सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक
Feb 4, 2022 • 10 tweets • 2 min read
साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली-कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती.
⬇️ #साभार
तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर
त्या आजी मला म्हणाल्या, "व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.
⬇️
Sep 21, 2021 • 40 tweets • 6 min read
Exit Interview:
कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ती आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला तो '‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’' साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते. 1/n
विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफाॅर्मन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. 2/n
Feb 13, 2021 • 15 tweets • 3 min read
सावधान #सुवर्ण_संधी
दिवसातले फक्त दोन तीन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा..
कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा...
अशा जाहिराती बघितल्याच असतील...?
नसतील तर बघा...
गुगलवर Data entry job असं काही तरी search केलं की तुम्हाला message येईलच. त्या link वर क्लिक केले की एक वेबसाइट open होईल.तिथे ज्या कंपनीची जॉब vacancy आहे ती link दिसेल.तिथे कामाचे स्वरुप दिसेल. Printed pages वरील मजकूर फक्त आहे तसा type करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं.
Jan 3, 2021 • 12 tweets • 2 min read
रांगडा, इरसाल आणि जगण्यात मोकळेपणा असलेला... 'कोल्हापूरी माणूस.’
त्याचे हे दोन किस्से..
१) १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युध्दात अमेरिकेने पाकिस्तानला 'पॅट्रिअॅट' रणगाडे पुरवले आणि संपूर्ण भारतात अमेरिकेविरुद्ध जनक्षोभ उसळला. तसा तो कोल्हापूरातही उसळला. 1️⃣ #कोल्हापूर
अमेरिकेला धडा शिकवायचं कोल्हापूरात ठरलं. अमेरिका कुठं आणि कोल्हापूर कुठं? कसा धडा शिकवणार? पण कोल्हापूरी माणसाच्या मनानं एकदा ठरवलं की त्या गोष्टीचा थांग, छडा, पिच्छा,नाद, शब्द,प्रयत्न, हेका, हट्ट, जिद्द,चिकाटी सोडायची नाही म्हणजे नाही. 2️⃣
Sep 10, 2020 • 11 tweets • 2 min read
नोकर्या देणारा वांगी बोळ....
कोल्हापुरातल्या महाद्वार रोडला लागून असलेल्या वांगी बोळात गुळवणी यांचा एक जुना वाडा. या वाड्यात जिन्याखाली चिंचोळ्या जागेत एक टेबल खुर्ची. टायपिंगचे मशीन. जागा मिळेल तिथे चिकटवलेल्या नोकरीच्या जाहिराती. त्यात चक्क देवानंदचाही एक फोटो. 1/11 #कोल्हापुर
या नोकरीच्या जाहिराती म्हणजे अनेकांना आशेचा किरण होत्या. पोस्टात क्लार्क... तहसीलदार फौजदार... रेल्वेत टीसी होण्याची संधी... अशा असंख्य जाहिराती तेथे चिकटवलेल्या असायच्या. नोकरीची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण तरुणी, त्यांचे पालक येथे यायचे. 2/11
May 12, 2020 • 8 tweets • 2 min read
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
अवैधरित्या तुम्ही मुंबई मध्ये आलात
अवैधरित्या तुम्ही झोपड्या वसवल्या
अवैधरित्या तुम्ही व्यवसाय केले
अवैध गोष्टी करत भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं..
१/८ #आवडलेली#कविता#मराठी
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
एकाच झोपडीत २०/२० जणं तुम्ही राहता
तुमच्या शहरात नसलेला आसरा इथे शोधता
गावच्या कुटुंबाचं पालनपोषण करता
माणूस म्हणून जगणं इथे उपभोगता
आणि हे सगळं अवैध मार्गाने करता
२/८
May 3, 2020 • 13 tweets • 3 min read
लायकी दाखवण्याचे दिवस
बुधवार, 29 एप्रिल 2020
गवार वीस रुपये...
कलिंगडं शंभरला तीन!
सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. १/१३
#साभार#शेतकरी
कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. २/१३
Apr 29, 2020 • 7 tweets • 3 min read
साधारण 15 वर्षांपुर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजुला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. १/७
- प्रभा कुडके, Indian Express #RIPIrrfanKhan
इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते. मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. २/७
Apr 13, 2020 • 21 tweets • 4 min read
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. (1) #आवडलेली#कथा
म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा. त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल.. (2)
Dec 5, 2019 • 11 tweets • 3 min read
#किल्ले_रामसेज वरील अल्पपरिचित चोर दरवाजा :
रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलं आहे -"किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब (दोष) आहे, याकरितां गड पाहून, १,२,३ दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात." १/११
सतत तब्बल साडेपाच वर्षं मुघलांच्या मोठमोठ्या सरदारांना झुंजवणाऱ्या, मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या छोटेखानी पण लढाऊ अशा रामसेज किल्ल्यालाही दोन दरवाजे आणि चोरदिंडी आहे. पैकी किल्ल्यावर जेथून प्रवेश होतो तिथले प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. २/११
Dec 13, 2018 • 18 tweets • 4 min read
१३-डिसेंबर- १९४२ #हुतात्मा_दिन#गारगोटी..
देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटलेला असताना गारगोटी याला अपवाद नव्हती. स्वातंत्र्याचा लढण्यासाठी आर्थिक मदत कमी पडत असलेने गारगोटीतील सरकारी तिजोरी लुटायची योजना अतिशय गुप्तपणे तयार करणेत आली.
त्यासाठी तरुण क्रांतिकारक करविरय्या स्वामी, शंकरराव इंगळे (दोघे कापशी), तुकाराम भारमल (मुरगुड), हरीबा बेनाडे आणी मल्लाप्पा चौगले (चिखली),बळवंत जबडे (जत्राट),परशुराम कृष्णा साळोखे (खडकलाट), नारायण दाजी वारके (कलनाकवाडी) या क्रांतीकारकांची फौज तयार झाली.