कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते !
पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे 'दक्षिणेची राणी'' डेक्कन क्वीन'! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही
त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले.
कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले
आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला !
ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!
अशा प्रकारे #बाबासाहेबांनी न्यायासाठी सरकारलाही झुकावले होते😎
महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही.
अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता,
ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही.
मुलींच्या शाळा सुरळीतपणे चालू लागल्यानंतर ज्योतिरावांच्या नजरेस दुसन्या ज्या अनेक गोष्टी आल्या, त्यापैकी अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारास प्राधान्य देऊन त्या गोष्टीकडे लक्ष पुरवायचे असे त्यांनी ठरविले व त्या दिशेने प्रयत्न करावयास त्यांनी सुरुवात केली.
आपल्या देशातील सहा, सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षांपासून आपली माणुसकी गमावून बसले असून, ते धार्मिक गुलागिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि - त्यामुळेच हिंद राष्ट्र लुळे बनले असून याचा सारखा हास होत आहे, ही गोष्ट जोतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली.
या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही; आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत, असे त्यांना नेहमी वाटत असे.
सेनेच्या बंडखोरीपासून ते सेनेच्या नावासकट चिन्ह इतिहास जमा होईपर्यंत सगळ्यांना वाईट वाटलं सगळे भावनिक झाले पण मी एकटा का असेना मला मात्र आनंद झाला आहे.
ज्या माणसाने आमच्या उद्गारकर्त्याच्या मतांसाठी सतत अपमान केला त्याच्या पक्षाबद्दल आणि माणसासाठी का भावनिक व्हावं??
बाळ ठाकरे ची डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाजा विषयी काही वक्तव्ये.
१) डॉ आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते.
२) या संविधानने दिलेली लोकशाही मला कधीच मान्य नाही.
३)मराठ्यांनो मराठवाड्याचा महारवाडा करायचा आहे का?
४)आरक्षण व एट्रोसिटी कायदा रद्द झाला पाहिजे.
५) यांच्या घरात नाही पिठ व यांना कशाला हवं विद्यापीठ?
६) बौद्धांनी आमच्या नोकर्या पळवल्या आहेत.
७) नामांतर आंदोलनात आत्मदहन करणारा गौतम वाघमारे हा बेवडा होता.