🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Mar 28, 2023, 14 tweets

आपण नशीबवान आहोत की भारतात जन्मलो जिथे #संविधान श्रेष्ठ आहे ❤️
संविधानच नसलेल्या इस्त्राईल देशात गेले ३ महिने झाले सामान्य जनता रस्त्यावर उतरलीय. नेमकं काय झालय हे आपण या थ्रेडमध्ये पाहु
१)इस्त्राईल पंतप्रधान नेतान्याहू यांचा कारनामा
२)जन आंदोलन व परिणाम
#वसुसेन #threadकर

याआधी आपणं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ(जे लोकशाहीचे ३ स्तंभ म्हणुन ओळखले जातात)यांचा एखादा देश स्थिर ठेवण्यामागे काय योगदान आहे याबद्दल छोटासा आढावा घेऊ म्हणजे पुढील प्रकरण तुम्हाला समजुन येईल.
कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ. हे लोकं

कायद्याचे पालन करतात.(इस्त्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान आहेत) हे जे कायदे आहेत ते कायदेमंडळात तयार करून मंजुर केले जातात.(इस्त्राईल कायदेमंडळाचे नाव 'Knesset' आहे) तर बनलेले कायदे योग्य-अयोग्य तपासण्याचे काम न्याय मंडळ करत असतं‌.
तर पंतप्रधान नेतान्याहू यांनी नेमका

इथेच धिंगाणा घातला आहे.ज्यावेळी नेतान्याहू यांनी नोव्हेंबरमध्ये पाचव्यांदा पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली तेव्हापासुन त्यांनी देशाच्या न्यायसंस्थेला टार्गेट केलय. म्हणजे न्याय पालिकेची ताकद कमी करून एकप्रकारे आपल्या ऐकण्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलाय.न्यायाधीशांची अत्यंत

पारदर्शक आणि स्वतंत्र असणार्या निवडप्रक्रियेत ढवळाढवळ वाढवलीय. बर इथ नेतान्याहू म्हणतात की मला सगळी पाॅवर कायदेमंडळाच्या(knesset) अंतर्गत आणायची आहे पण लोकं एव्हढी मुर्ख नाहीत की त्यांना ही गोष्ट समजणार नाहीय ते 😄
कारण Knesset मध्ये नेतान्याहू यांचेच बहुमत आहे. मग उद्या

यांना जाब विचारणारी न्यायपालिकाच कमजोर झाली तर हे भाऊ धिंगाणा करायला मोकळेच झाले ना? स्वतःला वाटल तसे, स्वताच्या फायद्याचे कायदे आणुन काहीही करतील. बर मुळात नेतान्याहू यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे बरेच आरोप आहेत आणि त्यात त्यांच्या सहकार्यांचे नावं 'पनामा पेपर्स' मध्ये

समोर आले आहे. अस असताना नेतान्याहूंनी अशी पाऊले उचलणे निव्वळ हुकुमशाही आणण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. त्यात आता त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनीच नेतान्याहूंच्या या कृत्याचा निषेध केलाय म्हणजे बघा डोक्यावरून किती पाणी गेलय ते!!
यात आघाडीवर इस्त्राईलचे 'संरक्षण मंत्री' होते

ज्यांनी नेतान्याहू यांना उघडपणे सांगितले की "तुम्ही हे जे करताय, न्यायपालिका कमजोर करताय ते करू नका कारण त्याने देश कमजोर होईल".
पण नेतान्याहू यांच्या डोक्यात सत्तेची नशा एव्हढी भिनली होती त्यांनी संरक्षण मंत्र्यालाच घरी बसवले!!! 😱
आता मात्र प्रकरण चांगलच चिघळलं आणि हा सगळा

प्रकार पाहुन लोकांनीच ठरवल की आपण सगळे रस्त्यावर उतरूया. इथे एक गोष्ट नमुद करतो की इस्त्राईलच्या जगभरातल्या जेव्हढ्या #Embessy आहेत त्या कालपासून बंद करण्यात आल्या आहेत(भारतासहित)!
इस्त्राईल जनतेने एव्हढं मोठं आंदोलन उभ केलय ते पाहुन संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागलीय. स्वता

देशाच्या सैन्याचे प्रमुख म्हणतात,"आमच्या देशात खुप मोठं वादळ आलय.याआधी अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. बाहेरून कितीही हल्ले झाले तरी आम्ही ते झेलले असते पण देशातल्या सामान्य जनतेनेच असा विरोध केलाय म्हणल्यावर काहितरी कृती करणे गरजेचे आहे." 🙏
हे सगळ पाहुन शेवटी

नेतान्याहूच्या डोक्यात तात्पुरता प्रकाश पडला आहे असच म्हणाव लागेल कारण काल त्यांनी "न्यायव्यवस्थेत मी सध्यातरी कोणताही बदल करणार नाही" अस जाहीर विधानं केलय.
या सगळ्या घटनेत लोकांनी जो पोस्टर वापरला तो दखल घेण्यासारखाच आहे 👇

कारण पुतीनची आंतरराष्ट्रीय इमेज एकदम ताकदीचा नेता अशी असली तरी देशांतर्गत त्यांना चांगलाच विरोध आहे. असाच काहीसा प्रकार डोनाल्ड ट्रंप यांच्या बाबतीत पण आहे आणि आता नेतान्याहू पण तसच काहीसं वागत आहेत. बाहेर जगात मजबुत इमेज दाखवणारे 'यांच्या बुडाखाली किती अंधारय' हे लोकांना समजायला

चालु झालय.
उद्या एखाद्या देशाच्या नेत्याने अश्याचप्रकारे कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर इस्त्राईली जनतेने 'आपण कसं वागलं पाहिजे' याचे चांगले उदाहरण मांडुन दिले आहे एव्हढं मात्र नक्की!
आणि हो #संविधान का श्रेष्ठ आहे हे समजायला इस्त्राईलमधली ही घटना पुरेशी ठरेल कारण सत्ता येते जाते

नेते येतात, काम करतात त्यात काही भ्रष्ट होतात तर काही मस्तवाल होतात. या सगळ्यांवर चाप लावायला कोणीतरी पाहिजे ज्याचा आधार घेऊन शेवटी कोणी नाही पण सामान्य जनता तरी आवाज उठवेल.
हीच ताकद, हाच अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय! 🙌😄
#Israel #IsraelProtests #Netanyahu #worldaffairs

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling