Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Jul 29, 2021, 5 tweets

आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणारे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे १००रीत पदार्पण करत आहेत.

ह्या इतिहासपुरुषाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचवलं.

१/५

‘राजा शिवछत्रपती’ सारखं शिवचरित्र लिहून महाराष्ट्राच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षरश: वेड लावणारा हा इतिहासमहर्षी.

‘जाणता राजा’ हे नाटक दिग्दर्शीत करुन बाबासाहेबांनी १६७४ चा भव्य ‘शिवराजाभिषेक’ सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा करुन आपल्यावर असंख्य उपकार केलेत.

२/५

कोणता ही स्वार्थ न पाहता शिवछत्रपतींचं अष्टपैलू कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी या महात्म्याने स्वत: संपूर्ण आयुष्य वेचलं.

प्रत्येक शिवप्रेमी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र वाचल्याशिवाय राहू शकत नाही.

३/५

अनेक राजघराण्यांचा आणि शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.

पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले ह्यातर कल्पवृक्षासारख्या बाबासाहेबांच्या मागे उभ्या होत्या.

आजही राजमाता कल्पनाराजे आणि छत्रपती उदयनराजे यांचे बाबासाहेबांशी स्नेहाचे संबंध आहेत.

४/५

अनेक दिग्गज राजकारण्यांनी नेहमीच बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला आहे.

अशा ह्या महान शिवशाहीरास त्रिवार वंदन💐🙏🏼

आदिशक्ति आई तुळजाभवानी आणि श्रीसद्गुरु समर्थांच्या चरणी एकंच प्रार्थना - ह्या सरस्वतीपुत्रास उदंड आयुष्य द्या🙏🏼

#बाबासाहेब_पुरंदरे_शताब्दी

५/५

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling