#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप
दिला.यावेळी नेताजींच्या भेटीचा तपशील ब्रिटीशांना समजला तर ब्रिटीशांच्या गुडबुक मधून बाहेर पडू या भितीने,डाॅ. हेडगेवार हुद्दारांना सांगतात.'मी खूप आजारी आहे.हवापालटासाठी उपचारासाठी नाशिकला आलो आहे.मी बोलूही शकत नाही.मी फार आजारी आहे.'नेताजींचे सचिव बाहेर तिष्ठत आहेत हे समजूनही
हेडगेवारांनी शहांची भेट घेतली नाही.हुद्दार खोलीतून बाहेर पडताना हुद्दारांच्या येण्याने बाहेर आलेले हेडगेवारांचे सहकारी आत खोलीत गेले,आणि खोलीत हास्यविनोद सुरु झाले.जे बाळाजी हुद्दार व शहांच्या कानावर आले.डाॅ. हेडगेवार यांचे निकटवर्तीय सहकारी मा.ह.हातिवलेकर यांनी 'अक्षर वैदर्भी'
१९९१च्या अंकात 'एक सहप्रवास; सावरकर-संघ मार्क्सवाद'या लेखात बाळाजी हुद्दार, नेताजींचे सचिव शहा व हेडगेवार यांच्या तथाकथित भेटीचा तपशील बयाजवार दिला आहे.'नेताजींनी बाळाजी मार्फत संघाच्या सहकार्याच्या अपेक्षेने पाठवलेल्या दूताची भेट डाॅ. हेडगेवार यांनी आजारपणाचे सोंग घेऊन टाळली'
हे स्पष्टपणे नमूद केले आहे.आरएसएसचे निष्ठावंत स्वयंसेवक नानाजी पालकर उर्फ ना. ह. यांनी 'डाॅ. हेडगेवार प्रेरक जीवन प्रसंग'या हेडगेवारांच्या चरीत्र असलेल्या पुस्तकातदेखील 'नेताजींनी डाॅ. हेडगेवारांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतू तो दोन्ही वेळा हुकला'असे म्हटले आहे.आरएसएसचे संस्थापक
व प्रथम सरसंघचालक साधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट घ्यायलाही तयार नव्हते;किंबहुना शेवटपर्यंत त्यांनी भेट टाळली.त्याच संघटनेचे स्वयंसेवक महाराष्ट्राचे विरोधी नेते @Dev_Fadnavis हेडगेवारांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे म्हणून लोकांना मूर्ख बनवतोय.
आरएसएस च्या स्थापनेआधी डॉ. हेडगेवार काँग्रेसच्या अनुशीलन समितीत होते.१९२१ साली त्यांना ब्रिटिशविरोधी भाषणासाठी राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली.एक वर्ष ते अजनीच्या तुरुंगात होते १९२२ ला सुटले.त्यांच्या सुटकेच्या सभेत दोन वक्ते होते.एक हकीम अजमल खान व दुसरे मोतीलाल नेहरु होते.
डॉ.हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेअगोदर एक काँग्रेसी भारतीय व्यक्ती म्हणून एक वर्षाचा कारावास काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होऊन भाषण केल्याने भोगला हे सत्य आहे.मात्र संघ स्थापनेनंतर हेडगेवारांनी स्वतःची संपूर्ण मते बदलली त्यांनी संघाला स्वातंत्र्य आंदोलनापासून
विरोधी दिशेला ठेवत ब्रिटीशांची चमचेगिरी केली,हे प्रखर सत्य आहे.१९२० नंतर सुधारणावादी गांधी भारतीय राजकारणात सक्रिय झाला आणि आधी 'सामाजिक स्वातंत्र' की 'आधी राजकीय स्वातंत्र्य'या वादाच्या पुढे जावून स्वातंत्र्याला असे काही कप्पेच नसतात,म्हणत या देशाच्या सर्वोच्च पदावर चांभार किंवा
भंगी समाजातील मुलगी ज्यादिवशी बसेल ते खरे स्वातंत्र्य म्हणायला लागला.गांधीपूर्व काँग्रेसला शेतकरी,अस्पृश्य यांचा विटाळ होता,जो गांधीने मोडून काढला.गांधी बाबा शेंडी,जाणवे वाल्या हिंदुत्ववाद्यांचा वैरी बनला ते याच कारणांसाठी!व अशा या अर्ध्या उघड्या फकीर गांधीबाबाला रोखण्यासाठी,
संपवण्यासाठी संघासारखी फॅसिस्ट संघटना जन्माला आली.
#खोटी_आरएसएस #नकली_देशप्रेम #हाफचड्डी #खोटा_इतिहास
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.