PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 18, 2022, 13 tweets

केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मुंबईत रत्न आणि जवाहिरे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे आयोजित "आयआयजेएस सिग्नेचर 2022" प्रदर्शनाचे उद्घाटन

IIJS सिग्नेचर2022,या प्रदर्शनाचे, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

केंद्रीय राज्यमंत्री पुरुरषोत्तम रुपाला आणि श्रीमती दर्शना जरदोश देखील राहणार उपस्थित

@DoC_GoI @GJEPCIndia
@PiyushGoyal @PRupala
@DarshanaJardosh

🎥

भारतीय आंतरराष्ट्रीय आभूषण परिषदेच्या सिग्नेचर 2022च्या उदघाटन समारंभात सहभागी होताना विशेष आनंद होत आहे

IIJS सिग्नेचर 2022 हा सराफा व्यपार क्षेत्रात खरोखरच एक वेगळं स्थान असलेला कार्यक्रम असून या क्षेत्राचं कौशल्य या कार्यक्रमातून जगासमोर येतं

-केंद्रीय मंत्री @PiyushGoyal

आपल्या समाजात आभूषणे प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जाते. आभूषणे तयार करण्याचे कौशल्य भारतीय कुटुंबांत पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. या समृद्ध परंपरेमुळे आपल्या दागिन्यांचे सौंदर्य,नजाकत, सौंदर्य व्यक्त करण्याची त्यांची खासियत अद्वितीय आहे

-केंद्रीय मंत्री @PiyushGoyal
@PiyushGoyalOffc

पंतप्रधान @NarendraModi यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताला आभूषणे आणि जवाहिरे क्षेत्रात आत्मनिर्भर बनायचे आहे

आपल्याला हा सराफा व्यवसाय आत्मनिर्भर करण्याचा आहे आणि त्यासाठीच या क्षेत्राची देशांतर्गत वाढ आणि निर्यात प्रोत्साहन या दोन्हीवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे-@PiyushGoyal

जानेवारी 2022 पर्यंतच रत्न आणि आभूषण निर्यात 32 अब्ज डॉलर झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे यावर्षी ही निर्यात 40 अब्ज डॉलर इतकी होईल.

2019-20 च्या #COVID काळाच्या तुलनेत, ही जवळपास 6.5% टक्के वाढ असेल

- केंद्रीय मंत्री @PiyushGoyal

आज भारत-यूएई सीईपीए या क्षेत्रासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण येत्या काळात त्यामुळे वाढीला चालना मिळणार आहे

उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्रांमुळे @makeinindia चे लक्ष्य गाठण्यात मोलाची मदत होणार आहे

- केंद्रीय मंत्री @PiyushGoyal

आता आपण जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रात जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी देशांतर्गत बाजार आणि निर्यात बाजारातही अधिक मोठे लक्ष्य निश्चित करायला हवे.

आपण जागतिक संधींकडे बघायलाच हवं आहे, खरं तर आपण या संधी निर्माणही करायला हव्यात

- @PiyushGoyal

भारत-यूएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आणि तशाच प्रकारचे इतर व्यापारी करार देशातील सराफा उद्योगासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहेत

आभूषणे आणि जवाहिरे उद्योगाला आपल्या देशात एक समृद्ध परंपरा आहे तसेच या उद्योगातून अनेक कुशल कारागीरांना रोजगार मिळाला आहे

-केंद्रीय मंत्री @PRupala

आभूषणे आणि रत्ने क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आणण्यास सुरुवात झाली आहे

नवे खाणकाम तंत्रज्ञान देखील या क्षेत्रावर आणि त्याच्या उत्पादनांच्या निर्यातीवर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरेल

#Budget2022 मधील तरतुदी देखील या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतील

- केंद्रीय मंत्री @PRupala

पंतप्रधान @narendramodi यांनी #AatmaNirbharBharat या मंत्रातून देशातील उद्योजकांना कायम प्रोत्साहन दिले आहे

आज जगभरात सगळीकडे भारतीय युवकांना संधींची दारे खुली होत आहेत

#Budget2022 मध्ये सर्व उद्योग घटकांचा लाभ मिळेल अशा तरतुदी आहेत

: केंद्रीय मंत्री @PRupala

@makeinindia

#Budget2022 अशावेळी सादर करण्यात आले जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त #AmritMahotsav साजरा करत आहोत, या अर्थसंकल्पात @nsitharaman यांनी हिरे तसेच आभूषणे आणि रत्ने क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा विशेष उल्लेख केला

- @DarshanaJardosh

रत्ने आणि आभूषण क्षेत्र देशाच्या निर्यातीचा महत्वाचा भाग आहे. जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात ते महत्वाची भूमिका बजावते

- केंद्रीय राज्यमंत्री @DarshanaJardosh

@GJEPCIndia च्या भारतीय आंतरराष्ट्रीय आभूषण परिषद सिग्नेचर 2022च्या उद्घाटन प्रसंगी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling