#थ्रेड:-
प्रशांत किशोर हे ग्रॅज्युएशन नंतर नोकरीनिमित्त @UN च्या पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये यूएस ला होते, यूएस नंतर ते पोलिओच्या कार्यक्रमांतर्गत बिहार ला पोस्टिंग घेतली, दोन वर्षे बिहार मध्ये काम करून परत यूएन मध्ये गेले तिथे काही दिवस काम केल्यानंतर त्यांना वेस्ट सेंट्रल 👇
आफ्रिकेत डिव्हीजन हेड या पोस्टवर पाठवल गेल, तिथ चार वर्षे नोकरी करत असताना जिनींव्हा ला ट्रान्स्फर झाले या दरम्यानच प्रशांत किशोर ने गुजरातचे माजी मुख्यमंत्री @narendramodi पत्र लिहून पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये गुजरात मध्ये खूप काम करण्याची गरज व्यक्त करनारे नाराजी पत्र लिहले, 👇
मोदींनी प्रशांत किशोर ला रिटर्न पत्र लिहत नाराजी व्यक्त करणे सोप्प असते पण इथं येऊन तुम्ही काम करू शकत नाही का असं उत्तरादाखल लिहून पाठवले या आधी मनमोहनसिंग यांच्या संपर्कात प्रशांत किशोर होतेच त्यांच्याच सांगण्या वरून बिहार मध्ये काही काळ काम केले होते. 👇
2011 साली हा पत्रव्यवहार झाला त्यानंतर वर्ष भराने प्रशांत गुजरातला आले अन मोदीला भेटले अन काम सुरू केलं,काम सुरू करताना प्रशांत ने एक अट ठेवली ती म्हणजे माझा तुमच्याशी सरळ संपर्क असेल मध्ये दुसरा कोणीही नको,मोदींनी ग्रीन सिग्नल दिला अन काम सुरू झालं,जमिनी लेवल वर काम अन डाटा 👇
अनालाईज करणे यात प्रशांत किशोर एक्सपर्ट आहेत यात प्रशांत किशोर यांचा हात कोणीही धरू शकत नाही,मोदींनी लोकसभेची तयारी सुरू केली होतीच त्याचाच एक भाग म्हणून साऊथ चा एक पेपर आहे तुघलक, त्याचे एडिटर आहेत रामास्वामी,त्यांच्या विनंती वरून मोदीजी गुजरातच्या विकासावर स्पीच देण्यास जाणार👇
होते,त्या स्पीच मध्ये काय बोलायचे याची तयारी सुरू झाली,सीएमओ चे अधिकारी स्पीच लिहायची तयारी करत होते,भाषण इंग्रजीत होणार असल्याने मोदीनीं सीएमओ च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की प्रशांत किशोर ला अनुभव असल्याने भाषण लिहण्यास किशोर ची मदत घ्या असं सांगितलं. 👇
भाषण झालं अन प्रशांत ने लिहलेल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळाला अन प्रशांत मोदींच्या गुड बुक मध्ये सहभागी झाले,त्यानंतर शासकीय कामाचा डाटा अनालाईज करायला सांगून शासकीय अधिकारी व प्रशांत यांचा डाटा कॅम्पेयर केला अन त्यात प्रशांत किशोर यांनी बाजी मारली,याच डेटा अनालाईज व सर्वेच्या 👇
माध्यमातून मोदीजी नीं 2014 ची लोकसभा गाजवली अन प्रधानमंत्री झाले,शपथविधी पार पडला अन प्रशांत ने मोदींची भेट घेत एक व्यक्ती अनेक विषयाचा ज्ञानी होऊ शकत त्यामुळं त्या विषयाचा ज्ञानी तोच होऊ शकतो जो त्या विषयावर काम करतो,जलसिंचनचा अधिकारी महसुलाचा ज्ञानी असू शकत नाही, 👇
किंवा महसुलाचा अधिकारी ग्रहमंत्रालयाचा ज्ञानी असू शकत नाही,किंवा ग्रामविकास चा अधिकारी माहिती तंत्रज्ञानाचा ज्ञानी असू शकत नाही त्यामुळं अधिकारी वर्गांच्या बदल्या करताना महसुलचा अधिकारी माहिती तंत्रज्ञानात बदली केला जातो व इतर ठिकाणी ही असंच चालते,कारण त्यांना त्या विषयाचा 👇
काहीच अनुभव नसतो,
पर्यायाने ते क्षेत्र विकास करू शकत नाही त्यामुळं पीएएमओ अंतर्गत एक अशी संस्था बनवावी की सरकार बाहेरील ज्ञानी लोकं या संस्थेला जोडून विकास साधला जावा.
मोदीजी ही तयार झाले,या साठी बजेट ही तरतूद करण्यात आले कारण मोदीजी ही जाणून होते की टेलिकॉम क्षेत्रात काम 👇
करणारे सॅम पिट्रोदा,अमूल दूध अर्थात श्वेत क्रांती मध्ये कुरियन,स्पेस मध्ये विक्रम साराभाई,मिसाईल टेक्नॉलॉजी मध्ये अब्दुल कलाम,
हरितक्रांती मध्ये स्वामिनाथन,ही पाच माणसं कुठलेही सिव्हील सर्वन्ट नव्हते,जे काम यांनी केलं ते भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना जमले नाही ही भावना प्रशांत व 👇
मोदीजी दोघांची ही होती, पण कालांतराने या वर काम पूर्ण होत नाही असं दिसताच प्रशांत ने मोदीजी पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला,ही संस्था अस्तित्वात न येण्यासाठी अधिकारी वर्ग कंबर कसून होता,त्यात @BJP4India मधील काही नेत्यांनी ही प्रशांत किशोरच्या महत्वकांक्षा @PMOIndia च्या 👇
समकक्ष असल्याचे मोदींना सांगितले गेले असल्याची माहिती आहे,प्रशांतला वाटत होते की @AmitShah यांनी मोदीनां सांगून ही गोष्ट होऊ दिली नाही त्यावरूनच शाह-किशोर संघर्ष असल्याचे बोलले जाते,पण मोदींनी एस जयशंकर विदेश मंत्री,आश्विनी वैष्णव रेल्वे व आईटी मंत्री, 👇
या सह अन्य ठिकाणी प्रशांत किशोर ला अनुरूप त्याच विषयाचे ज्ञानी लोकं आणून कामाला सुरुवात केली आहे,पण एकदा ईगो हार्ट झाला की माणूस सूड भावनेने पेटतो त्या प्रमाणे प्रशांत हा स्वतःची फसवणूक झाली या भावनेने भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीवर आहे.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
