Tr. पूनम अनुप बोरकर Profile picture
संघर्षमय जीवनाची प्रवासी! #शेतकरी बापाची लाडाची लेक..छंद वाचनाचा | #शिक्षिका|

Apr 10, 2021, 16 tweets

📌➓ जातिव्यवस्थेवर प्रहार व बौद्ध धर्मांतर.....

बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहिले परंतू दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकुण एक प्रयत्नांना सुरूंग लावला.
[1]
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain

हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे.
#ThanksDrAmbedkar
[2]

बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?

[3]
#ThanksDrAmbedkar

आता हिंदू धर्म सुधारणा होणं शक्य नाही हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला होता आणि त्यातूनच त्यांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली.

बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल वीस वर्षांचा कालावधी घेतला.

[4]
#ThanksDrAmbedkar

या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खूप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला.
14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातील सर्वात मोठे असे धर्मांतर घडवून आणत भारतात बुद्धविचाराची पुनःस्थापना केली.

[5]
#ThanksDrAmbedkar

बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचे उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचे होते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावयाची होती. लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणे हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता.
[6]
#ThanksDrAmbedkar

बुद्धाचा स्विकार करणारे वास्तविकतेत जगणारे असतात.. धर्मांतरानंतर एका पत्रकाराने 2 प्रश्न विचारले,

1) बाबासाहेब तुमचा हा धम्म हीनयान कि महायान, बाबासाहेब म्हणतात दोन्हीपैकी कोणते हि नाही, याला नवयान म्हणा.

#ThanksDrAmbedkar

[7]

2) तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक?

बाबा म्हणाले मी नास्तिकही नाही आस्तिकही नाही.

मी वास्तविक आहे

बुद्ध आचरण्याची गोष्ट आहे.. पाळण्याची नाही.

#ThanksDrAmbedkar

[8]

बाबासाहेब म्हणतात की, माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते.

#ThanksDrAmbedkar
[9]

येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील.

#ThanksDrAmbedkar
[10]

त्यातून मिळणारी आशा मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील. मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा
#ThanksDrAmbedkar
[11]

नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत व आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेले असेल
#ThanksDrAmbedkar
[12]

बुद्धाचा विचार विज्ञानवादी आहे.तो कालसुसंगत आहे. त्यात कट्टरता नाही, तर्कसुसंगतपणा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तिचे स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना पूर्ण स्थान आहे. बुद्ध टोकाचा विचार नाही
#ThanksDrAmbedkar
[13]

तो सुवर्णमध्य साधण्याचा विचार सुचवतो. बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक, ईश्वरी अवतार वा ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा दावा केलेला नाही. बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे. पुरोगामी विचारधारा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्वे बुद्धाने जगाला दिली.

#ThanksDrAmbedkar
[14]

बुद्धांच्या एकुण नितीनियमांमध्ये चर्चेला स्थान होते. यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्विकार केला.
बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पनांतील मूलभूत फरक विशद केलेला आहे.

#ThanksDrAmbedkar
[15]

धर्माचा संबंध देवाशी आहे,तर धम्माचा संबंध मानवाशी.धर्म हा बुद्धिप्रामाण्य नाकारतो. धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन. धम्म म्हणजे स्वातंत्र्य,धर्म म्हणजे चमत्कार, भाकडकथा, दैववाद, तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा
#ThanksDrAmbedkar
जय भिम नमो बुद्धाय
[n]

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling