PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Mar 1, 2022, 8 tweets

बुकारेस्टहून 182 भारतीय नागरिकांना घेऊन #AirIndiaExpress IX 1202 विमान मुंबईत दाखल.

मायदेशी परतलेल्या प्रवाशांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत.

#OperationGanga 🧵

#OperationGanga

182 भारतीय नागरीक एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज मुंबईत दाखल,

मायदेशी परतलेल्या प्रवाशांचे विमानतळावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत.

ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत आज 182 भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विशेष विमान मुंबईत दाखल.

विमानतळावर प्रवाशांच्या सुविधेसाठी मदतकक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करुन त्यांच्याशी संवाद साधला

#OperationGanga

#OperationGanga मोहिमेअंतर्गत भारतीयांना #Ukraine मधून मायदेशी आणण्यात येत आहे. आज 182 विद्यार्थी दाखल झाले. सरकारच्या वतीने मी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारांनी व्यवस्था केली आहे- केंद्रीय मंत्री @MeNarayanRane

विद्यार्थी थोडे दडपणाखाली जाणवत होते, त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला.

भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधानांनी 4 मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून पाठवले आहे-केंद्रीय मंत्री @MeNarayanRane

#OperationGanga

"भारतीय दुतावासाच्या संपर्काने आम्ही सीमेवर पोहोचलो, तेथून आम्हाला विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. मायदेशी परतल्याचा आनंद शब्दातीत आहे", विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना.

#OperationGanga

#Ukraine मधून 182 भारतीय नागरिकांना घेऊन येणारे 7 वे विशेष विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यावर असलेले दडपण दूर केले.

#ऑपरेशनगंगा

भारतीय नागरिकांना युक्रेनची शेजारी राष्ट्रे हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोवाकिया येथून मायदेशी आणण्यात येत आहे.

मुंबई विमानतळावर विविध राज्यांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्कची व्यवस्था करण्यात आली आहे.

#OperationGanga

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling