ड्रग्स आणि दूर्दैवी राजकारण....
सध्या महाराष्ट्रात रोज पत्रकार परिषदा होत आहेत रोज मिडीया समोर नवीन नविन विधानं केली जात आहेत मेळावे झाले त्यात अनेक विधानं झाली आणि ह्या सगळयात विषय काय तर आर्यन खान वरील कारवाई महाराष्ट्रात सत्तेत असलेला प्रत्येक नेता हा फक्त ह्या ड्रग्स
+
प्रकरणाची बाजू घेताना दिसतो आहे खरं सांगायचं तर ड्रग्स चा मुददा ही शंभर टक्के राष्ट्रहित विरोधी व समाजविरोधी घटना आहे कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ह्या गोष्टीचं समर्थन होउच शकत नाही राजकारण करताना कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी राष्ट्र प्रथम ही भावनाच असायलाच हवी तुम्ही भाजप
+
विरोधी आहात रोज मोदींना-फडणवीसांना शिव्या द्या, काय वाट्टेल ते करा, तो तुमचा राजकिय अजेंडा असु शकतो पण ड्रग्स सारख्या मुद्दयांवर तुम्ही ड्रग्स माफियांची पाठराखण करता? वनस्पती काय, हर्बल तंबाखू काय, तो गांजाच नव्हता काय? तुम्ही त्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेवर आरोप करता हे ड्रग्स
+
मधून येणारे पैसे काय हॉस्पिटल बांधायला वापरतात का शाळा बांधायला वापरतात हा संपुर्ण पैसा तालिबान, पाकिस्तान फक्त आणि फक्त दहशतवादाकरताच वापरतात हे जगाला माहीत आहे तरीही तुम्ही ड्रग् माफियांची तळी उचलून धरता? आज शरद पवारांसारखा राष्ट्रीय नेता, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या
+
विरूद्ध एक शब्द उच्चारत नाहीत तेव्हा खरोखरच लाज वाटते! कीव येते ह्यांच्या राजकारणाची हेच चालू राहीलं तर साहेब तुमच्या माझ्या घरात मुलांच्या खिशात पुडया सापडायला वेळ लागणार नाही महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ कुठल्याच वर्तमान पत्रात ह्या विरूद्ध एक लेख लिहीला जात नाही? मिडीया
+
छापतंय काय तर आर्यन खान रडला शरम वाटायला पाहीजे पत्रकारांना अशा बातम्या छापायला हा कसला घंटा लोकशाहीचा चौथा स्तंभ!
खरं तर राष्ट्रीय तपास यंत्रणांवर इतक प्रेशर आलं पाहिजे की काय वाट्टेल ते करा पण हे प्रकरण तडीस नेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहीजे
ड्रग्स, दहशतवाद हे
+
मुद्दे हे १०० टक्के राष्ट्र विरोधी मुद्दे आहेत ह्याची थोडी चाड ठेवा साहेब
भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना कोणीही असो सगळ्यांच्याच वर आपला देश आहे
प्रथम राष्ट्र मग राजकारण ह्याचं थोडं भान ठेवा एवढीच विनंती..... 🙏🚩
@MilindG11975687
@thakkar_sameet
@VivekMore1712
@Abcd1234Man
@WaghamareVikas
@sagarshindetalk
@C_JackMh26
@PrakashGade13
@ShriRajTripute_
@TheAbhishek_IND
@LakhobaLokhande
@DChaurasia2312
@aher_narendra
@BJP4Maharashtra
@BJP4India
@BJP4Mumbai
@vikaspawar5
@BJP4PuneGramin
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
