Amruta , ಅಮೃತ आजीची मुलूखमैदान तोफ . Profile picture
संघी कन्या .कट्टर सनातनी हिंदू. 🇮🇳 NO DM , Surgeon in making. हे मातृभूमी, प्राणत्याग: तवार्थे जीवनम्, विना त्वां जीवनमपि मरणम् एव। #सूर्यकिरण,
Apr 29, 2023 5 tweets 1 min read
३० एप्रिल परत आला. आज मी रात्रभर जागी आहे. झोप येत नाही आहे. ३० एप्रिल २०२१ ..आई ला जाऊन आज २ वर्ष झाली, सगळे पुन्हा प्लॅशबॅक समोरून गेला. २.५७ वाजलेत रात्रीचे जेव्हा ही पोस्ट लिहित आहे.मी आता आईला अग्नी देऊन आले होते. ++ मला लिहायचे नव्हते, आई ११ एप्रिल ला तिथीनुसार तुझे संवत्सारिक २ रे श्राद्ध कर्म केले पण आज ची तारीख जास्त त्रास देत आहे. छोट्या छोट्या गोष्टी वर हट्ट करणारी तुझी लेक आता स्वतः रडून स्वतः ला सावरायला ही शिकली आहे. तुझ्या दृष्टीने मोठी झाले. ++
Mar 28, 2023 11 tweets 4 min read
कसे आहे आम्हाला जातीवर आणि वैचारिक वंध्यत्व घेऊन लिहायचे आणि पसरवायचे असते.लिहणार नव्हते पण या ट्वीट ला कोट करून बहूजन समाज ने वाचावे वेगैरे लिहले आहे तर काही सत्य घटना सांगणार आहे. आम्ही डावे नाही की नुसत्या थेअर्या मांडायच्या आड ना बूड. १/११
#स्वातंत्र्यवीर_सावरकर १) वेदोक्तबंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटीबंदी, व ७) बेटीबंदी, हे सगळे हेरून या अनिष्ट रूढी प्रथांना तोडण्यासाठी प्रयत्न करणारे कृती करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. २/११
Mar 25, 2023 4 tweets 2 min read
वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदू असलेल्यांकडून यापेक्षा वेगळ्या अपेक्षा नाहीतचं.
ज्या माणसाने खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती करिता शपथ घेऊन आपले जीवन अर्पण केले त्यांना मनाला येईल तेव्हा तोंडाला येईल ते बरळतं बसायचे .१/३ Image यांची भंपक वक्तव्य सार्या पुरोगाम्यांनी मम म्हणून स्वीकारली आहेत .डाव्या विचारात घटना महत्वाच्या नसतात सत्य महत्वाचे नसतात - त्यांच्या फालतू थेअर्या महत्वाच्या असतात. २/३
Feb 1, 2023 5 tweets 1 min read
नाती असतात स्वच्छंद फुलपाखरासारखी... आयुष्य रंगी-बेरंगी करणारी...
नाती असतात खळखळनार्या झर्यासारखी... थेंब थेंबात सुख-दुखाचे मोती वेचणारी...
काही नाती असतात मधाळ गोडवा घेऊन येणारी...
तर काही कारल्यालाहि कडूपणा शिकवणारी... पण जितकी मुरतील तितकाच जास्त आनंद देणारी...++ काही नाती असतात अगदी खळखळून हसवणारी...
आणि काही तितकंच रडवणारी... हसता रडता आपल्याला प्रत्येक क्षणी सावरणारी...काही नाती अगदी बाल कृष्णासारखी खट्याळ..
तर काहींमध्ये साचलेला नुसता शिष्टपणाचा गाळ.. पण इतक्या भिन्नतेतहि असते एकत्र बांधलेली नाळ... ++
Jan 31, 2023 5 tweets 2 min read
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
काल तुम्हा सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची ची फुले झाली आणि एक सुंदर सुंगधी फुलांची माळ तयार झाली. आपण दिलेल्या शुभेच्छा तितक्याच भावनेनं स्वीकारून , हा आभार मानण्यासाठी खटाटोप. आपण जन्माला आलो ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही ++
#आभार तर, उरलेल्या दिवसांचा उपभोग घेण्यासाठी. आपण किती आनंदी आहोत या पेक्षा आपण इतरांना किती आनंदी ठेवू शकलो हे महत्त्वाचे. जसे एखाद्या गोड पदार्थ मध्ये गोडी साठी घातलेली साखर, गूळ, पदार्थ तयार झाल्यावर जसा दिसत नाही तसचं तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. ++
Nov 5, 2022 10 tweets 4 min read
तुळशीचं लग्न का लावले जात याची ही कथा आहे.
एकवेळ भगवान शंकरांनी आपल्या तेजाचा काही भाग समुद्रात फेकून दिला होता, त्या तेजातून जालधंर नावाचा तेजस्वी बालक जन्मला. हा पुढे जाऊन पराक्रमी असा दैत्य राजा झाला. दैत्यराज कालनेमी ची कन्या वृंदा हिच्याशी ++
#तुलसी_विवाह_कथा त्याचा विवाह झाला. जालंधर क्रूर होता, मदमस्त झालेला राक्षसराजा, त्याचा अत्याचार, वाढतच जात होता. पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची भक्त होती. जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले, वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपवून येत नाही. ++
Nov 3, 2022 5 tweets 3 min read
Be a woman who can do both represent our culture as well as protect dharma 🚩🙏
Why bindi?
सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून (Indus River Valley civilizations) पुरातत्त्व विभागाला ज्या काही स्त्री आकृत्या दिसल्या त्याच्या कपाळावर बिंदू होता. ++
#Bindi
#सौदामिनी_आधी_कुंकू_लाव🔴 ख्रिस्तपूर्व ३००० ( bc )मध्ये संतांनी वेद लिहिले. वेदांमध्ये आपल्या शरीरातील सात चक्रांचे विस्तृत वर्णन आहे. ही चक्रे आपल्या शरीरातील उर्जेच्या प्रवाहाशी संबंधित आहेत. ७ चक्रे थेट अंतःस्राव (एन्डोक्राईन) ग्रंथीला जोडून शरीराची सर्व तंत्रे सांभाळतात ++
Oct 26, 2022 11 tweets 4 min read
कार्तिक शुक्ल द्वितीया अर्थात यमव्दितीया किंवा #भाऊबीज.
ऋग्वेदात एक कथा आहे, जेव्हा ब्रम्ह देवांनी पृथ्वी चा निर्माण केला, सर्व ऋषींनी त्याची परतफेड म्हणून यज्ञकर्म करायचे ठरवले, यज्ञात बळी द्यावा लागतो तेव्हा यमराज ने बळी म्हणून जायला तयारी दाखवली, यमाने यज्ञात++ उडी घेतली हे पाहून बहिण यमी ने ही यज्ञात उडी घेतली, संतुष्ट इष्ट देवांनी वर दिला, की लोक हा दिवस नेहमी लक्षात ठेवतील यमव्दितीया म्हणून साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता आहे, मृत्यू नसेल तर जग काय असेल याचा विचार न केलेला बरा, जीवनचक्र संतुलित राखण्यासाठी तो आवश्यक आहे. ++
Oct 26, 2022 14 tweets 4 min read
Thread🧵 दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; ++ पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे.सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात.++
Oct 24, 2022 9 tweets 3 min read
#नरकचतुर्दशी 🧵
आश्विन वद्य चतुर्दशी,
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर / नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला.++ Image श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व स्त्रियांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. ++ Image