संघर्षमय जीवनाची प्रवासी! | I don't just teach subjects.. I teach life | #Teacher |
Apr 11, 2021 • 23 tweets • 9 min read
📌⓫ परराष्ट्रीय धोरण आणि देशाचा सन्मान....
डाॅ. आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर 10आॅक्टों 1951 रोजी आपल्या राजीनाम्याची कारणे सभागृहात मांडण्यासाठी ते उपस्थित झाले होते. परंतु त्यांना त्यांचे म्हणने मांडू दिले गले नाही.
[1/n]
#ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain
म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा त्याग करुन बाहेर पडले.
डाॅ. आंबेडकरांनी एक पत्रक काढून आपल्या राजीनाम्याची कारणे त्यांत मांडली होती. त्यात अनेक कारणाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे कारण होते.
बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहिले परंतू दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकुण एक प्रयत्नांना सुरूंग लावला.
[1] #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain
हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. #ThanksDrAmbedkar
[2]
Apr 9, 2021 • 9 tweets • 4 min read
📌➒ लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन....
बाबासाहेबांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचे असेल तर "कुटुंबनियोजन" हा एकच प्रभावी पर्याय आहे हे ठासून सांगितले;
[1/n] #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain @MarathiRT
उपलब्ध साधन सामग्रीचे समान वितरण हे गरिबी दूर करण्याचा पर्याय होऊ शकत नाही जोपर्यंत लोकसंख्या आटोक्यात येत नाही आणि तसाही ठराविक समाजाला समान वितरणाचा फायदाच होणार आहे त्यामुळे गरीब आणि शोषित समाजाला जर आर्थिक प्रगती करायची असेल
📌➏ डॉ.बा.आंबेडकर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी......
‘न शूद्राय यतिविद्ध्यात’ (शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही) या मनुस्मृतीच्या कायद्याला धिक्कारून, बाबासाहेबांनी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, चळवळीच्या बलबुत्यावर निर्माण केली.
#ThanksDrAmbedkar @LetsReadIndia
[1/n]
भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे. #ThanksDrAmbedkar
[2]
Apr 5, 2021 • 12 tweets • 5 min read
📌➎ ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान....
‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून सगळ्यात मोठे उपकार केले आहे.
‘मनुस्मृती’सारख्या प्राचीन ग्रंथांत ज्यांना ‘शूद्र’ संबोधले आहे त्या ‘सेवा करणाऱ्या गावकुसाच्या आत रहाणाऱ्या
[1/n] #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain @MarathiRT
जाती म्हणजे ओबीसी’, असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यामुळे साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, धोबी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, सुतार, लोहार, तांबट अशा सेवाकर्मी शूद्र जाती ओबीसी ठरतात. संविधानाच्या मते,
महाराष्ट्रात वा इतर काही राज्यांत
"समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो."
~ डॉ. बा. आंबेडकर
#ThanksDrAmbedkar #थ्रेड#Thread @LetsReadIndia @MarathiBrain @MarathiRT @TUSHARKHARE14
[1/n]
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले 1/n #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain #थ्रेड#Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
Apr 2, 2021 • 14 tweets • 6 min read
📌➋ कामगार संघटन आणि संघर्ष....
पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
Apr 1, 2021 • 14 tweets • 8 min read
📌➀ घटना आणि देशाचं भवितव्य..
25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
#ThanksDrAmbedkar #जयभीम
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
#पूनमच्या_लेखणीतुन #पूnm #मराठी
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र