PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 1, 2021, 10 tweets

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते हस्ते थोड्याच वेळात स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा होणार प्रारंभ

@SwachhBharatGov

🎥

सर्व शहरे कचरामुक्त आणि जल-संरक्षित करण्याच्या गरजेतून, स्वच्छ भारत मोहिम-नागरी 2.0 आणि अमृत 2.0 यांची आखणी करण्यात आली आहे

#AzadiKaAmritMahotsav
#SwachhBharat #AMRUT

@PMOIndia @HardeepSPuri
@MoHUA_India

📡थेट पहा📡

➡️पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा प्रारंभ

➡️सर्व शहरे कचरामुक्त व जलसंरक्षित करण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी

#AzadiKaAmritMahotsav #SwachhBharat #AMRUT

स्वच्छ भारत योजना नागरी 2.0

✔️सर्व शहरे कचरामुक्त करणे
✔️अमृतयोजनेअंतर्गत न येणाऱ्या सर्व शहरांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन 
✔️सर्व शहरी स्थानिक आस्थापना ओडीएफ+
✔️एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांना ओडीएफ++ करणे
✔️घनकचऱ्याचे जागच्याजागी वर्गीकरण

#SwachhBharat

अटल भारत योजना-नागरी अमृत 2.00

✔️सुमारे 4700 स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व घरांमध्ये 2.68 कोटी नळ जोडण्या देऊन 100% पाणीपुरवठा करणार

✔️500 शहरांत सांडपाणी वाहून नेणाऱ्या 2.64 कोटी जोडण्या

✔️पृष्ठभागावरील तसेच भूगर्भातील पाणी साठ्यांचे संवर्धन आणि संरक्षणाला चालना देणार

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा प्रारंभ

#AzadiKaAmritMahotsav #SwachhBharat #AMRUT

@SwachhBharatGov

🎥

2014 साली देशबांधवांनी भारताला उघड्यावरील शौचाच्या कुप्रथेपासून मुक्त करण्याचा संकल्प केला होता

10 कोटींपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती करत देशबांधवांनी हा संकल्प पूर्ण केला

आता 'स्वच्छ भारत अभियान-नागरी 2.0'चे उद्दिष्ट आहे कचरामुक्त शहर, कचऱ्याच्या ढिगापासून पूर्ण मुक्त शहर:PM

मिशन अमृतच्या पुढच्या टप्पात देशाचे लक्ष्य आहे-

‘सांडपाणी आणि मैला व्यवस्थापनात वाढ करणे, आपल्या शहरांना जल सुरक्षित शहरे बनवणे आणि आपल्या नद्यांमध्ये कुठेही नाल्याचे दूषित पाणी मिसळणार नाही, हे सुनिश्चित करणे

- पंतप्रधान @narendramodi

@amrut_MoHUA

🎥

आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की स्वच्छता एक दिवस, एक पंधरवडा, एक वर्ष किंवा काही ठराविक लोकांनी करायचं काम नाही

स्वच्छता ही प्रत्येकाचीच, दररोज, दर पंधरवड्याला, दरवर्षी कायम सुरु राहणारे महाअभियान आहे

स्वच्छता जीवनशैली आहे, स्वच्छता जीवन जगण्याचा मंत्र आहे

- पंतप्रधान

असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून, शहरी विकासावर डॉ बाबासाहेब आंबेडेकर यांचा विश्वास होता. #SwachhBharat अभियान आणि मिशन अमृतचा पुढचा टप्पा बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे

- पंतप्रधान @narendramodi

📙pib.gov.in/PressReleasePa…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling