शिवाजी महाराजांवर हिंदी, राजस्थानी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्ये पण काही सुंदर पण अप्रसिद्ध स्तुतिकाव्य आहेत.
हिंदी राष्ट्रकवी मैथैलीशरण गुप्त (१८वे शतक) हे त्यांच्या 'भारत-भारती' ह्या काव्यकृतीमध्ये शिवाजी महाराजांचे यथायोग्य वर्णन करतात :
बस 'सिंह' कह देना अलम!
#म #शिवजयंती
मात-भूमि भक्ति-सक्ति अविचल साहस की,
सहित प्रमाण प्रतिपादि छिति छाजी है !
राना मूल-मंत्र जो स्वतंत्रता प्रकास किजो,
ताकी महाभास कियो सरजा सिवाजी है !!
जगन्नाथदास 'रत्नाकर (वीराष्टक, छत्रपति शिवाजी, छन्द १)
डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर ह्या संस्कृत साहित्यकार विद्वानाने शिवाजी महाराजांवर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते "श्रीशिवराज्योदयम्" नावाचे महाकाव्य लिहिले आहे.
हे महाकाव्य आज UPSC च्या संस्कृत विषयासाठी सन्धर्भग्रंथ म्हणून वापरले जाते..
In what far-off country, upon what obscure day
I know not now,
Seated in the gloom of some Mahratta mountain-wood
O King Shivaji,
Lighting thy brow, like a lightning flash,
This thought descended,
Into one virtuous rule, this divided broken distracted India,
I shall bind.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लिहितात..
“हे राजा शिवाजी,
कोण जाणे, कधी काळी मराठ्यांच्या देशी,
कडेकपारीतील रानीवनी अंधारात,
विद्युल्लतेसारखी चमकून गेली तुझ्या मनी प्रतिज्ञा,
विस्कटलेल्या, विदीर्ण झालेल्या भारत देशाला मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन!”
कवीराज भूषण लिहितात..
अग्नी जसा वृक्षाचा,
चित्ता जसा हरणांच्या कळपाचा,
सिंह जसा हत्तीचा,
सूर्य जसा अंधाराचा,
कृष्ण जसा कंसाचा,
तसा शेर शिवाजी म्लेंच्छाचा संहारक आहे.
(शिवभूषण ह्या ग्रंथातील एक छंद).
हेच कविराज भूषण ब्रज भाषेत (सध्याच्या उत्तर प्रदेशातील यमुना काठच्या ब्रज प्रांतातील बोली भाषा) लिहितात की,
जर शिवाजी राजे नसते तर अत्याचारी मोघलांनी मथुरा उध्वस्त करून (यमुने काठचा हिंदू प्रदेश) हिंदू धर्माचा नामोनिशाण सुद्धा ठेवले नसते..
"सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी"
पंजाबी भाषेत 'इह मुंडा निरा शनिचरी' असं एक गीत आहे..
त्यात एक आई एका पंडिताला विचारते की तिचा मुलगा मोठा होऊन प्रताप आणि शिवाजीसारखा भारतवीर होईल का?
असे अनेक गीते हरयाणवी आणि पंजाबी भाषेत आजही गायली जातात.
स्वामी विवेकानंद इंग्रजीमध्ये म्हणतात..
“शिवाजीपेक्षा मोठा वीर, मोठा संत, मोठा भक्त आणि मोठा राजा आहे का?
राष्ट्राच्या खऱ्या चेतनेचे प्रतिनिधित्व करणारा तो भारताचा खरा सुपुत्र होता.”
इतिहासकार जदुनाथ सिरकारांना राजस्थानातील डिंगल भाषेत सुद्धा शिवाजी महाराजांची पत्रे/स्तुतिकाव्ये आढळली.
त्यांनी राम सिंह ह्यांचे दरबारातील दस्तऐवज सादर केले आहेत.. औरंगजेबाचा किस्सा पण आहे - ज्यात ते बादशहाला महाराजांविषयी म्हणाले होते..
“जंगल का शेर गर्मी से बेकाबू हो गया है”
उत्तरेकडील एका राज्यातल्या, सेंट्रल बोर्डच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या तरुणाची शिवाजी महाराजांवरचे पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया आहे..
Shivaji maharaj..
- Under-rated legend
- Sheer determination
- Will power
- Simplicity
- Courage
- Respect
- The greatest man in the history
आणि शिवाजी महाराजांवर मराठी मध्ये असलेल्या अनेक काव्य आणि आरत्यांपैकी माझी आवडत्या आरतीचे हे काही कडवे आहेत..
ही आरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महाराजांच्या स्तुतीपर काव्यात गुंफली आहे.
मर्द मराठा वीर शिवाजी,
अवतरले जगती, तानाजी शिवाजी ।।
#शिवजयंती #म
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.