डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाची, संघर्षाची, मानवी क्रांतीची धगधगती मशाल…
महारिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई इथे पार पडला.
आपण #LetsReadIndia च्या माध्यमातून अत्याधूनिक तंत्रज्ञानयुक्त #Library ऊभारण्याकामी खारीचा
१/१२
वाटा उचलला.
हे संपुर्ण स्मारकच अत्यंत आकर्षक असून त्यात बाबासांहेबांच्या जीवनप्रवासवर अत्यंत वेगळे आणि सुंदर संग्रहालय, तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे.
इथे वाचनालयात बाबासाहेबांविषयी पाच हजारावर पुस्तके तसेच ऑडीयो , व्हीडीओ आणि इबुक्स तर आहेतच शिवाय या सर्वांचे नियमन
२/१२
तसेच पुस्तकांचे आदानप्रदान करण्यासाठी आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचे स्पेशल सॅाफ्टवेअर, आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी बुक बारकोडींग यंत्रणा, तसेच इतर सर्व आधूनिक तांत्रिक बाबी दिलेल्या आहेत.
हे अशा प्रकारचे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांवरील पहिलेच स्मारक असेल जिथे इतक्या अत्याधूनिक
३/१२
सुविधा तसेच बैठकव्यवस्थेसह त्यांच्या जीवनाचा अभ्यास करता येईल.
वाचनालयाची अंतर्गत व्यवस्था ही जागतिक पातळीवर गणली जाईल इतक्या उच्च पातळीची असून आपण सर्वांनी नक्की भेट द्यावी असे आहे.
आपल्या #LetsReadIndia ला ही संधी दिल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका @NMMConline तसेच
४/१२
महानगरपालिका आयुक्त श्री अभिजित बांगर साहेब @abhijitbangar आणि इतर सर्व मान्यवरांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
या वाचनालयातून नक्कीच आपण नवी पिढी घडवू तसेच विद्यार्थी आणि तरूण वर्गाला वाचनाची गोडी लागेल असे उपक्रम राबवत राहू.
वाचनचळवळ वाढावी, रूजावी तसेच त्यातून सशक्त
५/१२
समाजनिर्मीती आणि ज्ञानाची वाट जी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दाखवलीये ती प्रत्येकाला मिळावी ही अपेक्षा.
यात बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित १८ प्रकारची विविध विषयांवरील पुस्तक आपल्याला अभ्यासायला मिळतील.
• डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र (BIOGRAPHY)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६/१२
लिखित लेखसंग्रह (ARTICLE BOOKS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थशास्त्र (ECONOMICS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जलनिती (WATER VISIONS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व समीक्षा (SPEECHES & REVIEWS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय धोरणात्मक विचार
७/१२
(NATIONAL / INTERNATIONAL POLICIES)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता व विविध धर्मांचा अभ्यास (HUMANITY & RELIGIONS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक विचार (EDUCATIONAL THOUGHTS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कायदे/विधी
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान (CONSTITUTION)
८/१२
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय विचार व लेखन (POLITICAL THOUGHTS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार व लेखन (SOCIAL THOUGHTS)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि… (DR. BABASAHEB AMBEDKAR &)
• आंबेडकरी चळवळ (AMBEDKARI MOVEMENTS)
• आंबेडकरी साहित्य (AMBEDKARI LITERATURE)
९/१२
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील शासकीय प्रकाशने (GOVERNMENT PUBLICATIONS)
• इतर महनीय व्यक्ती चरित्रे (BOOKS ON WELLKNOWN PERSONALITIES)
• बुध्द आणि धम्म (BUDDHA & DHAMMA)
• डॅा. बाबासाहेब आंबेडकरांवरील विविध व्हीडीओज् , ॲाडीयो बुक्स तसेच इबुक्स.
१०/१२
पुस्तकं, वाचन, चिंतन आणि मनन असं वर्तुळ पुर्ण करणारे महामानव,बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील या वाचनालयासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
आपल्या सर्वांची साथ,सोबत आणि विश्वास ही आमची महत्वाची प्रेरणा आहे.
हा समाज खऱ्या
११/१२
अर्थाने एकत्र पुढे जायचा असेल, प्रगल्भ आणि विकसित करायचा असेल तर वाचनाला पर्याय नाही.
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.
आपण या वाचनालय आणि स्मारकाबद्दल @NMMConline ट्विटरहॅंडलवरून अधिक माहिती घेऊ शकता.
#LetsReadIndia #ThanksDrAmbedkar
१२/१२
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.