PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 27, 2021, 8 tweets

.@NFAIOfficial चे ऑनलाईन फिल्म पोस्टर प्रदर्शन “चित्रांजली @ 75” चे केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि @kishanreddybjp यांच्या हस्ते उद्घाटन

#AzadiKaAmritMahotsav
#IndiaAt75

📙pib.gov.in/PressReleasePa…

#AzadiKaAmritMahotsav निमित्त “चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” 

या प्रदर्शनात 75 फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषेतील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत

यामध्ये सहा मराठी चित्रपटांचाही समावेश

#IndiaAt75

1948 मध्ये आलेला ‘वंदे मातरम्‌’ हा चित्रपट अतिशय महत्वाचा मानला जातो

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारीत या चित्रपटाची कथा असून, प्रख्यात लेखक ग.दि.माडगुळकर यांनी या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाणी लिहिली होती

#AzadiKaAmritMahotsav

भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिभावंत निर्माते दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा 'अमर भूपाळी' (1951) हा या प्रदर्शनातील आणखी एक मराठी चित्रपट!

'अमर भूपाळी' हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चरित्रपट मानला जातो.

#AzadiKaAmritMahotsav

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक, उमाजी नाईक!

ज्येष्ठ दिग्दर्शक गजानन जागीरदार यांनी 1960 मध्ये ‘उमाजी नाईक’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय ही तिन्ही सूत्रे सांभाळली होती.

#AzadiKaAmritMahotsav

“चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” यात असलेला आणखी एक मराठी चित्रपट म्हणजे '22 जून 1897'

22 जून 1897 (1979) हा चित्रपट ब्रिटिश सरकारचे अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आयएएस आणि लेफ्टनंट चार्ल्स एर्गटन आयर्स्ट यांच्या वधाच्या सत्यघटनेवर आधारित आहे

#IndiaAt75

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'वीर सावरकर' हा चित्रपट देखील या प्रदर्शनाचा भाग आहे

चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांनी 2001 मध्ये या चित्रपट दिग्दर्शित केला

#AzadiKaAmritMahotsav

थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित 'लोकमान्य एक युगपुरुष' हा या प्रदर्शनातील आणखी एक चित्रपट!

#AzadiKaAmritMahotsav

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling