PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 26, 2021, 13 tweets

#ShramevJayate

असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा @LabourMinistry करणार आरंभ

🗓️26 ऑगस्ट 2021
⏲️दुपारी 3 वाजता

@LabourDg @ilo
@byadavbjp @Rameswar_Teli

असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा @LabourMinistry करणार आरंभ

@LabourDg @ilo
@byadavbjp @Rameswar_Teli

#ShramevJayate

📡थेट पहा📡

@LabourMinistry च्या वतीने
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा आरंभ कार्यक्रम

#ShramevJayate

@ilo @byadavbjp

🎥

आपल्या देशातील 80 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रातील आहेत मात्र अद्याप त्यांची नोंदणी झालेली नाही. आज सुरू होणाऱ्या ई-श्रम पोर्टलच्या तंत्रज्ञानामुळे या कामगारांना या पोर्टलवर सहभागी करून घेता येईल अशी अपेक्षा आहे.

- अपूर्व चंद्रा, सचिव, @LabourMinistry

@byadavbjp

या पोर्टलमध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना सहभागी केल्यामुळे या कामगारांविषयीची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड, हाऊसिंग, #OneNationOneCard आदी लाभ या कामगारांना मिळण्यास मदत होईल

- अपूर्व चंद्रा, सचिव, @LabourMinistry

हे पोर्टल तयार करताना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा डेटा राज्य सरकारांसोबत सुद्धा सामायिक केला जाईल जेणेकरून संबंधित राज्य सरकारांना या कामगारांना लाभ देण्याच्या उद्देशाने आपल्या योजना करता येईल

-सचिव, @LabourMinistry

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी वारंवार नोंदणी करण्याची आवश्यकता मागणार नाही

- राज्यमंत्री @Rameswar_Teli

#ShramevJayate

@byadavbjp

सरकारने 2016-17 च्या अर्थसंकल्पा दरम्यान असंघटित क्षेत्रात डेटाबेस तयार करण्यासंदर्भात नमूद केले होते. त्यानुसार एक मोठी प्रक्रिया सुरू होती. आज हा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊन तो देशातील जनतेला समर्पित होत आहे. या प्रक्रियेतील संपूर्ण टीमचे धन्यवाद.

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

पंतप्रधान @narendramodi यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम साकारणे शक्य झाले.

या प्रकल्पासाठी केंद्राकडून या विभागाला 704 कोटी रुपये प्राप्त झाले तसेच तंत्रज्ञान साहाय्य देखील संबंधित विभागाकडून प्राप्त झाले

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

ई-श्रम पोर्टल म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या योजनांचे लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहचावेत यासाठीचे व्यासपीठ आहे

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

#ShramevJayate

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या आधार-संलग्न माहितीचा डेटाबेस सरकारकडे असेल. 'शेवटच्या घटकापर्यंत' पोचण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही एक सुरुवात आहे. नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवण्यात आली आहे

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

#ShramevJayate

केंद्रीय मंत्री @byadavbjp यांच्या हस्ते ई-श्रम
पोर्टलचे उदघाटन

#ShramevJayate

Unroll @threader_app

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling