Devendra Fadnavis Profile picture
Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Nov 15, 2022, 6 tweets

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जव्हार (जि. पालघर) येथे आयोजित जनजाती गौरव दिनानिमित्त ‘आदिवासी संस्कृतीच्या वरासदारांच्या कृतज्ञता सोहळ्यात’ सहभागी होण्याची संधी आज मिळाली. सर्वप्रथम जननायक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.
#JanjatiyaGauravDiwas

जनजाती विकास मंचातर्फे आयोजित या सोहळ्याला मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार राजेंद्रजी गावित, गोंड महासंघाचे अध्यक्ष तथा विधासभेतील सहकारी आ. डॉ. संदीपजी धुर्वे तसेच नरेशजी मराड, रामचंद्रजी मराड, विवेक पंडीतजी आणि असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.
#JanjatiyaGauravDivas #BirsaMunda

आदिवासी संस्कृतीच्या वारसदारांचा गौरव केला, संवाद साधला.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निर्णय केला की 15 नोव्हेंबर म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ही भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशात ‘जनजतीय गौरव दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येईल !

भगवान बिरसा मुंडा यांना कमी आयुष्य लाभले. पण स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे व्यक्ती किती काळ जगली हे महत्वाचे नाही, कशी जगली हे महत्वाचे असते. अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजी साम्राज्याला हादरवून टाकण्याचे काम भगवान बिरसा मुंडा यांनी केले.

जल, जमीन, जंगल वाचविण्यासाठी लढा उभा केला. त्या काळात भगवान बिरसा मुंडा यांच्यावर 500 रुपयांचे इनाम इंग्रजांनी ठेवले होते.

आदिवासी समाजात ज्या लोकांनी आदिवासी संस्कृती जिवंत ठेवली, अशा 40 लोकांचा सत्कार आज करण्यात आला ही आनंदाची बाब आहे.

मुख्यमंत्री असताना, आपल्या सरकारने :- ✔️आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या, नामांकित शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
✔️सातत्याने जनजाती सल्लागार समितीची बैठक होत असे.
✔️पेसा कायदा लागू केला.
✔️ पालघर जिल्ह्याला मुख्यालय दिले.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling