Profile picture
, 35 tweets, 18 min read Read on Twitter
मराठी समाजाने उद्यमशीलतेकडे कसं पाहावं? या विषयावरील माझं हे #ट्विटव्याख्यान

#ट्विटरसंमेलन
हा विषय घेऊन लिहिण्याचं कारण असं आहे की परवा मी एक मुलाखत ऐकत होतो. राज ठाकरे यांची आजतक च्या कुठल्यातरी एका मुंबई मंथन नावाच्या कार्यक्रमात मुलाखत चालू होती. #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की भारतामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती 17 कुटुंबियांच्या हाती एकवटलेली आहे तर तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं ? तुम्ही त्यांच्याविरोधात उभे राहणार कि नाही ?

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
त्या प्रश्नावर त्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे असा त्यांना प्रश्न पडला आणि तोच प्रश्न मलाही पडला. कि एखाद्या उद्योगपतीने कष्टाने साम्राज्य उभारावे यात गैर काय ? का आपण नेहेमी त्यांच्या कडे शोषणकर्ते म्हणून पाहायचं ? #ट्विटव्याख्यान #ट्विटरसंमेलन
एक समाज म्हणून आपण मराठी लोक उद्यमशीलतेकडे कसे बघतो याचं मी नेहेमीच निरीक्षण करीत आलो आहे, साधारणपणे गरिबीचे उदात्तीकरण करणे हा मूळ स्वभाव आपला दिसतो #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
व्हॉट्सअप वरून असे संदेश नेहमीच फिरत असतात की मराठी माणूस उद्योगधंद्यांमध्ये कसा मागे राहिलेला आहे. गुजराती मारवाडी लोकांच्या कशा लॉबी असतात, आपण मात्र खेकडे वगैरे वगैरे. #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
वगैरे.एक गमतीदार विरोधाभास असा कि, शेअरबाजारात एक्सपर्ट म्हणून ओळखली जाणारी अनेक मंडळी मराठी आहेत अनेक यशस्वी म्युच्युअल फंड चालवणारे फंड मॅनेजर्स मराठी आहेत. पण सामान्य मराठी माणूस शेअरबाजाराला काय म्हणतो तर "सट्टाबाजार"

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
जेव्हा अंबानी आणि अदानीचा उल्लेख होतो तेव्हा त्याच्याकडे असे बघितले जाते की या चोर कंपनी कृष्णकर्म करून मोठ्या झालेल्या आहेत त्यांनी काही बरी कामे केलेले नाहीत
#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
बेसिकली उद्यमशीलतेचा मुद्दा आला की आपण मराठी माणसाची तुलना गुजराती मारवाडी या समाजांशी करतो आपण कसे भाबडे आहोत याच्या कहाण्या सांगत गळे काढण्यातच सगळा वेळ खर्च होतो

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
मराठी माणसाची असलेले पैसा या विषयाची विरक्ती सगळ्या समाजाच्या उद्यमशील अधोगतीच्या मूळ कारण आहे.

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
सर्व भव्य आणि विस्मयकारक सांस्कृतिक आणि इतर गोष्टींच्या मागे आर्थिक ताकद ही असतेच असते

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
एक उदाहरण सांगतो जसलोक हिंदुजा यासारखी हॉस्पिटल सिंधी समाजाने उभी केली त्यामुळे या समाजातल्या लोकांना किफायतशीर दरात उपचार मिळू शकतात. HR, CHM, जय हिंद सारखी कॉलेजेस उभारली ज्यात त्या समाजाच्या विध्यार्थ्यांना कमी पैशात आरक्षणाद्वारे प्रवेश मिळतो. #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
पण मराठी लोकांचे काय ? मराठी समाजाला यांची गरज नाही का हॉस्पिटल आणि कॉलेजेस ची ? पण तसं होत नाही त्या हॉस्पिटल बांधण्यासाठी असलेला पैसा आपल्याकडे नाही

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
पैशाबद्दल न्यूनगंड असण्याचा हा आजार आपल्या समाजाला झालेला आहे आणि आपण अशा संस्कारातून बाहेर पडायला अजूनही तयार नाही आहोत

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
अंथरूण पाहून पाय पसरावे अशी शिकवण लहानपणापासून देऊन आपण आपल्या नवीन पिढीवरही अल्पसंतुष्ट वृत्ती लादत राहतो, त्यामुळे समाजामध्ये संपत्तीचा संचय होत नाही आणि धाडसीपणाने काही भव्यदिव्य होतानाही दिसत नाही #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आर्थिक ताकद हातात आल्याशिवाय आपल्या समाजाचे काही भलं होणार नाही ही बाब लवकरात लवकर सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
संपत्तीनिर्मिती हि वाईट गोष्ट आहे असा चुकीचा दृष्टिकोन मराठी समाजाने ठेवू नये.

'लुळ्या पांगळ्या श्रीमंती पेक्षा, धडधाकट गरिबी बरी ' असे गरिबीचे फाजील उदात्तीकरण केल्यामुळे मराठी समाज धनिक वर्गाकडे संशयाने पाहतो

#ट्विटव्याख्यान #ट्विटरसंमेलन
त्यामुळे आमचा चांगलं चाललंय असं सांगायला कोणी तयार होत नाही, जर एखाद्याने चुकून असं म्हटलं तर हा नक्की नको ते काळे धंदे करत असणार , असे म्हणून त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आता हे बदलण्यासाठी वेळ तर नक्कीच लागेल ती एक मोठी प्रक्रिया आहे. हळूहळू अर्थसाक्षरता जशी मराठी समाजात येत जाईल तसेच आर्थिक सुबत्ताही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला लागेल.

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आज परिस्थितीस भिडण्याची, समस्या समजून घेण्याची, कौशल्ये आत्मसात करण्याची धडपड हल्लीच्या तरुण पिढीकडे दिसते त्यात संपत्ती निर्मितीची बीजे नक्कीच आहेत असं मला वाटतं

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
तरुणांना भावणाऱ्या नवीन उद्यमशील प्रकार म्हणजे स्टार्टअप (नवोदयम)

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
लहान सहान उद्योगधंदे आपल्याकडे यापूर्वी सुरू झाले चालवले गेले पण आज कल तरुणाईला भुरळ पडते ती स्टार्टअप या संकल्पनेची

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
प्रामुख्याने स्टार्टअप नक्की कशाला म्हणायचं हे काही अजून कुणी लिहून ठेवलेलं नाही. परंपरागत उद्योग चालत आलेले आहेत तेच नव्या स्वरूपात चालू करणे म्हणजे स्टार्टअप का? तर नाही. #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
अधिकृत अशीही स्टार्टअप ची व्याख्या नाही पण परंपरागत नसलेला पण खूप मोठा प्रॉब्लेम सोडवण्याची करण्याची असलेली क्षमता असलेली एखादी अशी संकल्पना आणि खुप मोठ्या प्रमाणावर ती संकल्पना राबविण्याची असलेली तयारी ह्या दोन्ही गोष्टी मिळून start-up तयार होतं

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आणि मुख्य म्हणजे परंपरागत व्यवसाय कोणी नव्याने चालू करत असेल तर त्याला आर्थिक पाठबळ मिळेलच असे नाही पण नवीन संकल्पनेत असलेली पोटेन्शियल बाजारपेठ काबीज करण्याची असलेली गुणवत्ता

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
अशा अनेक गोष्टींचे त्रैराशिक मांडून गुंतवणूकदार अशा संकल्पनांवर १००% जोखीम असतानाही आपल्या पैसे लावण्याची तयारी ठेवतात त्यांना एंजल इन्व्हेस्टर म्हणतात

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
भारतातल्या फ्लिपकार्ट स्नॅपडील यासारख्या अनेक कंपन्या अशाप्रकारे मोठ्या झाल्या साधारणपणे बिलियन डॉलर मूल्य झालेल्या कंपन्यांना युनिकॉन असे म्हणतात

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
प्रत्येक उद्यमी चं हे स्वप्न असतं की आपल्या start-up युनिकॉन व्हावं.

भारताचे असलेली लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येची क्रयशक्ती, खरेदी करण्याची असलेली मानसिकता या भारतीय बाजारपेठेच्या जमेच्या गोष्टी आहेत.

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
त्यामुळे सध्या असलेला काळ हा स्टार्टअपसाठी सुवर्णकाळ समजला जातो. असं म्हणतात की तुम्ही नुसतं हुशार असून चालत नाही तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे आणि योग्य माणसांना ओळखणे हे स्टार्टअप करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आणि असंही म्हटलं जातं कि सध्या बाजारपेठीय गणितात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला भारतात असावं लागेल
#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आपल्या सर्वांना माहीती असलेला एक अत्यंत यशस्वी असा मराठी स्टार्टअप म्हणजे एम इंडिकेटर

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
तर हे सगळे लिहिण्यामागचा उद्देश हा की भारत महासत्ता होणे वगैरे भावनिक मुद्दे पण पुन्हा पुन्हा बोलत राहून कदाचित मनाचं समाधान होऊ शकतं पण त्या गोष्टीसाठी खरंच हातभार लावायचा असेल तर त्याचा मार्ग आर्थिक सुबत्तेतून तिकडून जातो. #ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना हे नक्कीच माहिती असेल की आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या देशाचे हितसंबंध आपोआपच जोपासले जातात आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न ही आपोआप सुटतात.

#ट्विटरसंमेलन #ट्विटव्याख्यान
महाराष्ट्र कलासंस्कृती आणि साहित्यामध्ये अग्रेसर आहे. साहित्य आणि कला महाराष्ट्राचे शक्तिस्थान म्हणून ओळखले जातात.

संमेलनाच्या निमित्ताने अर्थ साहित्य सुद्धा तयार व्हावं या अपेक्षेसह आपला निरोप घेतो ट्विटर व्याख्यानाची संधी दिली याबद्दल @MarathiWord यांचे आभार मानतो.

लोभ असावा
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to Susheel
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member and get exclusive features!

Premium member ($3.00/month or $30.00/year)

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!