Yugaantar Profile picture
The soul of bhart, echos from the coast of Goa in voice of Gomantakiy youth !

Jan 24, 2022, 6 tweets

भगवान परशूराम यांचे मंदिर गोव्यातील काणकोण तालुक्यात पैंगीण येथे स्थित आहे. असं मानल जातं की श्री. परशूरामाने सात वेळा पाशुपतास्त्र समुद्रावर सोडून सात कोंकण प्रदेश निर्माण केले.त्यामुळे कोंकणभुमीचे मंगल दैवत म्हणून भगवान परशूरामाचे पूजन केले जाते.
#OurTrueHistory
@ShefVaidya

असं मानलं जातं की देवी पार्वती महादेवांचा शोध घेत अघनाशीनी नदी काठी तपच्छर्या करू लागली.भगवान प्रसन्न होऊन भयंकर व्याघ्र रूपात प्रकट झाले.देवींनी "त्राही मां गिरीश"असा पुकारा सुरू केला.भगवान शिव मुळ रूपात प्रकट झाले.पार्वतीने त्यांना मांगिरीश या नावाने इथेच राहाण्याची विनंती केली

या मंदिराचे छप्पर ताम्रपत्र्यांनी मढवलेले आहे.या देवीची अख्यायिका अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्नांच्या वाटणीच्या वेळी देवदैत्यांमध्ये झालेले युध्द मिटवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले तोच श्री महालसा देवीचा अवतार मानला जातो.
#OurTrueHistory

श्री.कामाक्षी मंदिर शिरोडा गावात वसलेलं आहे.संपूर्ण भारतात कामाक्षीची केवळ दोन मंदिरे आढळतात.एक गोव्यात तर दूसरं आसाम मध्ये कामाख्या मंदिर.पण दोघांबद्दलच्या आख्यायिका भिन्न आहेत.हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध असून दर अमावस्येला इथे संपूर्ण गोव्यातील भाविक उपस्थित असतात.
#OurTrueHistory

हे मंदिर नार्वे गावात आहे.कदंब राजांची कुलदेवता असलेल हे मंदिर अनेक शासकांनी उध्वस्त केले. मंदिराचे आजचे जे रूप आहे ते १६६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुर्नप्रतिष्ठापित केलेले मंदिर आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी देखिल मंदिराला भेट दिली होती असा उल्लेख सापडतो.#OurTrueHistory

श्री.शांतादुर्गा मंदिर देवी गोव्यातील प्रत्येक तालूक्यामध्ये त्या-त्या गावची निवासिनी देवी म्हणून पूजली जाते.कवळे येथील मंदिराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या अष्ट्प्रधान मंडळाने केली होती. #OurTrueHistory

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling