सेना आणि तिचा काळा इतिहास
इतिहासात डोकावलं तर आजचे सत्ताधारी कांग्रेसांच्या मदतीने शिवसेना यांनी १९६८ नंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेंनी गाठली होती, मुंबई मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने दिली होती.
त्याच काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी "दलित पँथर" ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्रासी लोकांचे विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली, त्यानंतर ठाकरेंनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले.
या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झाली. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाईंची हत्त्या घडवून आणली.
इथवर ते थांबले नाहीत. १९७४ ला दलित नेता भागवत जाधव यांचा खून केला आणि आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत निर्माण केली. त्यानंतरही विदर्भात दलितांवर हल्ले सुरूच ठेवले. कधी दक्षिण भारतीय ,कधी शीख , कधी मुस्लिम तर कधी आंबेडकरी जनतेवर या नराधमांनी हल्ले सुरूच ठेवले, असे बोलले जाते की,
ह्या सगळ्यामागे कॉंग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता. म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली , त्यानंतर “ रिडल्स इन हिंदुइजम ” हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये यात हिंदू देव देवतांचा अपमान आहे, हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेंनी घेतली होती
त्या वेळी जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध शिवसेना असं राहील होतं. जानेवारी १९८८ ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन जमवलं " ज्याचं खरं रक्त हिंदूंच असेल त्यांनी या मोर्चात यावं , या मोर्चात बाबासाहेबांवर अभद्र शब्दात टीका केली गेली,
त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्याने अकलेचे तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले? असे व्यक्तव्य करून आंबेडकरी समाजाला चिथवले, याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी१९८८ ला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
मंत्रालयावर मोर्चा काढला गेला. आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आंबेडकरी तरुणांकडून नासधूस झाली. दुसऱ्या दिवशी आताचे नकली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरेंच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक विधी करून शुद्ध करून
आपल्या मनुवादी विचारसरणीचा परिचय करून दिला. पुढे मंडल आयोगाचा लढा सुरु झाला. प्रकाश आंबेडकरानी व्ही. पी . सिंगांच्या मदतीने लढून यशस्वी केला. त्याच काळात छगन भुजबळला स्वतःची जाणीव झाली आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
इथवरच बाळ ठाकरे आणि आणि त्यांच्या सेनेने थांबले नाहीत, तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला , मराठा आणि दलित वाद निर्माण करून १४ वर्षे दलितांवर अत्याचार सुरुच ठेवला. या काळात बाबासाहेबांवर चिखलफेक करण्याचे काम बाळ ठाकरेंनी केले.
'बाबासाहेब निजामाचे हस्तक' ,'घरात नाही पीठ, कशाला हवंय विद्यापीठ' , 'महारांनी आमच्या नोकऱ्या पळवल्या' अशाप्रकारची विधाने केली तितकीच चिथावणीला साथ राज ठाकरे ने दिली. मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता.
सध्या मनसे मध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. अखेर नामांतर न होता नामविस्तार झाला. तत्कालीन शरद पवार सरकारचे मंत्री रामदास आठवले यांनी समझोता करून या वादावर पडदा टाकण्यास मदत केली, परंतु नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नामकरण केले.
पण मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून नामविस्तार केला . या लढ्यात पोचीराम कांबळे ,गौतम वाघमारे यांना हौतात्म्य आले. परत यांचीच टिंगल म्हणून बाळ ठाकरे ने गौतम वाघमारे ना बेवडा संबोधून आणखी ठिणगी टाकली. अनेक लोकांचे प्राण गेले, घरे गेली.
या सर्वाना कारणीभूत बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस जबाबदार होती. अलीकडेच बाळ ठाकरेंनी मरण्यापूर्वी एका टी. व्ही. मुलाखतीत एक मोठा खुलासा केला. कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहितही नसेल पण मराठवाडा विद्यापीठाची सेटलमेंट करण्यासाठी रा. सु. गवईं ना जेवण्यासाठी बोलावलं
आणि विद्यापीठाचे नामांतर न करता हा नामविस्तार करू, त्यावर जेवताना रा. सु.गवई लगेच तयार झाले. पुढे काय झालं आपल्याला माहितीच आहे आणि मी कधी नामांतराला विरोध केलाच नाही, ही भूमिका बाळ ठाकरेंनी मांडली. या वरून सिद्ध होते ती आंबेडकरी नेत्यांची लाचारी..
वर उल्लेखलेल्या बाळ ठाकरे आणि त्यांच्या सेनेने केलेली दुष्कृत्ये ऐकून आंबेडकरी समाजातील लहान मुलं पण समर्थन करणार नाहीत. पण माजी पँथर रामदास आठवले बाळ ठाकरेंना जावून मिळाले, आठवले सर्व विसरले पण जातीयवादी बाळ ठाकरे आणि शिवसेनेला हा आंबेडकरी समाज कधीच विसरू शकणार नाही.
रामदास आठवले एवढयावरच नाही थांबले, तर बाळ ठाकरें च्या निधनानंतर अंत्ययात्रेमध्ये बाळ ठाकरेंच्या शवासोबत ट्रक मध्ये चढलेले दिसले. राज ठाकरे एकीकडे पायी चालताना दिसले, तर रामदास आठवले ट्रकवर चढून आंबेडकरी वारसदार कि ठाकरे वारसदार हे आंबेडकरी जनतेला कळाले नाही.
या अंत्यविधीला आठवले सोबत बाळ ठाकरेंना आव्हान देणारे आणि शिव्या देणारे झुंजार नेते जोगेंद्र कवाडे सह ,रा . सु . गवईं चे चिरंजीव राजेंद्र गवई , महातेकर , अर्जुन डांगळेसह अनेक चळवळीला विसरलेले नेते दिसले.. पण तिथे एक व्यक्ती मिसींग होती, ती म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर..
कोणी म्हणेल कि दुश्मनाच्या अंत्यविधीला उपस्थित रहाव लागतं. पण आमच्या बापाच्याही बाप असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी जनतेवर जुलूम आणि हत्या करणाऱ्या बाळ ठाकरे आणि सेनेचा आदर खोटा आंबेडकरी असलेल्या खोट्या माणसाला असेल.
परंतु सख्ख्या पणतूला बापाच्या अपमानाबद्दल बाळ ठाकरेसारख्या व्यक्तीबद्दल कधीच आदर असू शकत नाही. हे बाळासाहेब आंबेडकरांनी अनुपस्थित राहून स्वाभिमानी भीमबाणा दाखवून दिला.
डॅशिंग कवी पँथर नामदेव ढसाळ सुद्धा १९७७ साली बाळासाहेब ठाकरेंच्या गटात जाऊन बसलेले दिसले..
आपले मत वाया गेले तरी बेहत्तर पण ह्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी यांना मरे पर्यंत मत विकणार नाही. कारण आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त बाबासाहेबांमूळेच..
साभार : vikasmrode.blogspot.com/2014/03/blog-p… या ब्लॉग पोस्टवरून
#शिवसेना
#मनसे
#राष्ट्रवादी
#नामांतर
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.