तो आनंदी असो वा दुःखी,
त्याला कोणीही समजू शकत नाही.
तो प्रियजनांसाठी प्रत्येक क्षण जगतो.
आयुष्यातील प्रत्येक क्षण
इतरांसाठी समर्पित करतो.
लहानपणापासून तारुण्यापर्यंत
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपडतो.
कधी अनाथ
होऊन कुटुंबाची धुरा सांभाळतो,
तर कधी भाऊ आणि बहिणींसाठी स्वतःच्या छोट्याछोट्या स्वप्नांचा त्यागही करतो.
कधीकधी तो कौटुंबिक परंपरा आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचाही
त्याग करतो.
अवांछित विवाह करतो, पत्नी
कशीही असली तरी तिला आधार देतो,
पत्नी सुंदर, विनम्र असेल, तर आपल्या नशिबाची वाखाणणी करतो
पत्नी कजाग असेल तर नरकाची शिक्षा ही भोगतो.
पिता बनतो, आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी आपले शरीर, मन आणि संपत्ती अर्पण करतो .
प्रत्येक लढ्यात तो गप्प राहतो तो आपला संघर्ष कोणाला सांगू शकत नाही. पै-पै गोळा करून तो आपल्या स्वप्नातील घर बांधण्याचा प्रयत्न करतो.
आयुष्यभर प्रत्येक पैशांचा हिशोब ठेवतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःला दडपून टाकतो.
या सगळ्या प्रवासात जिंकतो-हारतो पण शेवटी आपल्या मनात, आपल्या इच्छांच्या थडग्यात एकटाच राहतो.
प्रत्येकजण त्याच्याकडे काही न काही मागतो पण देत कोणी नाही.
आणि एक दिवस शांतपणे तो त्या अज्ञात प्रवासाला निघून जातो, जिथून परत कोणीही येत नाही...
पुरुषाचं दुःख नेहमी मौनच असतं...
प्रत्येक जण स्त्री दुःखाबद्दल बोलतात पण पुरुषांच्या दुःखाची कोणाला कल्पनाच नसते...
शिकलीस म्हणून काय झालं
आहेस तर तू मुलगीच ना?
नोकरी करतेस म्हणून काय झालं
आहेस तर तू मुलगीच ना?
रात्रीचा अंधार तुझ्यासाठी धोकादायक,
तुझ्यामुळेच कापलं जाऊ शकतं
कुटुंबाचं नाक.
विसरू नकोस,
ना समाज बदललाय ना आम्ही,
आज ही आहात बापाच्या
खांद्यावरच्या ओझ्याप्रमाणे तुम्ही
आता ही तुला रात्री बेरात्री बाहेर जाण्यापूर्वी दहावेळा करावा लागतो विचार,
बापाच्या चेहऱ्यावरचा उडतो रंग
आणि आईच्या चौकश्या हजार
मुलगा तरुण बापाचा सहारा
मुलगी तरुण तर बाप बिचारा
मुलगी जास्त शिकली तर चांगलं स्थळ कुठून येणार,
मुलगा जास्त शिकला तर हुंड्याने घर भरणार
कधी कुठे मुलगी छेडली गेली तर दोषी मुलगीच असणार,
नक्कीच तंग कपडे असतील किंवा रात्री बेरात्री बाहेर फिरत असणार
तिचे कपडे नाही तुमची मानसिकता तंग आहे,
आपल्याच अधिकारांसाठी लढणे आता तिचं युद्ध आहे
आशेचा किरण दिसतोय, सकाळ होणे बाकी आहे
नव्या सकाळची एक किरण अंधार फोडण्यास पुरेसा आहे
मुलं खूप हळुवार मनाची असतात. मुलांनी पुढे जावे, चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात जेणेकरून त्यांचे भविष्य सुधारावे, अशी प्रत्येक पालकाची, शिक्षकाची इच्छा असते. पण त्यासाठी मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणे, त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजवणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत प्रत्येक मुलाला काही चांगल्या सवयी शिकवा म्हणजे तो एक आदर्श नागरिक बनू शकेल.
प्रत्येक मुलाला कळायला हवं की आईवडिलांचा आदर कसा करायचा. मोठ्यांचा आदर कसा करायचा हे मुलांना शिकवा. ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा, सकाळी नमस्कार करा.
मोठ्यांचा आदर करण्यासोबतच लहानांचाही आदर करायला शिकवा. चांगल्या आचरणाची सवय लागते.
मुलांना योग्य आणि सभ्य भाषा शिकवा. त्यांच्यासमोर चुकीचे शब्द वापरू नयेत. त्यांच्यासमोर गैरवर्तन करू नका. मुलांमध्ये चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावा म्हणजे वाईट आणि चांगल्या वागण्यातला फरक कळेल.
ज्ञानाच्या मदतीने व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून यशाचा मार्ग शोधतो. पैसा सर्वत्र उपयोगी पडत नाही. ज्ञान ही माणसाची संपत्ती आहे, ज्याच्या जोरावर सर्वात मोठे युद्ध सहज जिंकता येते.
ज्ञानी व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उंचावते. ज्ञान हीच माणसाची खरी संपत्ती आहे, जी तुम्ही कमावलेली असेल तर ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा अखंड प्रवाह असतो, तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.
ज्ञानाचा प्रकाश अंधार दूर करतो. ज्ञान आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस क्षणार्धात प्रत्येक अडचणीवर मात करतो. ज्ञानी माणूस जिथे पाऊल टाकतो तिकडे त्याची कीर्ती सुगंधी फुलांच्या सुगंधासारखी पसरते. बलवान, श्रीमंत हे जाणकार व्यक्तीचे अनुयायी असतात.
आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आपले कर्तव्य आहे वेळेवर आयकर भरणे, ज्यामुळे कर रूपाने भरलेल्या पैशांनी भांडवलदारांना सबसिडी आणि व्याजमुक्त केले जाईल. ज्याच्या लाभाने ते अरबपती बनू शकतील आणि करोडोंचा बंगला बनवू शकतील आणि समस्त भौतिक सुख सुविधांचा लाभ उठवू शकतील.
आपण,मध्यमवर्गीयांनी दिलेल्या कररुपी पैशांनी एखाद्या गरीब परिवाराला मोफत राशन मिळू शकेल. विनाशुल्क त्याचा चांगल्या इस्पितळात औषधोपचार केला जाईल. ज्याचा फायदा एखादी अकर्मण्य व्यक्तीही उचलू शकतो.
कारण, जर त्याने कर्म केलं तर तो शिक्षण घेईल आणि शिक्षण घेतलं तर कामधंदा करेल,
आणि त्याने जर कामधंदा केला तर आपल्या जोडीला म्हणजेच मध्यमवर्गीयांच्या जोडीला येऊन बसेल, भांडवलंदारांची धुणी-भांडी घासायला.
आणि भांडवलदार जेंव्हा पैसे घेऊन देशाबाहेर पळतील तेंव्हा सोशल मीडियावर तो भांडवलदार देशासाठी किती चांगला होता किंवा वाईट होता ते सांगायला कोणी तरी हवं ना...?
मी काल एक पोस्ट टाकली होती, "गरिबाला नाही माहीत कोणाचा धर्म धोक्यात आहे..."
खूप प्रतिक्रिया आल्या, DM आले. काही चांगल्या होत्या काही विचित्र होत्या. काहींनी धर्मद्रोही ही ठरवलं.😂😛
प्रत्येकाच्या मताचा मी नेहमीच सन्मान करतो.
त्याच पोस्ट ला संलग्न काही टिपण्णी करू इच्छितो.
उदा. १
आपण भिकाऱ्याला काही दान करतो. अन्न, पैसे वा इतर काही. आपण त्याला देताना विचार करतो का तो हिंदू आहे का मुसलमान?
तो भिकारी तुम्हाला विचारतो का, तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम किंवा इतर कोणते धर्मीय?
ही आहे गरिबी. ही आहे खऱ्या गरजवंतांची गरज. त्याला नाही फरक पडत तुम्ही कोण...
उदा. २
आपल्याला कडाक्याची भूक लागली आहे. आपल्याला समोर जे हॉटेल दिसेल त्यात आपण जातो. आपण विचारतो का जेवण बनवणारा कोण आहे? हिंदू-मुस्लिम किंवा इतर जातीधर्माचा? आपण जेवण ऑर्डर करतो आणि पटपट खातो आणि भूक शमावतो.
चला, एका कथेपासून सुरुवात करूया. एक म्हातारी बाई बसमध्ये बसली होती. पुढच्या स्टॉपवर, एक मजबूत, चिडखोर तरुण स्त्री बसमध्ये चढली आणि म्हातारीच्या शेजारी बसली. तिने स्वतःचा पूर्ण भार त्या वृद्ध स्त्रीवर टाकला. तरी वृद्ध स्त्री शांत होती.
तरुणीने वृद्धेला विचारले की, "मी एवढा तुम्हाला त्रास देतेय तरी तुम्ही तक्रार का नाही करत आहात?"
वयोवृद्ध महिलेने उत्तर दिले: "मला एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर असभ्य वागण्याची किंवा वाद करण्याची गरज नाही, कारण माझा प्रवास खूप छोटा आहे, कारण मी पुढच्याच थांब्यावर उतरणार आहे."
हे उत्तर सुवर्ण अक्षरात लिहिण्यास पात्र आहे: "एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर चर्चा करण्याची गरज नाही, कारण आपला प्रवास खूप छोटा आहे." आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ खूप कमी आहे.