#थोडक्यात #List
Positional/ Trend trading साठी लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या १० गोष्टी
सुरूवात ह्या यादीतील एक एक गोष्ट Google/ YouTube वरून जास्त माहिती घेऊन करता येईल..#Starterkit
👇 👇 👇
१.Timeframe
सुरुवात monthly TF पासून..
आणि मग weekly > daily > hourly > १५ mins
Ideally मोठ्या TF चा trend छोट्या TF मध्ये continue झालेला असावा..!
छोट्या TF मधला बराच noise.. higher TF मधला birds eye view आधीच घेतल्याने कमी होतो..!
२. Price Action
अ.
Candlesticks - च्या
spread -ने bulls आणि bears चे युद्ध किती जोरात चालू आहे हे कळते
Body -ने युद्ध कुठे सुरू झाले अन् कुठे संपले हे कळते
Wicks -ने कधी हा वर..तर कधी तो..म्हणजे लढाई किती अटीतटीची झाली हे कळते
Closing -ने शेवटी कोण - कसं जिंकल ते कळते.
ब.
Line chart -
Bears आणि Bulls ची एवढी लढाई झाली..त्याचा शेवट नक्की कसा झाला हे कळण्याचा सगळयात सोपा मार्ग..!
ह्याने खूपदा candlestick पाहून झालेला गोंधळ कमी होतो.
म्हणूनच की काय ह्यात Reversal आणि Divergences लवकर ओळखू येतात.
C. Trend lines
ह्या
शेअर ची किंमत नक्की कुठे गेल्यास buyers वाढतात / कमी होतात इ गोष्टी सांगतात.
एखादा शेअर buy sell किंवा hold कधी करायचा ह्या निर्णयाची विचार प्रक्रिया खरं तर trendlines पासून सुरू होते.
३. Volume
Chart मधली कदाचित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट..!
ह्याशिवाय..मजबूत ट्रेण्ड तयारच होऊ शकत नाही..!
Volume ची ३ निरीक्षणे 👇
अ) Standalone volume bar - सध्याचा volume
ब) volume SMA-२० - volume आणि price Action यांचा संवाद
क) Volume Trend - शेअर price सोबत वाढतोय का कसं
४. Moving Averages
नेहमी weekly TF वर..
छोट्या TF वर reliable माहिती कमी आणि गोंधळ जास्त..!
२०EMA - ट्रेडर्स ना
५०EMA - investors ना
शेअरची नक्की किंमत कुठे घेऊन जायची आहे..हे ह्यात कळते..!
५. RSI
शेअरची किंमत पुढे कुठे जाऊ शकते ह्याचा अंदाज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा forward looking इंडिकेटर !
RSI मध्ये पण ३ च गोष्टी
Divergence
Trend Reversal
आणि RSI trendline वरचे breakout
६. MACD
पुन्हा फक्त ३ च गोष्टी
Golden cross
Death cross
Zero cross
७.ADx
Price action आणि RSI ने सांगितलेला ट्रेण्ड खरंच किती ताकद वान आहे हे कळण्याचे साधन
ह्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
Divergence
आणि
आपल्या ट्रेड संबंधित निर्णयाचे confirmation
८. ATR - average true range
Volatility जितकी जास्त..ट्रेण्ड तेव्हढा कमजोर..आणि ट्रेण्ड कमजोर म्हणजे trading मध्ये नफा होण्याची शक्यता कमी..!
ATR म्हणजे आपल्या शेअर मधील volatility तपासण्याचे साधन / ट्रेडिंग ची योग्य वेळ कळण्याचे साधन
९. Money flow index
Volume सोबतच किती पैसा शेअर मध्ये खेळतोय हे कळण्याचं साधन
१०. Stochastic RSI
Swing ट्रेडिंग साठी वेळेवर / ? सर्वांच्या आधी buy - sell सिग्नल भेटण्यासाठी
ही मला कधी तरी उपयोगी पडलेल्या इंडिकेटर्सची फक्त यादी आहे..आणि ती सुद्धा परिपूर्ण नाही..!
बहुतेक सर्व ट्रेडिंग जरी Price Action, Volume अन् RSI ने जमत असली तरी Volatile/Sideways मार्केट मध्ये तेव्हढ्याने काम होत नाही..तेव्हा बाकीच्या छोट्या गोष्टींचा आधार घेतला की मदतच होते..✌️
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.