Prit Profile picture
29 | Engineer | स्वयंघोषित कवी

Apr 29, 2021, 13 tweets

" महाराष्ट्रातील कला " म्हणलं तर सर्वात आधी नाव येत त्या इथल्या जगप्रसिद्ध अश्या लेण्यांच . . . #महाराष्ट्रदिन निमित्ताने ओळख करून घेऊ इथल्या अद्वितीय अशा या कलेची 👇👇

१. अजिंठा (औरंगाबाद): अजिंठ्यातली लेणी  चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत.एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धपंथीय लेणींचा समावेश आहे. या लेणी औरंगाबाद पासून जवळपास १०६ किमी तर जळगाव पासून ६० किमी
अंतरावर आहेत.

२. वेरूळ(औरंगाबाद) : औरंगाबाद पासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या या जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू व ५ जैन लेणी आहेत. येथील कैलासमंदिर स्थापत्यशास्त्राचा अदभूत असा नमुना आहे.

३. पांडवलेणी(नाशिक): पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.यामध्ये एकूण २४ लेणी आहेत.पांडव या लेण्यामध्ये काही दिवस राहिले होते असेही मानले जाते.

४.एलिफंटा लेणी (मुंबई): मुंबई पासून जवळच असलेल्या घारापुरी या बेटावर असल्याने याला घरापुरीची लेणी असेही म्हणतात.घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे

५. कान्हेरी(मुंबई) :मुंबईमध्ये बोरिवली येथे कान्हेरीच्या लेणी वसली आहेत. येथे एकूण १०९ लेणी आहेत.इ.स. पू. १ ले शतक ते इ.स. ९ वे शतक या काळात या लेण्यांची निर्मिती झालेली आहे.

६. कुडे लेणी (मुरुड): मुरुड शहरापासून जवळपास २५ किमी अंतरावर असलेली ही बौद्धकालीन लेणी आहेत. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी आहेत.

७. कार्ला (पुणे): मुंबई-पुणे पासून जवळच असलेल्या या लेणी, बौद्ध भिक्षु थरवेदा यांनी इ.स. पूर्व ३ रे ते २ रे शतक या काळात निर्माण केल्याचे आढळते. भारतात काही मोजक्या दगड कापून तयार करण्यात आलेल्या लेण्यांमध्ये या लेण्यांचा समावेश होतो.

८. लेण्याद्री (जुन्नर, पुणे): भारतातील सर्वात मोठा बौद्ध लेणी समूह असलेल्या इथे, ३२५ कोरीव लेणी आहेत.

महाराष्ट्रातील अजून काही लेणी 👇👇

● अगाशिव लेणी( कऱ्हाड,सातारा)
● कोंडाणा लेणी ( कर्जत, रायगड)
● खरोसा लेणी (निलंगा, लातूर)
● गांधारपाले ( महाड, रायगड)
● घटोत्कच लेणी ( सिल्लोड, औरंगाबाद)
● औरंगाबाद लेणी ( औरंगाबाद)
● घोरावाडी/शेलारवाडी लेणी (पुणे)

● ठाणाले/ नाडसुर लेणी (पाली, रायगड)
● तुळजा लेणी ( जुन्नर, पुणे)
● खडसांबळे/नेणावली लेणी (सुधागड, रायगड)
● पन्हाळोकाजी लेणी ( दापोली, रत्नागिरी)
● पाताळेश्वर ( शिवाजीनगर, पुणे)
● पितळखोरे लेणी ( कन्नड, औरंगाबाद)
● जिंतूर लेणी ( जिंतूर, परभणी)
● बेडसे लेणी ( मावळ, पुणे)

● भाजे लेणी ( मावळ, पुणे)
● मंडपेश्वर लेणी (बोरीवली , मुंबई)
● महाकाली लेणी ( आरे कॉलनी, मुंबई )
● वाई लेणी ( वाई, सातारा)
● शिरवळ/पांडवदरा लेणी ( शिरवळ, पुणे)
● शिवनेरी लेणी ( जुन्नर, पुणे)
● भोकरदन लेणी (जालना)
● शिवलेणी ( अंबाजोगाई, बीड)
● भटाळा लेणी ( चंद्रपूर )

माहिती व छायाचित्र संदर्भ : गूगल , विकिपीडिया व bobhata.com वरील शीतल अजय दरंदळे यांचा लेख.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling