ADITI Gujar Profile picture

Oct 2, 2021, 9 tweets

आजचे ज्ञान..

आज अख्खी ज्ञानामृताची बाटली घेऊन आले आहे🤣🤣🤣

तरी सर्वांनी लाभ घ्यावा.

स्वर्गात जायचे असेल तर आई चे पाय दाबून झोपत जा..
मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..

काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात..😌

काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..
फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात..

माझ्या काही नातेवाईकांचे फोन नंबर्स मी..
त्यांचा फोन कधीच न उचलण्यासाठी सेव्ह केलेत..🙂
त्यांनीही माझा नंबर त्यासाठीच सेव्ह केलाय..तो भाग वेगळा..😒

रडल्या नंतर मन मोकळं होवो ना होवो पण..
नाक मात्र नक्की मोकळं होत..🙂

चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य..
"माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं..😣😪

तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..
ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😝

कुंडली तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे..
मुलगा तर बिचारा कुठेही adjust करून घेतो..🤐

ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात..
त्यांना ट्रेकिंग ला जायची गरज नसते..😌

लग्नात..
मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली..या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😬

आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत..
सात च्या आत घरात येतात..🤭😣

ज्यांचं मन साफ असतं ना..
त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते..😶😬

जिथे मारामारी करणं शक्य नाही..
तिथे टोमणे तरी मारूनच यायचं..सोडायचं नाही अजिबात..😎

आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य..
मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...

वर्षभर Dp न बदलणारे..जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात..
तेव्हा समजून जायचं..कोणीतरी नवीन ' जेवलीस का ' add झाली आहे..😬

पोट आणि Ego कमी असेल तर..
माणूस कोणालाही मिठी मारू शकतो..🤭😜

गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना..
"तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?🤔😶

भिंतीलाही कान असतात म्हणणाऱ्यांनो..
तुम्ही ज्याच्यासोबत तुमचे सिक्रेट शेअर करता ना..
खरा पोस्टमन तर तोच असतो..🤭😬🏃

काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात..
फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.

आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो..
त्याला काहीच ऐकू येत नसतं..😅

जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल..तर
एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😶

जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो..तेव्हा गाणं गातो

नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे..😷😏

ज्ञान समाप्त...🙏🙏😂

( बाकी उद्या )

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling