लिफ्ट.!
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,"अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?"
त्याचा इशारा तिला समजला होता! वासना त्याच्या डोळ्यात दिसत होती.
तिने हळूच त्याच्या हाताला घट्ट पकडुन म्हटले,"नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात, गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही".... आणि तिने हात अजून घट्ट केला! त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता!
हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो, असं म्हणून तो खाली उतरला आणि तिथून सुसाट पळत सुटला!
दहा मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली! चार मुली अजून झाडी झुडपातून बाहेर आल्या! आता पाचही जणी कार मधे बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली!
ती म्हणाली, "भित्रे असतात ग हे पुरुष, फक्त आपल्याला त्या भीतीची जाणीव करून द्यावी लागते! शक्ती जरी त्यांच्या कडे असली तरी आपल्याकडे निसर्गाने मेंदू दिलाय आपले संरक्षण करायला."
थोडे पुढे गेल्यावर तो पळताना दिसला! त्याच्या जवळ गाडी नेऊन तिने विचारले,"बसतोस का गाडीत?"
त्याने त्या दिशेने पाहता आता त्याला एकीच्या जागी पांच .... हडळ एकत्र दिसताच त्याला घाम फुटला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन पडला!
😁😁😁
मुळ लेखक माहीत नाही.!😋
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
