PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 27, 2021, 13 tweets

स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या @PIBMumbai च्या वतीने वेबिनारचे आयोजन

विषय : "भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे योगदान"

🗓️आज, 27 ऑगस्ट 2021

⏲️दुपारी 12 वाजता

#IndiaAt75
#IconicWeek

📡थेट पहा📡

स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या @PIBMumbai च्या वतीने वेबिनारचे आयोजन

विषय : "भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे योगदान"

🎥

1757 ते 1857 दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी राजवटीविरोधात 300 बंडं झाली

- स्वातंत्र्यचळवळीत मुंबईची भूमिका यावरील @PIBMumbai's वेबिनारमध्ये स्तंभलेखक श्रीमती अनुराधा रानडे

लॉर्ड कॅनिंग याने शाही घोषणापत्र जारी केले ज्यामध्ये भारताचा राज्यकारभार इंग्लंडच्या राणीने हाती घेतल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणापत्रात भारतातील ब्रिटीश राजवटीचे भविष्यातील धोरण जाहीर करण्यात आले

- श्रीमती अनुराधा रानडे

@robmhgoa

ब्रिटिशांच्या विभाजनवादी आणि अन्याय्य धोरणांमुळे भारतात अनेक संघटना उदयाला आल्या, बॉम्बे प्रेसीडेन्सी असोसिएशन ही त्यापैकीच एक होती जिची स्थापना 1885 मध्ये झाली

- श्रीमती अनुराधा रानडे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मूळची भारतीय राष्ट्रीय युनियन होती मात्र 1885 मध्ये झालेल्या मुंबई अधिवेशनात तिचे नामकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करण्यात आले. हेअधिवेशन एलफिन्स्टनरोड जवळच्या काँग्रेस भवनात भरवण्यात आले. त्यात मुंबईतल्या 18 प्रतिनिधींसह 72 जण सहभागी झाले-श्रीमती रानडे

मुंबई हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र होतं, ब्रिटिश धोरणांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी ठिकाण म्हणून दक्षिण मुंबईचा वापर व्हायचा. मुंबईतील त्याकाळचे रहिवासी यासाठी महालक्ष्मी आणि चौपाटीसारख्या ठिकाणांचा मिठाच्या सत्याग्रहासाठी उपयोग करायचे- श्रीमती अरुणा पेंडसे

1942 मध्ये घडलेल्या घडामोडींमधून मुंबईच्या बहुरंगी आणि बहुजातीय स्वरुपाचे दर्शन घडले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींच्या प्रभावामुळे गुजराती व्यापारी समुदाय मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला. मराठी समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला

- प्रा. अरुणा पेंडसे

अरुणा असफ अली आणि उषा मेहता यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले. या चळवळींचा मुंबई हा केंद्रबिंदू राहिला मात्र, ती देशाच्या इतर भागातही पसरत गेली

- श्रीमती अरुणा पेंडसे

#AzadiKaAmritMahotsav

गांधी युगाशिवाय आपण स्वातंत्र्य चळवळीची कल्पना करू शकत नाही. मादाम कामा यांनी भारताचा स्वतःचा ध्वज असला पाहिजे याची पहिला ध्वज फडकावून प्रेरणा दिली. त्या मुंबईतील पारशी होत्या.

- डॉ. रोहिणी गवाणकर, 92 वर्षांच्या स्वातंत्र्य सैनिक

#IndiaAt75

1930-1940 दरम्यान मुंबईत महिलांनी केलेल्या स्वातंत्र्य चळवळीची पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी खूपच प्रशंसा केली आणि त्यांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले

- रोहिणी गवाणकर, स्वातंत्र्य सैनिक

🎥

पेरीन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनी ज्या दादाभाई नौरोजी यांच्या नाती होत्या, त्यांनी ब्रिटीश राजवट खिळखिळी करण्यासाठी, खादी लोकप्रिय करायला दारोदार जाऊन खादी विक्री केली. अशा महिलांचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग मुंबईने पाहिला आहे

-स्वातंत्र्य सैनिक रोहिणी गवाणकर
#AmritMahotsav

Unroll @threader_app

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling