Devendra Fadnavis Profile picture
Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8Ujij

Sep 17, 2022, 6 tweets

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज नांदेड येथे मुक्तीसंग्रामातील सर्व सेनानींना विनम्र अभिवादन केले.
निजामांनी रझाकार नावाने फौज तयार केली आणि मोठी दहशत निर्माण केली. भारतीयांवर मोठे अत्याचार व्हायचे. भाषेवर अत्याचार झाले.

#MarathwadaLiberationDay

सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन छेडले आणि हे दहशतीचे सत्र संपले.
भारत स्वतंत्र झाला, तरी मराठवाडा मात्र मराठवाड्यातील लोकांना संघर्ष करावा लागला. 17 सप्टेंबरला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून आजचा दिवस या लढ्यातील सर्व नाम-अनाम वीरांना अभिवादनाचा आहे.

या स्वातंत्र्याचे मोल सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
संविधानाने अनेक अधिकार दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर देश प्रगती करतोय, त्यात मराठवाडा कुठेही मागे राहणार नाही, हा आपला संकल्प असला पाहिजे.

यावर्षी मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीग्रस्तांना मोठी मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील आपल्या सरकारने जाहीर केली. मदतही वाढीव आणि ती सुद्धा 3 हेक्टरपर्यंत. गोगलगाईंनी पीक खाल्ले तरी मदत केली जाणार आहे.

समृध्दी महामार्ग, सिंचनाच्या अनेक योजना, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड अशा अनेक योजनांना आता गती दिली जाणार आहे. नांदेड, जालना ही आर्थिक विकासाची नवी केंद्र राहणार आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे ध्येय सर्वोच्च आहे. मराठवाड्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे.

नवीन शासनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील, नांदेडमधील जनतेला आश्वस्त करतो, विकासाचा अनुशेष दूर करुन मराठवाड्याला महाराष्ट्राच्या विकासाच्या रांगेमध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आमचे सरकार सदैव कटिबद्ध असेल !
#marathwadamuktisangramdin #मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling