जत्रा विशेष थ्रेड!!
सध्या सातारा जिल्ह्यात जत्रा सिझन सुरू आहे. प्रत्येक गावात जत्रा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. हा थ्रेड जत्रेबद्दल माहितीसाठी.
जत्रा 2 दिवस असते.
पहिला दिवस ताजी
दुसरा दिवस शिळी
ताजी यात्रा/जत्रा:
ग्रामदैवतेचे मंदिर रोषणाई करून सजवले जाते.
1/n
भाविकांची देवदर्शनासाठी मोठी रांग लागते. प्रत्येक घरात पुरणपोळ्यांचा नैवेद्य सुद्धा केला जातो. गावात खेळण्यांची दुकाने,पाळणे, मिठाईची दुकाने थाटली जातात. हा असा दिवस असतो जेव्हा तुमचे पाहुणे, मित्र तुम्हाला भेटायला येतात.
2/n #जत्रा #सातारा
त्याच दिवशी रात्री देवाची पालखी, सासणकाठी , छबिना पारंपरिक ढोल ताशांच्या सोबत गावातील तरुण वृद्ध सगळे छबिना नृत्य करतात. 3/n #जत्रा #सातारा twitter.com/i/web/status/1…
देवाची पालखी रात्रभर गावात फिरवली जाते, लोकं गुलालाची जबरदस्त उधळण करतात..पालखी घरासमोर आली की लोकं देवाचे दर्शन घेतात, सोबत असणाऱ्या लोकांच्या चहापानाची व्यवस्था देखील केली जाते. 4/n #जत्रा #सातारा
शिळी: दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रा सुरू होते ती तमाशाने. तमाशाची सुरुवात गण गौळणी ने होते मग हिंदी मराठी चित्रपटातील गाणी वाजवली जातात. तमाशाचा शेवट होतो तो म्हणजे वग नाट्याने. वगनाट्यात सामाजिक संदेश दिला जातो. तमाशा गावातील चावडीवर मोठा फड लावून केला जातो
5/n #जत्रा #सातारा twitter.com/i/web/status/1…
तमाशा दरम्यान दिवस जसा पुढे जातो तसे नातेवाईक यायला सुरुवात होते. मग दुपारी काही लोकं आपापल्या नातेवाईकांना घरी भेटतात, मटण(बऱ्याच ठिकाणी मांसाहार केला जातो) भाकरी खातात, लहानग्यांना खेळणी देणे, परत तमाशा बघायला जाणे. 6/n #जत्रा
आता 4 वाजयच्या वेळी वगनाट्य संपते आणि लोकं तिथून मग कुस्तीच्या मैदानावर जातात तिथे वेगवेगळ्या गावातून आलेले पैलवान यात्रा कमिटीच्या देखरेखेखाली कुस्त्या खेळतात. ... काही ठिकाणी बैलगाडा शर्यत असते 7/n #जत्रा twitter.com/i/web/status/1…
अशाप्रकारे यात्रा संपन्न होते. यात्रेचा खर्च गावातील प्रत्येक घरातून वर्गणी(वसूल बोलतात) काढून होतो.
यात्रा कमिटी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामसभेत नेमली जाते ज्यामध्ये सर्व समाजातील लोकं असतात.
टीप: या प्रकारच्या यात्रेचा format साताऱ्यातील बऱ्याच गावात असतो.
(समाप्त)
वरील विडिओ सौजन्य: गावातील मित्र
विडिओ सौजन्य: मित्र
@threadreaderapp unroll
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.