Preeti Thakur Profile picture
Collecting moments, not things | Adventure awaits 🌍 📸Capturing happiness one photo at a time, Care, laugh, live No DM 😡
Jun 19, 2023 9 tweets 2 min read
एक लव्ह जिहाद चा किस्सा.
एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली. आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना.
दोघे हतबल झाले. मग एका मित्राला विचारले. मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले.
सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे. आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली...
त्या पोराचे अधून मधून फोन चालूच....
मित्राने त्या मुलीला साईड ला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले... मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहेस ना.. मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे...
पुस्तकाचे नाव
not without my daughter मराठी अनुवाद.
Jun 19, 2023 6 tweets 1 min read
आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदास यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केला जाते.कालिदास हे संस्कृत कवी,रचनाकार,नाटककार होते. 'उपमा'  या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानवआणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत Image कालिदासांच्या रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्‌, ऋतुसंहार या रचना विशेष गाजल्या.
एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे आणि उन्नत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब कालिदासांच्या साहित्यातून उमटलेले दिसते.
Apr 14, 2023 7 tweets 2 min read
*सत्य घटना*
मी आज हड़पसर हुन हिंजेवडी कड़े, जाण्यासाठी रात्री 8-15 च्या सुमारास घरी जात असताना, रेसकोर्स च्या जवळपास उजवीकडे वळायला लागलो तेव्हा एका पोलिसाने मला कार थांबवण्याचा इशारा केला.
मी कार थांबवताच त्याने मला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. मी डिकी आतून उघडली आणि खाली उतरायला लागलो पण पोलिस म्हणाले, “ठीक आहे, तू जाऊ शकतोस.” नंतर मी माझी कार सुरु केली आणि ड्राईव्हिंग करण्यास सुरवात केली, पण माझ्या मनात काहीतरी गडगडले.
माझ्या मागील दृश्यातल्या आरशातून मी पोलिसां पैकी एकाला ताबडतोब फोनवर बोलताना पाहिले.
Mar 28, 2023 10 tweets 2 min read
*स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....*
दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, *भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त* होते.
Mar 21, 2023 11 tweets 2 min read
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं, अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
Feb 24, 2023 6 tweets 2 min read
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे, ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
Jan 24, 2023 9 tweets 2 min read
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती. आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
Jan 10, 2023 6 tweets 1 min read
जुनी शहाणी माणसं !!....
१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'
३.वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
४.रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची,
Dec 28, 2022 10 tweets 2 min read
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले. अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
Sep 24, 2022 6 tweets 2 min read
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते. बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.

ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
Sep 6, 2022 4 tweets 1 min read
*बोधकथा : पैसा* 🏮
सत्तर हजार कोटींचा मालक सायरस मिस्त्री रिकाम्या हाती गेला... भाऊ तू सत्तर रुपयांचा मालक असलास तरी रिकामाच जाणार आहेस.
फक्त सायरस आणि तुझ्यात एवढाच फरक असेल की सायरस गेला तरी त्याची बायका पोरं रस्त्यावर येणार नाहीत. दहा पिढ्या बसून खातील. इथे तू गेल्यावर तुझ्या घरच्यांचा बँड वाजलेला असेल. मानसिक धक्क्या पलीकडचा आर्थिक झटका सोसवताना त्यांची अनेक वर्ष निघून जातील. सगळं पुन्हा शून्यातून उभं करावं लागेल.
आनंदाने जगावं वगैरे लॉजिक सांगू नकोस. पैसे कमावणं थांबव कोण किती आनंदात जगतं हे लगेच कळेल.
Sep 6, 2022 4 tweets 1 min read
सिनेमा चालणे न चालणे याची कबर मल्टिप्लेक्स ने खोदली आहे, १९९९ ला एकाच वेळी गोविंदा,अमिताभ बच्चन, आमिर खान, मिथुन, फरदिन खान,अक्षय खन्ना यांचे सिनेमा बघू शकत होतो.सिनेमा हिट होत होती कारण तिकीट २५ ₹ stall आणि बाल्कनी ४० होती. लोकं परिवार घेऊन कुठला ही कधी ही सिनेमा पाहू शकत होती. आज विचार करावा लागतो ४ पिक्चर रिलिज होतात त्यात एक सिनेमा म्हणजे १२०० मध्ये ४ तिकीट, २०० चे पॉपकॉर्न, १८० चे समोसा, २० ₹ पार्किंग,एवढं सगळं करून फिल्म बेकार असते.
मग तुम्हीच सांगा हे Boycott वगैरे सगळं बाजुला केला तरी आज सामान्य माणसाच्या हातात आहे का सिनेमा थिएटर मध्ये जाऊन
Aug 9, 2022 6 tweets 4 min read
स्वतःला Mr Perfectionist म्हणवून घेतो आमीर खान. Perfectionist बनण्या आधी स्वताचे काही असावे लागते.

आमीर खान चे खालील सिनेमे आणि ते कुठून कॉपी केले आहे याची लिस्ट बघा, जर बॉलीवुड चा Mr Perfectionist असा आहे तर इतर हीरो कसे असतिल यावर बोलायला देखील नको.
ज्या दिशेने बॉलीवुड जात आहे येत्या दोन वर्षातच अशी परिस्थिती निर्माण होईल की बॉलीवुड boycott करण्याची देखील गरज नसेल, ते चित्रपट कोणी बघणारच नाही.
चीन मधील काही बातमीपत्र आणि अधिकार्‍यांनी लाल सिंह चड्डा ची स्तुति केली आहे आणि येत्या काही दिवसांत तो चित्रपट चीन मध्ये कसे 1000 कोटी कमवेल हे दाखवले जाईल.
Jun 18, 2022 8 tweets 2 min read
पहिली गोष्ट अग्निपथ ही योजना केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने डिझाईन केल्याली नसून आर्मीच्या मानव संसाधन विभागाने बनवलेली आहे.अग्निपथ अंतर्गत साडे सतरा ते २१ वयोगटातील १०० जणांना ट्रेनिंग देऊन आर्मीमध्ये सहभागी केलं जाईल,४ वर्ष त्यांचं काम पाहून त्यातील योग्य २५ जणांना परमानेंट नोकरी दिली जाईल आणि बाकीच्या ७५ जाणांना निवृत्त केलं जाईल,पुन्हा दूसऱ्या बॅच मधील १०० पैकी २५ योग्य जणांना कायमस्वरूपी नोकरी देऊन ७५ जणांना निवृत्त केलं जाईल.
यादरम्यान पहिल्या वर्षी त्यांना ३०,००० रूपये प्रतिमाहिना पगार भेटेल ज्यात दरवर्षी वाढ केली जाईल
Jun 18, 2022 4 tweets 1 min read
MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि पदरी निराशा येते.
त्या ऐवजी... १० + २ + ३ वर्षाची कोणतीही पदवी घ्या...
अग्नीवीर व्हा. चार वर्षात शरीर, मन कणखर करा...
उत्तम पर्फोर्म केले पूर्ण वेळ सैन्यात जाल... सामान्य पर्फोर्म केले तरी हरकत नाही बाहेर पडताना खिशात १२ ते १५ लाख असतील.. वय असेल २५ .
रसरशीत तारुण्य , दणकट शरीर , कणखर मन आणि खिशात पैसे कोणताही व्यवसाय सुरु करा, शेती मध्ये पैसे घाला आणि राबा कुणाच्याही पाया पडायची गरज नाही.. आई बापांना मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाही
Apr 15, 2022 9 tweets 2 min read
तो सध्या काय करतो ?
हे काय विचारणं झालं, तो फुल्ल बिझी असतो .
सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती . ईकडुन १०० ची नोट घेतो, येवढ्यात काय होनार? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो , गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो
मग थाटात एक पौष्टिक तर्रीवाली मिसळ चार पाव खातो. मग चौकात येऊन गन्या, आंड्या, र्हावल्याला फोन लावतो .ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या,
Mar 21, 2022 5 tweets 1 min read
लिफ्ट.!
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,"अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?"
त्याचा इशारा तिला समजला होता! वासना त्याच्या डोळ्यात दिसत होती. तिने हळूच त्याच्या हाताला घट्ट पकडुन म्हटले,"नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात, गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही".... आणि तिने हात अजून घट्ट केला! त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता!
Mar 21, 2022 4 tweets 1 min read
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत. १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
Mar 8, 2022 13 tweets 2 min read
मै अपनीं फेवरेट हुं!
©️ मनाली शहा
सहज एका ग्रूप वर एक छोटा लेख ओझरता वाचला.. लेख लिहला होता, एका मैत्रिणीने तिच्या नुकत्याच वारलेल्या मैत्रिणी साठी...
साधारण 50 च्या आसपास वय असलेली तिची मैत्रीण अचानक गेल्याने, घरात कसं काय होत असेल तिच्या मागे, या काळजीने ही, आपल्या मैत्रिणीच्या घरी फोन करते... घर सगळं उध्वस्त...पार कोलमडून गेलं असेल...साधारण अशा अपेक्षेने...आणि तिला दुःखद धक्का बसतो..तिच्या मैत्रिणीच्या जाण्याने नात्याची पोकळी नक्कीच निर्माण झाली होती...पण कुणाचं अडून राहिलं न्हवत..घरकामाला दोन जास्तीच्या बायका लाऊन.
Mar 6, 2022 6 tweets 1 min read
सदर पोस्ट मी विजय पांढरे यांच्या वतीने लिहिली आहे, त्यांना त्यांच्या मुलासाठी लेखनिक ची अत्यंत गरज आहे, आपणा सर्वांना कळविण्यात येते की, माझा सुपुत्र चि. प्रतीक पांढरे हा 17 नंबर फॉर्म भरून 10 वि च्या परीक्षेत मार्च 2022 ला बसणार आहे.परीक्षा केंद्र Pune केंब्रिज, Dhankawdi,Pune. Image त्याला Epilepsy अर्थात फेफरं चा त्रास व बौद्धिक अक्षमता व्यंग्य असल्याने त्याला लिहिण्याचा प्रक्रियेत अडथळा येतो. या कारणाने त्याला परीक्षेत लिखाणासाठी इयत्ता 9 वित असणाऱ्या लेखनिक ची आवश्यकता आहे. तसेच लेखनिक विद्यार्थ्यांच्या आई - वडील यांची हरकत नसावी.
Feb 26, 2022 7 tweets 2 min read
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू