पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, महाराष्ट्र-गोवा यांच्या वतीने वेबिनारचे आयोजन
विषय - कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा : भारतीय खेळाडूंपुढील आव्हाने आणि संधी
🗓️आज सकाळी 11 वा.
सहभागी व्हा:
#Cheer4India #Tokyo2020
पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि @robmhgoa यांच्या वतीने
कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा : भारतीय खेळाडूंपुढील आव्हाने आणि संधी यावरील वेबिनार
आता लाइव
#TeamIndia म्हणजे ऑलिम्पिकमधील भारतीय संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 5 मित्रमंडळींना/ कुटुंबीयांना टॅग करावे असे आवाहन @YASMinistry चे मंत्री श्री @ianuragthakur यांनी आपल्याला केले आहे.
#HumaraVictoryPunch #Cheer4India
#COVID19 प्रादुर्भावाच्या स्थितीमुळे स्वाभाविकच भारतीय खेळाडूंवर काहीसा ताण आहे. तथापि, ग्रेसनोट या अमेरिकी कंपनीने एप्रिलमध्ये "भारताला या स्पर्धेत 17 पदके मिळतील" असे भाकीत केले होते. तीच कंपनी आपल्याला 🇮🇳 19 पदके मिळू शकतात, असे सांगत आहे -संदीप चव्हाण, क्रीडा पत्रकार
आपण आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. या संघात महाराष्ट्राचेही अनेक खेळाडू आहेत. भारतासाठी राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत पदके जिंकून आणतील अशी अपेक्षा आहे.
-श्री.शैलेश पाटील, फ्रीलान्स पत्रकार
#Cheer4India
📹
आपल्या नेमबाजीच्या संघातील 15 खेळाडूंपैकी राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत या अनुभवी नेमबाज आहेत. विशेषतः, तेजस्विनी सावंत 2010 पासून खेळत आहे.
स्टीपलचेस मध्ये बीडचा अविनाश साबळे भारतासाठी पदक जिंकू शकतो - महेश विचारे, सहा.संपादक, न्यूज डंका
#Cheer4India
.@iocmedia चे अध्यक्ष थॉमस बाख म्हणतात, "ऑलिम्पिकचे आताचे ब्रीदवाक्य आहे- अधिक जलद, अधिक शक्तिशाली, उच्चतर आणि एकत्र". याचे कारण म्हणजे, ऑलिम्पिकचा सारा संबंध संघभावनेशी आहे आणि यावर्षीचे #Olympics म्हणजे, #COVID19 शी आपण एकत्रितपणे देत असलेल्या लढ्याचेच प्रतीक आहे. -संदीप चव्हाण
मुष्टियुद्ध, कुस्ती अशा ज्या खेळांमध्ये एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो त्या खेळाडूंना #COVID19 काळात सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. परिणामी, यावर्षीच्या #Olympics मध्ये अशा खेळांच्या स्पर्धांमध्ये विविध देशांच्या खेळाडूंची कामगिरी खालावलेली दिसू शकते.- महेश विचारे
🏅@YASMinistry ने सुरू केलेल्या 'ऑलिम्पिक मंच हेच लक्ष्य (TOPS)' या योजनेची खेळाडूंना तयारीसाठी पुष्कळ मदत झाली. आपल्या खेळाडूंना परदेशातही लसीकरण सुविधा मिळावी, यासाठी केंद्र सरकारने शक्य तेव्हा शक्य तेथे सोय केली - शैलेश पाटील
#Cheer4India
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.