Profile picture
किरण... @Coolkiranj
, 18 tweets, 4 min read Read on Twitter
१३-डिसेंबर- १९४२ #हुतात्मा_दिन #गारगोटी..
देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटलेला असताना गारगोटी याला अपवाद नव्हती. स्वातंत्र्याचा लढण्यासाठी आर्थिक मदत कमी पडत असलेने गारगोटीतील सरकारी तिजोरी लुटायची योजना अतिशय गुप्तपणे तयार करणेत आली.
त्यासाठी तरुण क्रांतिकारक करविरय्या स्वामी, शंकरराव इंगळे (दोघे कापशी), तुकाराम भारमल (मुरगुड), हरीबा बेनाडे आणी मल्लाप्पा चौगले (चिखली),बळवंत जबडे (जत्राट),परशुराम कृष्णा साळोखे (खडकलाट), नारायण दाजी वारके (कलनाकवाडी) या क्रांतीकारकांची फौज तयार झाली.
कापशी - गारगोटी रस्त्यावर असणाऱ्या मांगनुर घाटावरील पाल या गावातील आमराई पासुन पुढे गेल्यावर दुर्गम डोंगरामध्ये काही गुहा आहेत त्या गुहेत या सगळ्यांच्या मिटींग होऊ लागल्या. गारगोटीला जाणाऱ्या सगळ्या वाटांचे नकाशे बनवले गेले ....
पालचे गणपती केसरकर व त्यांचे साथीदार गोपाळ पाटील यांनी या क्रांतीकारकांना कपडे , जेवण आणी शस्त्रे पुरवायचे सहकार्य केले पण हे सगळे भुमिगत होऊन.. गारगोटीमधील सरकारी खजिना लुटायचा आणी तिथे असणाऱ्या इंग्रज कचेरीवर तिरंगा झेंडा फडकावून इंग्रज सत्तेविरोधी घोषणा द्यायच्या ...
" भारत माता की जय ... वंदे मातरम " असा जयजयकार करायचा.... ही पहिली योजना आणी त्या बरोबरीने कूर येथे दुधगंगा नदीवर असणारा दगडी पुल उडवून देऊन ब्रिटिश सैनिकांना एकाकी पाडायचे ही दुसरी योजना ....पण हे सगळे अत्यंत गुप्तपणे करायचे होते कारण आपल्याकडे फितुरांची संख्या काही कमी नाही..
चार पैशाच्या मोहापायी आपलाच देश पारतंत्र्यात ठेऊ पहाणा-या औलादी जशा आजही आहेत तशाच तेव्हाही होत्या ....आणी अशा देशद्रोही लोकांना जर या योजनेची कुणकुण लागली तर हा क्रांतीचा खेळ सुरु होण्यापुर्वी संपणार होता ...आणी हा स्वातंत्र्याचा लढा तर साक्षात बलाढय़ इंग्रज सत्तेविरोधात होता ..
पण छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात या क्रांतीकारकांनी सांकेतीक शब्द वापरून इंग्रजी पोलीस आणी त्यांचे खबरे यांना चकवण्यासाठी गनिमी काव्याने शह दिला .... सर्वसामान्य लोकांमध्ये बोलताना हे क्रांतीकारी अतिशय वेगळी भाषा वापरत ....
प्रत्येकाला एक सांकेतीक नाव होते ... बलभीम , गोदूताई , कॅप्टन , सावळ्या , तानसेन , भट , गुणवंत ही नावे घेताना समोरच्या त्रयस्थ व्यक्तीला काहीही कळत नसे ... ' राजधानीला जायचे ' म्हणजे कोल्हापूरला जायचे .... ' बाजारपेठेत फेरफटका मारुया ' म्हणजे सांगलीला जायचे .... '
जंक्शन खल्लास ' म्हणजे मिरजेत पोहोचायचे. ' एप्रिल फूल करुया ' म्हणजे खजिना लुटायचा' बी.आर. पाटलांचे लग्न ठरले ' बार्शी रेल्वे लुटायची ठरली ' लग्नाच्या अक्षता पोहोचल्या ' म्हणजे बंदुका पोहोचल्या .' अंगठी घातली ' म्हणजे पिस्तूल मिळाले...
' दागिन्यात खडे घालायचे ' म्हणजे काडतुसांचा वापर करायचा ...

कोणाच्या बापाची आहे हिंमत ..???? कोणाला समजणार हे बोलणं !!! हे सगळे स्वातंत्र्यासाठी आसुसलेले वेडे वीर आपल्या कामगिरीवर निघाले ....

१३ डिसेंबर १९४२ हा दिवस ठरवण्यात आला ....
त्यातच 15 ऑगस्ट 1942 रोजी कोल्हापुरच्या रविवार वेस चौकात बंडा हरदास या पोलिसाने केलेल्या लाठीहल्ल्यात गडहिंग्लज मुत्नाळ येथील बिंदु नारायण कुलकर्णी या युवक क्रांतीकाऱ्याचा मृत्यु झाला ... 16 ऑगस्ट 1942 या दिवशी त्याच्या अंतयात्रेत काही क्रांतीकारकांनी रविवार वेस चौकात...
' बिंदूचौक ' असा फलक लावला ... आणी रविवार वेस चौकाचा कायमचा ' बिंदूचौक ' झाला ... क्रांतीकारकांना बळ मिळाले .... आणी हा सशस्त्र क्रांतीचा लढा आणखीनच तिव्र झाला .... एका क्रांतीकारकाच्या मृत्युनंतर कायदा आणी सुव्यवस्था बिघडू शकते याची धास्ती इंग्रजांनी घेतली...
ठरल्याप्रमाणे सगळे क्रांतीकारी आपल्याला नेमुन दिलेल्या कामगिरीवर बाहेर पडले .... कुरच्या दुधगंगेवरच्या पुलाखाली सुरुंग पेरण्यात आले .... आणी क्रांतीकारी गारगोटीच्या दिशेने निघाले .... सगळे गुप्तपणे गारगोटीच्या खजिन्याच्या जवळ कचेरीकडे पोहोचले .... आणी इथेच घात झाला ...
कोणीतरी ही माहिती गोऱ्या अधिकाऱ्याला कळवली ....त्यातच पुलाखालच्या सुरुंगांचा स्फोट झालाच नाही ....जे इंग्रज शिपाई बंदोबस्तावर होते त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या ... पण इंग्रज पोलीसांनी कचेरीला वेढा घातला ... सैनिक इमारतीच्या कौलावर चढले ... काहींनी खिडकीतून आत बंदुका रोखल्या..
आणी सगळे क्रांतीकारी कोंडले गेले, फितुरीच्या पैशाने विकल्या गेलेल्या गुलामगिरीने स्वातंत्र्याची झेप घेणाऱ्या क्रांतीच्या गरुडांचे पंख छाटायला शिकाऱ्यांना मदत केली.. प्रचंड पोलीसी बळापुढे हे स्वातंत्र्याचे ध्येयवेडे अक्षरशः छिन्नविछीन्न झाले .... एक क्रांती फसली ...
या वेड्या साहसात करवीरय्या स्वामी (कापशी) , शंकरराव इंगळे (कापशी) , नारायण वारके (कलनाकवाडी) , हरीबा बेनाडे (चिखली) , तुकाराम भारमल (मुरगुड), मल्लाप्पा चौगले (चिखली), परशुराम साळोखे (खडकलाट) , नरसू परीट (अकोळ), महादेव सुतार (गंगापूर), अण्णा रामगोंड पाटील (इचलकरंजी),
निवृत्ती गोपाळ आडूरकर, शंकर पोतदार ( हुपरी ), बळवंत जबडे ( जत्राट ), गुंडा धुळा सुतार ( आळते ) , मारुती आगलावे ( कुर्ली ) अशा अनेकांनी विविध घटनांमध्ये आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्रसुर्याला अर्पण केली ...
या क्रांतीकारकांना मदत करणाऱ्या प्रत्येकाला क्रांती कार्यातील सहभागाबद्दल पोलिसांकडून मरण यातना सहन कराव्या लागल्या... अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला ....!!
या वीर क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन.. 🙏🏻🙏🏻💐💐

साभार- आंतरजाल
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to किरण...
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member and get exclusive features!

Premium member ($30.00/year)

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!