Amruta , ಅಮೃತ आजीची मुलूखमैदान तोफ . Profile picture
संघी कन्या .कट्टर सनातनी हिंदू.😊 🇮🇳 NO DM , Surgeon in making. हे मातृभूमी, प्राणत्याग: तवार्थे जीवनम्, विना त्वां जीवनमपि मरणम् एव। #सूर्यकिरण

Nov 5, 2022, 10 tweets

तुळशीचं लग्न का लावले जात याची ही कथा आहे.
एकवेळ भगवान शंकरांनी आपल्या तेजाचा काही भाग समुद्रात फेकून दिला होता, त्या तेजातून जालधंर नावाचा तेजस्वी बालक जन्मला. हा पुढे जाऊन पराक्रमी असा दैत्य राजा झाला. दैत्यराज कालनेमी ची कन्या वृंदा हिच्याशी ++
#तुलसी_विवाह_कथा

त्याचा विवाह झाला. जालंधर क्रूर होता, मदमस्त झालेला राक्षसराजा, त्याचा अत्याचार, वाढतच जात होता. पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची भक्त होती. जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले, वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपवून येत नाही. ++

मी उपासनेला बसेन. आणि जोपर्यंत तुम्ही परत येत नाही मी संकल्प सोडणार नाही, पूजेतून उठणार नाही. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवला आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले.++

प्रत्येक देवांने श्री विष्णू नारायण ला प्रार्थना केली, पण नारायण बोलले वृंदा माझी भक्त आहे तिला मी फसवू शकत नाही, पण जालंधर चे प्रताप ऐकल्यावर विष्णू नारायण नी जालधंर चे रूप घेतले आणि वृंदा च्या वाड्यात पोहचले, वृंदा ने पतीला पहाताच संकल्प सोडला . ++

आणि नवर्याच्या पायाला नमस्कार करण्यासाठी हात लावला, त्याक्षणी जालधंर राजाला देवतांनी ठार मारले त्याचे मस्तक वृंदेच्या राजवाडा मध्ये येऊन पडले, वृंदा समजून गेली काय झाले आहे तिने नारायण ला प्रश्न केला तुम्ही कोण ज्याला मी स्पर्श केला. ++

भगवान श्रीविष्णू मूळ रूपात आले पण पतिव्रता वृ़ंदेला हे पटलं नाही तिने शाप दिला की तुम्ही पाषाण व्हाल तो पाषाण म्हणजे जो "शाळिग्राम" पूजला जातो। ते पाहून देवता आणि लक्ष्मी रडू लागल्या जगताचा पालनकर्ता पाषाण झाला तर कसे? ++

तेव्हा वृंदेने शाप परत घेतला आणि आपल्या पती जालंधर सोबत सती गेली .तिच्या शरीराची जी राख झाली त्यातून काही दिवसांनी एक वनस्पती बाहेर आली. तिचे नाव श्री विष्णू नी तुळशी ठेवले आणि सांगितले की पवित्र आणि परमभक्त असल्याने ,++

माझ्या पाषाण रूपातील स्वरूप बरोबर तुळशी चे पूजन केले जावे. म्हणजे शाळीग्राम बरोबर तुळशी चे पूजन. तुळशी शिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकरली जाणार नाही.म्हणून श्री विष्णू स तुळशी अर्पण केली जाते. तेव्हापासून देव-उत्थानी एकादशीच्या दिवशी हा ++

शाळिग्राम बरोबर तुळशी चा विवाह करण्याची प्रथा पडली, तुळशी ला खुडताना सुध्दा, माझी आजी म्हणायची की, "हे शोभने मी भगवान विष्णू साठी तूला खुडते" हे म्हणून चं खुडावी. तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले. ++

आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे शाळीग्राम म्हणजेच श्रीविष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली.भागवत पुराण आणि शिव पुराण मध्ये ही या कथेचा उल्लेख आहे.
आणि या तुळशी विवाह आरंभ पासून लग्न मुहूर्त ला ही सुरवात होते.. 🙏🚩

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling