PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 25, 2021, 24 tweets

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात.

थेट बघा 📽️

@nsitharamanoffc @DrBhagwatKarad

📡थेट पहा 📡

केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची मुंबईत पत्रकार परिषद.

📽️

@nsitharamanoffc @DrBhagwatKarad

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचा आम्ही आढावा घेतला. तसेच #COVID19 शी संबंधित विविध पॅकेजेस आणि #AatmanirbharBharat पॅकेजच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला.

- प्रसारमध्यमांशी संवादादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची माहिती.

🎥

बँकांना निर्यात प्रोत्साहन संस्थांशी तसेच उद्योग आणि वाणिज्य संस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरुन निर्यातदारांच्या गरजा योग्य वेळेत पूर्ण केल्या जाऊ शकतील.

- मुंबईत माध्यमांशी संवाद साधतांना केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

भारतीय निर्यातदार संघटना महासंघाशी नियमित संपर्क आणि संवाद ठेवण्याचे निर्देशही बँकेना देण्यात आले आहेत, म्हणजे निर्यातदारांना विविध बँकर्सकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsithraman

बदलत्या काळानुसार आता उद्योगांना बाहेरच्या बँकिंग क्षेत्राकडून निधी उभारण्याचा पर्यायही आहे. बँका स्वतःही विविध मार्गांनी निधी उभारत आहेत. हे नवे पैलू अभ्यासून जिथे गरज आहे, तिथे पत उभारणीचे लक्ष्य ठेवण्याची गरज आहे.

-केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
📽️

काही विशिष्ट क्षेत्रातील उद्योगांना आधार देण्यात बँकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरु शकते, यावर आम्ही भर दिला. पंतप्रधानांनी सुचवल्याप्रमाणे, बँकांच्या आधाराने 'एक जिल्हा एक उत्पादन' ही योजना राबविण्यात त्यांना मदत केली जाऊ शकते.

- अर्थमंत्री @nsitharaman
#OneDistrictOneProduct

कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांनी काही उदयोन्मुख क्षेत्रांच्या विशेष गरजा समजून घेणे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे. जसे की फिन-टेक, हे असे क्षेत्र आहे जे बँकांना तंत्रज्ञानविषयक मदत करू शकते तसेच बँकिंग क्षेत्राचा त्यांना लाभ मिळू शकतो

- @nsitharaman

ईशान्य भारतातील प्रत्येक राज्यांसाठीच्या लॉजिस्टिक, निर्यातविषयक गरजा समजून घ्यायला हव्यात. जसे पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ईशान्य भारतातील सेंद्रिय फळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांनी सेंद्रिय फळबागा क्षेत्राच्या गरजा पूर्ण करायला हव्यात

-केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

पूर्वेकडील राज्यात, CASA ठेवींचे प्रमाण वाढले आहे. बँकांनी या प्रदेशाला अधिक पतविस्ताराची सुविधा द्यायला हवी. जेणेकरुन त्या प्रदेशातल्या व्यावसायिकांना वित्तीय सुविधेचा लाभ मिळेल.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

एकत्रितरित्या पाहिल्यास सर्व बँकाची कामगिरी चांगली आहे, त्यांनी सर्वांनी त्वरित सुधारणा करुन स्थिती सुधारली आहे

या सगळ्या बँकानी नफा दाखवला असून 2 बँकांची स्थिती फारच उत्तम आहे. आता आपल्या भांडवली खर्चासाठी स्वतः निधी उभा करु शकतो हे बँकांनी सिद्ध केले आहे

-केंद्रीय अर्थमंत्री

#COVID19 महामारीच्या काळात ग्राहकांच्या गरजा असूनही बँकांच्या विलीनीकरणाच्या अंमलबजावणीचा बँकांना फटका बसला नाही.

- मुंबईत माध्यमांशी संवाद साधतांना केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

🎥

फॅमिली पेन्शन आणि एनपीएस अंतर्गत मालकांचे/कंपन्यांचे योगदान वाढवण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याचे लाभ आता कौटुंबिक निवृत्तिवेतन धारकांना मिळतील.

- सचिव, @DFS_India

वेतनावरील(पे) मर्यादा हटवण्यात आली असून आता 30 टक्क्यांचा एकसमान स्तर लागू केला जाईल. आता निवृत्तिवेतन ₹ 35000 पर्यंत वाढवले जाऊ शकेल.

- सचिव, @DFS_India

एनपीएस मध्ये बँकेतर्फे देखील दिल्या जाणाऱ्या योगदानात 40% वाढ होणार आहे. ही वाढ 10% वरुन 14 % पर्यंत वाढेल.

- सचिव, @DFS_India

सीमाशुल्क विभागाने #COVID19 च्या काळात जे अथक परिश्रम केले तसेच महत्वाच्या साहित्याला लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी विशेष काम केले, ते कौतुकास्पद आहे. जीएसटी विभागाच्या अतुलनीय कामाशिवाय दर महिन्याला एक लाख कोटी रुपयांचा महसूल संकलित होणे शक्य झाले नसते

- केंद्रीय अर्थमंत्री

ऑक्टोबर 19 ते मार्च 21 दरम्यान बँकांनी ग्राहक संपर्क उपक्रम राबवले आणि RAM (किरकोळ, कृषी तसेच एमएसएमई) क्षेत्रांच्या पतपुरवठ्याच्या गरजा पूर्ण केल्या

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

@nsitharamanoffc

🎥

याअंतर्गत, 4.94 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यावर्षी देखील आम्ही पतपुरवठ्यासाठी जन संपर्क अभियान सुरु करणार असून ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होईल.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

परदेशातील कंपन्यांची बाजारात थेट नोंदणी (लिस्टिंग) करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. तसेच, कायदेशीर सुधारणांच्या मार्गाने भारताबाहेर रोख्यांचे व्यवहार सुरळीत होणे सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

- तरुण बजाज, महसूल सचिव

आम्ही #NMP च्या माध्यमातून काहीही 'विकत नाही' आहोत. तसेच ज्यांचे चलनीकरण होणार आहे, अशा सर्व मालमत्तांच्या बदल्यात सरकारला काही मिळणार आहे.

राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाईन धोरणाविषयी माध्यमांसमोर केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांचे स्पष्टीकरण

📽️

आम्ही चलनीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून उपयोगात नसलेल्या ब्राऊनफिल्ड (निरुपयोगी) मालमत्तांचा चांगला वापर करतो आहोत.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

आयुर्विमा, सामान्य विमा आणि पुनर्विमा ही अत्यंत महत्वाची अशी क्षेत्रे आहेत, जिथे सरकारचे (जरी कमीतकमी) अस्तित्व कायम राहणार आहे.

त्याशिवाय, सरकारला कर्मचाऱ्यांच्या चितांची जाणीव आहे आणि त्यांच्या हितांची सरकार नेहमीप्रमाणे काळजी घेईल.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#COVID19 काळात पुरवठा साखळीत अडथळे येत असूनही, महागाई दर 6% च्या खाली होता. डाळींच्या साठेबाजीला लगाम घालण्यासाठी तसेच इतर उपाययोजना करण्यासाठी आम्ही राज्य सरकारांशी समन्वय साधत आहोत

-केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांचा मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद

Unroll @threader_app

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling