सर्वांना #EidAlAdha निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
रूढी परंपरांना फाटा देत #आर्थिक_कुर्बानी सारखे उपक्रम राबवणाऱ्या @PaigambarSpeaks सारख्या युवकांची मुस्लिम समाजाला नितांत आवश्यकता आहे. (१/९)
मागील ९ वर्षे सलग चालू असलेला #आर्थिक_कुर्बानी हा उपक्रम आता हळू हळू मुस्लिम समाजा पर्यंत पोहचवत आहेत. (२/९)
मशिद, मदरसा मधील विद्यार्थी, अनाथ आश्रम यांना कुर्बानीच्या पैशातून मदत करण्या पासून सुरू झालेला प्रवास. कुर्बानी केरळसाठी (केरळ मधील पूरग्रस्तांना मदत करणे) (३/९)
#आर्थिक_कुर्बानी कोल्हापूर सांगली पुरग्रस्तांसाठी ज्यामध्ये पळुस तालुक्यातील भिलवडी गावातील तब्बल ५०० पेक्षा जास्त पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्य किट अगदी साडी आणि चादर सह देण्यात आले होते (४/९)
आणि याच गावातील १५० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देखील आर्थिक कुर्बानी च्या माध्यमातून देण्यात आल्या.
आणि गेल्या ३ वर्षांपासून सलग #आर्थिक_कुर्बानी शिक्षणासाठी राबवली जात आहे. (५/९)
१ हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उमपक्रमातून विविध पद्धतीने मदत केली गेली आहे. अगदी यवतमाळ मधील आदिवासी भागात ज्या ठिकाणी मुलांना नीटपणे कपडे ही घालायला नाही अशा ठिकाणी (६/९)
१०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यात आले जे विद्यार्थी अजूनही वापरत आहेत. उर्दु माध्यमातील ११ वी व १२ वी सायन्स च्या १०० विद्यार्थिनींना वर्षभराच्या वह्या आणि जर्नल असतील, मराठी माध्यमातील ४० विद्यार्थी बसणाऱ्या खोलीचे फरशी काम करणे असेल (७/९)
किंवा सातारा मधील जिजाऊ वसतिगृह मधील ४० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देणे असो या सर्वच गोष्टी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आल्या. अशी अनेक शैक्षणिक कामे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मधून करण्यात आली (८/९)
याही वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास दिड लाख रुपये आजपर्यंत जमा झालेले आहेत. यावर्षीची कामे लवकरच आपल्या सर्वांसमोर येतीलच.. (९/९)
आपल्याला हि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर " पैगंबर शेख यांचा संपर्क क्रमांक - 9970070705 "
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.