अन्या Profile picture
Time Traveller

Apr 5, 2023, 6 tweets

#Barrister_Ambedkar

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते !

पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे 'दक्षिणेची राणी'' डेक्कन क्वीन'! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही

त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले.

कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला !

ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

अशा प्रकारे #बाबासाहेबांनी न्यायासाठी सरकारलाही झुकावले होते😎

#ThanksPhuleAmbedkar

#बा_भीमा

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling