Prit Profile picture
29 | Engineer | स्वयंघोषित कवी
Apr 29, 2021 13 tweets 4 min read
" महाराष्ट्रातील कला " म्हणलं तर सर्वात आधी नाव येत त्या इथल्या जगप्रसिद्ध अश्या लेण्यांच . . . #महाराष्ट्रदिन निमित्ताने ओळख करून घेऊ इथल्या अद्वितीय अशा या कलेची 👇👇 १. अजिंठा (औरंगाबाद): अजिंठ्यातली लेणी  चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत.एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धपंथीय लेणींचा समावेश आहे. या लेणी औरंगाबाद पासून जवळपास १०६ किमी तर जळगाव पासून ६० किमी
अंतरावर आहेत.
Apr 28, 2021 6 tweets 2 min read
अगोदरच्या काळात बाबा बुवा लोक काहीतरी हातचालाखी करून त्याला चमत्कार दाखवून सर्वांसमोर विज्ञानाचा खून करायचे व लोक त्यांना देव समजून त्यांचा उधोउधो करायचे. तसे काही बाबा आजही बघायला भेटतात. म्हणून तर ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणे या भोंदूबाबांच्या जाहिरातींनी गजबजून गेलेले दिसतात. पण जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसा लोकांचा विज्ञानावर विश्वास वाढत गेला व या बाबांनी पण आपला पवित्रा बदलता घेतला. आजकाल हे बाबा लोक विज्ञानाने बनवलेल्या साधनांचा विज्ञानाची कत्तल करण्यासाठी सर्रास वापर करताना दिसतात.
काही जुन्या ग्रंथात, संस्कृतीत विज्ञान कसं प्रगत होत याबद्दल
Apr 4, 2021 4 tweets 1 min read
ताई चांगली शिकली उच्चशिक्षित झाली,
बालविवाह न करता वयाच्या पंचविशीत
२-४ पोरांना नापसंद करून ताई ने तिला आवडेल अश्या मुलाशी लग्न केलं,
एकपत्नीत्वाची तरतूद असल्याने ताईच्या जीवनाला स्थैर्य आहे,
घर सोडून सासरी आली पण आई वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क घ्यायला विसरली नाही, उच्चशिक्षणाने ताई ला चांगली नौकरी आहे,
ताई पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून नौकरी करते व तितकंच वेतन घेते,
बोनस आणि PF मुळे ताई च बरं चाललंय,
ताई एक सुजाण कर्मचारी आहे ,
ताईला वुमन & चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट फॉर वुमन लेबर्स आणि वुमन लेबर वेल्फेअर फंड