Amruta , ಅಮೃತ आजीची मुलूखमैदान तोफ . Profile picture
संघी कन्या .कट्टर सनातनी हिंदू.😊 🇮🇳 NO DM , Surgeon in making. हे मातृभूमी, प्राणत्याग: तवार्थे जीवनम्, विना त्वां जीवनमपि मरणम् एव। #सूर्यकिरण

Oct 26, 2022, 11 tweets

कार्तिक शुक्ल द्वितीया अर्थात यमव्दितीया किंवा #भाऊबीज.
ऋग्वेदात एक कथा आहे, जेव्हा ब्रम्ह देवांनी पृथ्वी चा निर्माण केला, सर्व ऋषींनी त्याची परतफेड म्हणून यज्ञकर्म करायचे ठरवले, यज्ञात बळी द्यावा लागतो तेव्हा यमराज ने बळी म्हणून जायला तयारी दाखवली, यमाने यज्ञात++

उडी घेतली हे पाहून बहिण यमी ने ही यज्ञात उडी घेतली, संतुष्ट इष्ट देवांनी वर दिला, की लोक हा दिवस नेहमी लक्षात ठेवतील यमव्दितीया म्हणून साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता आहे, मृत्यू नसेल तर जग काय असेल याचा विचार न केलेला बरा, जीवनचक्र संतुलित राखण्यासाठी तो आवश्यक आहे. ++

भारतीय संस्कृती औदार्य आणि कर्तृत्व ह्यांची पूजक राहिली आहे. म्हणून कदाचित भगवान शंकराने बीजेचा चंद्र माथ्यावर धारण केला आहे. आता बहिण भावाला ओवाळते भाऊबीज दिवशी याची कथा पाहूया, भगवान सूर्य आणि माता छाया (विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा) यांच्या पोटी यम आणि ++

यमुना अर्थात यमी यांचा जन्म झाला, यमी आणि यमराज यांच्या मध्ये खूप प्रेम, यमी नेहमी भावाला जेवायला बोलवायची, पण यमराज च्या कार्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते, कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस आला आहे. या दिवशी++

यमी ने पुन्हा यमराज ना बोलावने पाठवले, यमराज च्या मनात आले की यमाला कुणीही आमंत्रण देत नाही आपल्या घरी बोलवत नाही तेव्हा बहिण एवढ्या आपुलकी ने बोलवत आहे जावे. आणि यमराज यमी च्या घरी गेले, स्नान वैगेरे घालून यमीने ++

भावाचे औक्षण केले सुग्रास भोजन जेवू घातले. या दिवशी यमी ने यमराज कडून एक वचन घेतले की या दिवशी ते नरकातील जीवांना यातना देणार नाहीत, आणि जी बहिण आदराने भक्ती भावांने भावाचे आदरातिथ्य करेल तिला भयमुक्त कराल आणि भावाला आयुष्य द्याल. ++

या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. या दिवशी यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. ++

याच दिवशी १४ यमाची नावे उच्चारून हे यमदीपदान करतात." ज्यांना भाऊ नाही त्यांनी चंद्राला ओवाळावे, "पितृपति, कृतांत, शमन, काल, दंडधर, श्राद्धदेव, धर्म, जीवितेश, महिषध्वज, महिषवाहन, शीर्णपाद,
मृत्यु, अन्तक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर,++

अशी नावे आहेत। यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यातील तेजतत्त्व आणि सूर्याचा अंश जागृत होतात. यमदीपदान केल्या ने पितरांना शांती मिळते. "श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये"। म्हणून १४ नावे घेऊन दीप दान करावे. ++

आजच्या कलियुगात स्त्री वर होणारे अत्याचार, बलात्कार , यासारख्या गोष्टी वाढत आहेत, तेव्हा स्वतः मधले क्षात्रधर्म जागृत करून आपल्या बहिणी चे रक्षण करावे व तिला ही शारिरीक, मानसिक दृष्ट्या सबळ बनवावे ही विनंती🙏😊++

माझ्या या ट्विटर परिवार तील सर्व बंधूंना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇‍♀️🪔🚩 (@sukrutdr राम भाई 🙄 माझी ओवळणी कृपया जमा करावी 😁🤣)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling