ninadpawar Profile picture
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ ♥️ मोबाईल फोटोग्राफी । ७/१२ होल्डर😁
Apr 18, 2023 11 tweets 8 min read
जत्रा विशेष थ्रेड!!
सध्या सातारा जिल्ह्यात जत्रा सिझन सुरू आहे. प्रत्येक गावात जत्रा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. हा थ्रेड जत्रेबद्दल माहितीसाठी.

जत्रा 2 दिवस असते.
पहिला दिवस ताजी
दुसरा दिवस शिळी

ताजी यात्रा/जत्रा:
ग्रामदैवतेचे मंदिर रोषणाई करून सजवले जाते.
1/n Image भाविकांची देवदर्शनासाठी मोठी रांग लागते. प्रत्येक घरात पुरणपोळ्यांचा नैवेद्य सुद्धा केला जातो. गावात खेळण्यांची दुकाने,पाळणे, मिठाईची दुकाने थाटली जातात. हा असा दिवस असतो जेव्हा तुमचे पाहुणे, मित्र तुम्हाला भेटायला येतात.
2/n #जत्रा #सातारा ImageImageImageImage