PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Sep 16, 2021, 7 tweets

मंथन परिषदेची औरंगाबादमध्ये सुरुवात; तंत्रज्ञानाच्या मदतीने वित्तीय समावेशनाचे, केंद्र सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या परिषदेचे आयोजन

अर्थराज्यमंत्री @DrBhagwatKarad यांचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी संवाद, त्यात महाराष्ट्रात वित्तीय समावेशनावर विशेष भर

@InfoAurangabad

आधी लोकांना बँकेत जावे लागत असे, खाते उघडण्यासाठी 5000 ₹ खर्च करावे लागत. मात्र #PMJDY अंतर्गत बँक अधिकारीच लोकांकडे जाऊन बँक खाते उघडून देतात

- @DrBhagwatKarad मंथन परिषदेत संबोधित करताना

'जन धन च्या माध्यमातून नव्या युगातील व्यवहार करण्यास प्रेरणा' ही परिषदेची संकल्पना आहे

परिषदेचा भर अशा विकासोत्सुक जिल्ह्यात आर्थिक समावेशन करणे आहे जिथे अद्याप PMJDY अंतर्गत खाती उघडली गेली नाहीत. आतापर्यंत 80 ते 90% खाती उघडण्यात आली आहेत. आता आमचा भर अधिकाधिक लोकांना जनधन योजनेत सामावून घेण्यावर असेल जेणेकरून त्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल -अर्थराज्यमंत्री

जनधन, आधार आणि मोबाईल यांची जॅम ट्रिनिटी भारतात परिवर्तनकारक ठरली असून त्यामुळे भविष्यकालीन स्वरुपात आर्थिक समावेशन करण्यास सरकारला मदत झाली आहे.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांचे ‘मंथन’ मध्ये प्रतिपादन

आर्थिक मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याचा ज्यांना संकोच वाटत होता, जे साशंक होते त्या लोकांमध्ये पंतप्रधानांनी आत्मविश्वास निर्माण केला आणि आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य केले. पीएम जनधन योजना खाती जरी शून्य शिल्लक खाती असली तरी त्यामुळे आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचता आले-अर्थमंत्री

जनधनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समावेशनाचा आपल्याला #COVID19 सारख्या भयंकर आपत्तीच्या काळात खूप मोठा आधार मिळाला. अनेक लोक आणि लहान उद्योग यांना तारणविरहित कर्ज जनधनमुळेच मिळू शकले

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

आधार जोडणीमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला मदत प्रत्यक्ष घेऊन जाणे शक्य झाले. आधार बँक खात्यांशी जोडले गेल्यामुळे आम्हाला तात्काळ केवायसी लाभ मिळाले. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या जनधन खात्यात आणि पडताळणी झालेल्या खात्यात योजनांचे लाभ जमा करता आले-केंद्रीय अर्थमंत्री
@UIDAI

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling