धन्यता मानत आहेत.

१/१२ सर्वप्रथम, अफजल खानाच्या कबरी चा उल्लेख एकाही शिवकालीन कागदपत्रात येत नाही.

त्यामुळे हे थडगं छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले - या बाष्कळ दाव्यात काहीही तथ्य नाही!

या थडग्याचा उल्लेख आला कुठून हे पाहाण्याआधी अफजल खान वधानंतर काय झाले हे पाहूयात.

२/१२
May 5, 2022 4 tweets 3 min read
आज पहिल्यांदा आव्हाड यांचे Tweet आवडले!

अर्ध का होईना पण सत्य मांडल्याबद्दल धन्यवाद.

Prother ने १८१८ मध्येच समाधी पाहिलेली होती आणि याची नोंद तुम्ही दिलेली आहेच.

१८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याचे आढळत नाही. कारण इंग्रजांनाच गडावर जायला ‘बंदी’ घातली होती.

१/४ शिवसमाधी ची चळवळ १८९६-९७ मध्ये लोकमान्य टिळकांनी केली ही गोष्ट तर महात्मा फु्ले यांचे अनुयायी आणि थोर सत्यशोधक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलेलं आहेच.

फक्त पूर्ण सत्याची आव्हाड साहेबांना कल्पना दिसत नाहीये.

२/४
Apr 18, 2022 6 tweets 2 min read
#Thread: पुण्यशील राजमाता सुमित्राराजे, शिवशीहर बाबासाहेब पुरंदरे आणि इंदिरा गांधी

इ.स. १९८० मध्ये रायगडावर ३०० वी शिवपुण्यतिथी झाली त्यावेळी गो.नी.दाण्डेकरांनी एक अभूतपूर्व उपक्रम राबविला होता.

१/५ महाराष्ट्रातल्या शेकडो गड-किल्ल्यांवरील तसेच भारतभरातल्या नामांकित तीर्थक्षेत्रांच, नद्यांचे जल शेकडो कार्यकर्त्यांशी पत्रांनी संपर्क करून रायगडावर आणले आणी महाराजांच्या समाधीला त्यांचा अभिषेक करविला.

२/५
Apr 1, 2022 14 tweets 6 min read
#Thread: धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, औरंगजेब आणि इस्लाम

मरणाला त्या मारुनी तुम्ही, मोक्षाला गेला येथे।
ज्वज्ज्वलनतेजस तुम्ही राजे, गौरविला गेला येथे॥

आज मृत्यूंजय अमावस्या - धर्मवीर शंभुछत्रपतींची पुण्यतिथी.

सर्वप्रथम या स्वधर्माभिमानी महापुरुषास त्रिवार वंदन💐🙏🏼

१/१४ १६८० साली पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या कैलासवासानंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजेंनी “राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य” असं म्हणत उत्तमरित्या सांभाळली.

मोगल, सिद्दी, फिरंगी (पोर्तुगीज), टोपीकर इंग्रज - या सर्व शत्रुंशी संभाजीराजे लढत होते.

२/१४
Jan 13, 2022 13 tweets 5 min read
#Thread : पानिपत - भाग १ः युद्धाची तयारी.

मराठा फौजेचे सेनापती, करवीरकर छत्रपतींचे पेशवा आणि नानासाहेब पेशव्यांचे दिवाण - अशा तिन जबाबदाऱ्या निभावणाऱ्या सदाशिवराव भाऊंना मल्हारबा व इतर थोर सरदार म्हणाले -

“आम्ही काही जिवाचा तमा धरीत नाही. हा जीव तुम्हावरून सदका आहे…

१/१३ …महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”

असे पुरुषार्थाचे बोल बोलून सर्व सरदार घोड्यावर स्वार होऊन निघाले.

२ उंच व शक्तिशाली हत्ती - रणरंगधीर व गजराज यांना ऐरावतासारखे तयार करण्यात आले.

२/१३
Jan 12, 2022 11 tweets 3 min read
१२ जानेवारी, १७०८ रोजी साताऱ्यात संभाजीपुत्र शाहू हे छत्रपती झाले.

हिंदुपदपादशाह, अजातशत्रू व पुण्यश्लोक या बिरुदावली ज्या शाहूछत्रपतींसाठी वापरल्या गेल्या ते शाहूछत्रपती कधी कोणाला कळले का? - हा प्रश्न मला नेहमी पडतो.

आणि हा प्रश्न का पडतो याची कारणे ही आहेत!

१/११ रियासतकारांनी शाहूंना ‘पुण्यश्लोक’ म्हटलं तर जयसिंगराव पवारांनी शाहूंना ‘शिवाजी कधी कळलाच नाही’ अशी टिपण्णी केली.

पण ह्यात चूक कोणाची होती? ७ वर्षांचा असताना ज्याच्या वडीलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, पुढची १८ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या कैदेत काढली अशा राजकुमार शाहूची?

२/११
Dec 15, 2021 5 tweets 2 min read
आज १५ डिसेंबर…

हिंदुपदपादशाह अजातशत्रु पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची २७२ वी पुण्यतिथी.

महाराजांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼

आजच्याच दिवसाचे अवचित्य साधून सर्वांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा, प्रकाशित परंतु दुर्लक्षित असलेला कागद सादर करत आहे.

१/५ १७४९ मध्ये पुण्यश्लोक शाहूछत्रपतींनी २ याद्यांद्वारे मराठा साम्राज्याची सगळी जबाबदारी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांवर सोपवली हे तर सर्वश्रुत आहे.

या दोन याद्यांसोबतंच शाहूछत्रपती आणि नानासाहेब यांच्यात झालेल्या कराराचा करारनामा देखील अस्तितवात आहे.

२/५
Nov 16, 2021 5 tweets 2 min read
#Thread: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि एक साहेबप्रेमी

“राजर्षि शाहू छत्रपती आणि लोकमान्य आयुष्यभर भांडले. आरोपांची राळ उडवली. पण लोकमान्य गेल्याची वार्ता शाहू छत्रपतींना कळल्यावर शाहू छत्रपती ‘मोठा लढवय्या पुरूष गेला’ म्हणून जेवत्या ताटावरून उठले”.

- सचिन खोपडे-देशमुख

१/५ फेसबूक वर सक्रिय असणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांसाठी सचिन खोपडे-देशमुख हे नाव काही नवीन नाही.

काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे निधन झाले. निधनानंतर समाज माध्यमांवर अनेक लोकांनी त्यांचे संस्कार व वैचारिक दारिद्र्य दाखवत बाबासाहेबांच्या निधनावर आनंद व्यक्त केला.

२/५
Nov 15, 2021 5 tweets 2 min read
शिवशाहीर श्रीमंत #बाबासाहेब_पुरंदरे ह्यांच्या अंत्यदर्शनासाठी अथांग जनसागर लोटलेला.

तरुण युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या लाडक्या बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेतले.

सरस्वतीपुत्राने आयुष्यात काय कमवले हे आज लोकांच्या डोळ्यातील आश्रू बघून लक्षात आले.

२/६ पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण या सारख्या पुरस्कारांचे मान वाढवणाऱ्या बाबासाहेबांचे अंत्यविधी शासकीय इतमामात झाले.

२१ बंदूकांची सलामी देण्यात आली. हा मान मोलाचाच. परंतु लोकांच्या डोळ्यातून वाहणारे आश्रू हीच बाबासाहेबांची खरी कमाई होती.

३/६
Oct 29, 2021 5 tweets 2 min read
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -

“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.

१/५ “…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”

- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.

२/५