महाकाळ Profile picture
काळ मी..वैकुंठी ना पाताळी मी.. मोक्षाचा सार मी…शुद्ध क्रोध मी..अघोर मी..असा महाकाळ मी. MTech IITian + दिवे💡💡💡

Dec 2, 2022, 5 tweets

पुरुष...

तो आनंदी असो वा दुःखी,
त्याला कोणीही समजू शकत नाही.
तो प्रियजनांसाठी प्रत्येक क्षण जगतो.

आयुष्यातील प्रत्येक क्षण
इतरांसाठी समर्पित करतो.
लहानपणापासून तारुण्यापर्यंत
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपडतो.

कधी अनाथ
होऊन कुटुंबाची धुरा सांभाळतो,

तर कधी भाऊ आणि बहिणींसाठी स्वतःच्या छोट्याछोट्या स्वप्नांचा त्यागही करतो.
कधीकधी तो कौटुंबिक परंपरा आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचाही
त्याग करतो.
अवांछित विवाह करतो, पत्नी
कशीही असली तरी तिला आधार देतो,
पत्नी सुंदर, विनम्र असेल, तर आपल्या नशिबाची वाखाणणी करतो

पत्नी कजाग असेल तर नरकाची शिक्षा ही भोगतो.

पिता बनतो, आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी आपले शरीर, मन आणि संपत्ती अर्पण करतो .

प्रत्येक लढ्यात तो गप्प राहतो तो आपला संघर्ष कोणाला सांगू शकत नाही. पै-पै गोळा करून तो आपल्या स्वप्नातील घर बांधण्याचा प्रयत्न करतो.

आयुष्यभर प्रत्येक पैशांचा हिशोब ठेवतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःला दडपून टाकतो.

या सगळ्या प्रवासात जिंकतो-हारतो पण शेवटी आपल्या मनात, आपल्या इच्छांच्या थडग्यात एकटाच राहतो.

प्रत्येकजण त्याच्याकडे काही न काही मागतो पण देत कोणी नाही.

आणि एक दिवस शांतपणे तो त्या अज्ञात प्रवासाला निघून जातो, जिथून परत कोणीही येत नाही...

पुरुषाचं दुःख नेहमी मौनच असतं...

प्रत्येक जण स्त्री दुःखाबद्दल बोलतात पण पुरुषांच्या दुःखाची कोणाला कल्पनाच नसते...

समस्त पुरुषवर्गाला नम्र अभिवादन...!!!
#निरीक्षण

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling