PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 18, 2022, 10 tweets

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar यांच्या हस्ते नाशिक येथे फिरती बायोसेफ्टी लेव्हल प्रयोगशाळेचे उद्घाटन

@ICMRDELHI चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांची याप्रसंगी उपस्थिती

पाहा:

सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे #COVID19 सारखे इतरही संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय मंत्री @DrBharatippawar यांच्या हस्ते नाशिक येथे लोकार्पण.

मोबाईल व्हॅन निर्मितीसाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च

BSL-3 प्रयोगशाळेसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

महाराष्ट्रासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे. यामुळे निदान करणे सुलभ होईल-केंद्रीय मंत्री @DrBharatippawar

केंद्रीय मंत्री @DrBharatippawar यांनी नाशिक येथे BSL-3 फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटनाप्रसंगी निरीक्षण केले.

@ICMRDELHI च्या संशोधन प्रक्रियेबद्दल यांनी यावेळी सविस्तर माहिती घेतली.

BSL-3 एक अत्याधुनिक स्वयंपूर्ण प्रयोगशाळा आहे.

ही प्रयोगशाळा हवाबंद असून, तिथे प्रवेश नियंत्रित आणि जैव-संसर्ग प्रतिबंधक असेल. या प्रयोगशाळेमुळे देशाच्या दुर्गम भागात विशेष प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्य आणि प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी करतील.

दक्षिण आशियाई क्षेत्रातील अशाप्रकारची ही पहिलीच फिरती प्रयोगशाळा आहे. पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेतून या व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या विषाणूंचे परीक्षण BSL-3 प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात येतील- डॉ भार्गव, DG @ICMRDELHI

भारताने कोरोना संकट काळात अन्नधान्याची मदत सर्व स्तरावर पुरवत असताना आजाराशी लढण्यासंदर्भात योग्य नियोजन तयार केले.

कोरोना लस निर्मितीनंतर शीतसाखळीच्या माध्यमातून देशभर पोहोचवण्यात यश- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar

BSL-3 प्रयोगशाळेमुळे विषाणूचा प्रसार रोखण्यात मदत होईल.

देशातील सर्वात मोठी योजना असलेल्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM - ABHIM ) च्या अंतर्गत या प्रयोगशाळेची निर्मिती-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar

BSL-3 प्रयोगशाळा मोठ्या आरोग्यसेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील. या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टिमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील.

आज नाशिक येथे केंद्रीय मंत्री @DrBharatippawar यांच्या हस्ते लोकार्पण.

लवकरच देशभर अशाप्रकारच्या (BSL-3) 4 प्रयोगशाळा निर्माण करणार-केंद्रीय मंत्री @DrBharatippawar

दुर्गम भागात BSL-3 प्रयोगशाळा वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान व अहवाल देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दुर्गम व आदिवासी भागातील सामान्य लोकांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling