Ajay Profile picture
Politically Non-aligned,Evidence Based Decision Maker Tweets about - #Stockmarketअभ्यास #भारत #अर्थव्यवस्था
Jul 9 13 tweets 6 min read
म्यूच्यूअल फंड (MF) बद्दल सर्वकाही - भाग १ - Basics

म्यूच्यूअल म्हणजे आपला..सगळ्यांचा..परस्परांचा..न् फंड म्हणजे पैसा.

म्हणून म्यूच्यूअल फंड म्हणजे असे आर्थिक साधन ज्याच्याने आपण आपला एकत्रित पैसा शेअर मार्केट, बाँड किंवा जमीन जुमला ह्यात गुंतवू शकतो.

#म बरं..तर हा पैसा एकत्रितच का करायचा ?

सर्वानाच गुंतवणुकीची माहिती नसते किंवा ते माहीत करून घेण्यासाठी वेळ नसतो अशा वेळेस म्यूच्यूअल फंड (MF) गुंतवणुकीच्या क्षेत्रातील तज्ञ लोकांना कामाला ठेऊन आपले पैसे गुंतवायचे काम सोपे करतात.
Jul 8 8 tweets 6 min read
इथे👇 कानडी गाणी कमी दिसत आहेत..म्हणून..

ही माझी कानडी गाण्यांची यादी -

१.Anisuthide - सोनू निगम
Mungaru Malemusic.amazon.in/albums/B07B2MJ…

२००६ चा Mungaru Male हा त्याच्या गाण्यांमुळे गाजलेला सिनेमा म्हणजे कानडी सिनेसृष्टीचा 'सैराट' moment होता..!#म २. Sariyagi - अरमान मलिक
Mungaru male 2music.amazon.in/albums/B01JDJZ…

३. Ondu Malebillu - अरमान मलिक आणि श्रेया घोषाल - Chakravarthy


music.amazon.in/albums/B07B2MJ…
Jul 6 6 tweets 3 min read
गेल्या महिन्यात भारताची आयात आणि निर्यात मधील फरक / तूट न भूतो न भविष्यती इतकी वाढलीये
👇
म्हणून भारताची परकीय गंगाजळी कमी झालीय
👇
त्यात खनिज तेलाचे भाव अजूनही आपल्याला परवडतील असे ५०-६०$ इतके खाली आले नाहीयेत
👇
#म ImageImage म्हणून भारताकडे सध्या सहज विदेशी पैसा मिळवायचे -विदेशी गुंतवणूक व एनआरआय नी पाठवलेला पैसा हे २ च पर्याय उपलब्ध आहेत
👇
NRI नी सढळ हाताने पैसा पाठवावा म्हणून भारताने थेट पैसा पाठवण्याची सीमा नुकतीच १ लाख वरून १० लाख वर नेली
👇 Image
Jun 18 9 tweets 5 min read
👇ह्याचे उत्तर किचकट आहे..आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्याला ते विज्ञान..विज्ञान वाटतच नाही..इतके ते अजब आहे..तरी एक प्रयत्न करतो..

आपण पाहिले की आइन्स्टाईनने प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वळतो हे सिद्ध केले..पण प्रकाश तसे का वळतो ह्याच्या कारणासाठी त्याने सांगितले की गुरुत्वाकर्षण #म १/९ हे मुळात बल अर्थात force नाहीये..!

आणि आपण ज्याला विश्वाची पोकळी म्हणतो ती निव्वळ पोकळी नसून ती एक त्रिमितीय रचना आहे..!

त्या रचनेची कल्पना नीट यावी म्हणून त्याला fabric of universe (उदा 👇निळा कपडा) असे म्हणतात..म्हणजे काय तर - २/n
Jun 15 9 tweets 4 min read
👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..

गोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!

ही त्याचीच गोष्ट आहे..❤️ #म १/९ साल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ३७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..!

खरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते.. Image
May 12 24 tweets 15 min read
लंकादहन..🔥

श्रीलंका..!

१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!

असे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली ?

ही आहे त्याची गोष्ट.. #म श्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..!
Apr 29 22 tweets 8 min read
LIC चा IPO येतोय..हा IPO घ्यावा म्हणून LIC कडून मोठी जाहिरातही केली जाते आहे.

पॉलिसी असणाऱ्यांनी हा IPO घ्यावा यासाठी LIC ने ६० रुपयांचा डिस्काउंट ही जाहीर केलाय..मग -

LIC चा मेगा IPO घ्यावा का ?

आणि

इन्शुरन्स चा धंदा मुळात चालतो कसा ह्याचा घेतलेला हा वेध..

#म #मराठीत इन्शुरन्स चा धंदा मोठा किचकट आहे.

ह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .
Apr 12 7 tweets 2 min read
नामिबिया , पाकिस्तान आणि शाहू ,फुले ,आंबेडकरांचा भारत

२०२१ च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये नामिबियाची टीम 👇 होती..आता नामिबिया हा आफ्रिकेतील एक देश आहे आणि आफ्रिकेत तर बहुतांशी कृष्णवर्णीय राहतात असे असूनही त्यांची टीम ही अशी का दिसत असावी हा प्रश्न मला पडला..जरा शोधल्यावर मला १/n कळले की नामिबियात फक्त ६% लोकसंख्या ही श्वेतवर्णीय आहे..आणि ते देशातील ७०% जमीन आणि उद्योगांचे मालक आहेत..! साहजिकच ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यांनाच खेळ किंवा मनोरंजन ह्यासारख्या गोष्टींसाठी वेळ भेटतो..! बरं..हे नामिबियासारख्या एखाद्या आफ्रिकेतील देशाचे नाहीये..तर २/n
Apr 10 5 tweets 3 min read
#थोडक्यात_पण_महत्त्वाचे

पेट्रोलच्या किंमती ,देशनिर्माण आणि माझी गरिबी

क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..! Image आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू

Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य) Image
Nov 28, 2021 35 tweets 12 min read
आजचा धागा - Pure टर्म इन्शुरन्स -

का घ्यावा ?
कोणी घ्यावा ?
किती घ्यावा ?
कधी घ्यावा ?
कोणाकडून घ्यावा ?
कोणता घ्यावा ?

टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..!

आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत? का घ्यावा ?

Insurance/इन्शुरन्स हा शब्द मूळ ensure ह्या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो खात्री देणे / शब्द देणे.

म्हणजेच जेव्हा आपण कशाचाही इन्शुरन्स/विमा घेतो तेव्हा ती कंपनी आपल्याला शब्द देत असते की कराराप्रमाणे विमा घेतलेल्या गोष्टीला जर काही झाले तर जबाबदारी आमची..! #म
Nov 26, 2021 4 tweets 2 min read
२६/११ हल्ला रोखण्यामागचा आपले पोलिस , NSG आणि सेना ह्यांचे पडदया मागचे राजकारण खूप छान सांगितले तुम्ही..👌

पण हे वाचून येवढेच वाटले की
-> अशा आणिबाणीच्या वेळीही सर्व फोर्सेसची कमान..अशी कमान की जी भारतातील कोणतीही सेना एका आदेशावर बोलावू शकेल..?!

#म #मराठी #२६/११ #श्रद्धांजली अशी कमान तेव्हाही अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही..कमीत कमी आणीबाणीच्या काळात अशी एखादी कमान अस्तिवात यायला हवी..! अशी कमान अस्तित्वात असती तर कदाचित ताज हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नौदलाच्या तळा वरून Marocs कमांडो NSG च्या आधी पोचले असते..किंवा NSG ला RAW च्या
Nov 14, 2021 17 tweets 7 min read
स्टॉक मार्केट मध्ये कोणता आणि किती पैसा टाकावा ?

प्रश्न जरी साधा असला तरी त्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे..तरी मी साधारण idea देण्याचा व एखादी गोष्ट का करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेन ज्याने निर्णय घेणे सोपे होईल.

#stockmarketअभ्यास #म #मराठीत "MF investments are subject to market risk, read the offer document carefully before investing" हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण #mutualfund च्या जाहिरातीत खूपदा ऐकले असेल.

पण ह्याचा अर्थ असा असतो की मार्केट मधून मिळणारा परताव्याची गॅरंटी नाहीये.तो दिवसागणिक बदलू शकतो.