My Authors
Read all threads
नमस्कार, #ट्विटरसंमेलन मध्ये #ट्विटरव्याख्यान द्वारे मत मांडण्यास संधी दिल्याबद्दल, सर्वप्रथम आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद!

विषय – मोडी प्रशिक्षण – काळाची गरज

#मोडीलिपी ही मायमराठीची एक ऐतिहासीक लिपी आहे, पूर्वी ती शीघ्रलेखनासाठी वापरली जात असे.
#ट्विटरव्याख्यान मराठ्यांनी आपल्या पराक्रमांनी इतिहास घडवला, पण तो लिहून ठेवण्याचे कष्ट जास्त घेतले नाही, आणि जो लिहिला तो आज मोडी लिपीत कागदपत्रांमध्ये बंद आहे. तो इतिहास वाचण्यासाठी फक्त मोडी प्रशिक्षण घेणे गरजेचेच आहे. असे मला वाटते #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान मोडी लिपीतील लाखो दस्तऐवज वाचून त्यात नक्की काय लिहीले आहे, ते समजणे महत्वाचे आहे. आपल्याला ज्ञात इतिहास, शाळा कॉलेजात शिकवला जातो, व जो आज इतिहासकारांनी स्वत: कष्ट घेऊन आपल्यासमोर मांडला आहे तो सुमारे ३०% आहे. महाराष्ट्राचा इतिहास उजेडात येणे बाकी #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान अजुनही मध्ययुगीन महाराष्ट्राचा बाकीचा इतिहास उजेडात येणे बाकी आहे. आज प्रत्येकजण कोणतीही गोष्ट करण्यासाठी फायदा पाहतो. मोडी लिपी प्रशिक्षण घेतल्यावर किंवा घेण्यासाठी फायदा काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असा विचार येणे स्वभाविक आहे. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान पण आज मोडी शिकून फायदा काय? तर मोडी प्रशिक्षण घेण्याचे फायदे बरेच आहेत. फायदे काय यांची वर्गवारी करुया. १) सामाजीक – मोडी प्रशिक्षण घेतल्याने उपलब्ध अलेलेल्या कागदपत्रांचे वाचन होईल, शेकडो वर्षापासून अंधारात असलेला इतिहास समाजासमोर येईल. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान अज्ञात शूरवीर आणि पराक्रमी व्यक्तींची माहिती आपल्याला मिळेल. एखाद्या व्यक्ती वा दूर्लक्षीत घटकाचे अनमोल योगदान जगासमोर येऊ शकते. ज्यामुळे आपण संबंधीत विषयाला, व्यक्तिला न्याय देऊ शकतो. गरज आहे ती संशोधनात्मक अभ्यासाची आहे. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान २) सांस्कृतीक – संस्कृती ही परीवर्तनशील असते, तरीही तिची मुळ मूल्ये फारशी बदलताना कमी दिसतात. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला सांस्कृतीक वारसा आपल्या पिढीने जतन करुन पुढच्या पिढीला देणे ही जबाबदारी आपलीच आहे. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान की आपला सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी चिनी–जपानी लोकांची वाट बघायची? की त्यांच्याकडून एखादं उत्पादन बाजारात येईल आणि हे कार्य चुटकीसरशी होईल. मोडी लिपी दस्ताऐवज वाचण्याचे कार्य चुटकीसरशे झाले असते, तर ते कागद शेकडो वर्षे धुळ खात पडले नसते. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान ३)ऐतिहासीक – इतिहास हा आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत असतो. आजपर्यंत झालेल्या इतिहास लेखनात काही तारखांचे, घटनांचे, वृत्तांचे घोळ आहेत, इतिहासकारांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. ह्याला पर्याय मोडीत असलेली संबंधीत कागद शोधून वाचन करणे. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान ४) राजकीय – (History is Past Politics) छ. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, पेशव्यांचे मंत्रीमंडळ संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहत होते. त्या काळात केलेल्या जनहितैषी सुधारणा, योजना आजही आपल्याला मार्गदर्शक ठरताना दिसतात. सद्यस्थिती आपण जाणताच. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान ५) व्यवहारीक – मोडी लिपीच्या अभ्यासाचा उपयोग हा इतिहास व मराठी विषय घेऊन शिक्षण घेत असलेल्या लोकांना नव संशोधन करण्यास निश्चीत होऊ शकतो. पण याचबरोबर मॅनेजमेंट, कायदा, पत्रकारीता तसेच इतर समाजशास्त्रीय विषयाचे शिक्षण घेत असलेल्या लोकांना होऊ शकतो. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान अस्सल प्राथमिक दर्जाची कागदपत्रे ज्याला आपण आज प्रमाण म्हणू शकतो. अशी कागदपत्रे मोडीत उपलब्ध आहेत. अभियांत्रीकी क्षेत्रासाठीचा फायदा, इतिहासकालीन बांधकाम हे आजच्यापेक्षा कैकपटीने चांगले. तत्काली डिझाईन्स, इतर कागद मोडीत उपलब्ध आहेत, शोधणे गरजेचे #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान वैद्यकीय क्षेत्रासंबधीत बरेच कागदपत्रे मोडीत सापडतात. गरज आहे ती डोळस वृत्तीने शोधण्याची ६) वैयक्तिक – मोडीच्या चार कागदपत्रांच्या आधारे केलेल्या संशोधनावर PhD चा प्रंबंध लिहून होऊ शकतो, फक्त गरज आहे ती संबंधीत कागदपत्रे शोधून वाचण्याची. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान मोडी कागदपत्रांचा आधार घेऊन केलेल्या संशोधनाला अस्सल प्रमाण वा अस्सल संशोधनही म्हणू शकतो. आज होत असलेल्या संशोधनला खरचं किती व्याप्ती असते हाही संशोधनाचाच भाग आहे. (संशोधनात्मक अभ्यास करुन केलेले काही PhD प्रंबंध याला अपवाद आहेत.) #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान तसेच आपल्या कुटुबांसंबंधीत बाबी शोधून आपल्या पुढच्या पिढीला देणे, वा आपल्या कुटुंबाची ऐतिहासीक पार्श्वभूमी जाणून घेवून पुढच्या पिढीला देणे हे कार्य तरी वैयक्तिक पातळीवर होण्यासारखे आहे, आणि ह्यासाठी तरी आपण स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला, अशा असामान्य कार्य असलेलेल्या व्यक्तींची सर्व माहिती बरेच संशोधक शोधत असतात. पण सर्वसामान्यांनी तरी आपल्या कुटुंबांची माहिती शोधण्यासाठी आपले आपण प्रयत्न करावेत. आणि आपल्या कुटुंबांचा वारसा जपावा. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात की आपण शाळे बाहेरही बरेच शिक्षण घेत असतो. ह्या सगळ्याबरोबर ऐतिहासीक, सांस्कृतीक वैभवशाली वारसा असलेली मोडी शिकली तर ह्याने आपल्या जीवनात कोणताही तोटा होत नसून फायदाच जास्त दिसत आहे. गरज आहे ती पाहण्याची #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान ७) आर्थिक – काही मोडी कागद वाचण्यासाठी प्रती कागद २०० रुपये ते २००० रुपये मानधन मिळत असते, संबंधीत मानधन कागदपत्रांचे महत्व व मोडी अभ्यासकांच्या वेळावर अवलंबून असते. आज सरकारी यंत्रणाही मोडी वाचकांसाठी परीक्षा आयोजीत करुन त्यांची नियुक्ती करत असते. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान सद्यस्तिथीत तहान लागल्यावरचं विहीर खोदण्यास सुरुवात केली जाते, पण त्या अगोदर एखादे नियोजन, दूरदृष्टी ठेवून कार्य करायची कल्पना कमी दिसते. इतिहासकालीन गोष्टी पाहाता आपल्यासाठी ही कार्ये कशी करायची व काय केल्यावर काय होते हे अगोदरच लिहिल्याचे दिसते. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान छत्रपती शिवरायांनी त्याकाळी केलेल्या कार्याचा, नियोजनाचा फायदा आजही महाराष्ट्राला होत आहे. महाराजांनी केलेले अचुक मॅनेजमेंट हा संशोधनाचा वा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मग अशी ही सर्व नियोजने व कार्ये आज मोडी लिपीत बंद आहेत. त्याचा अभ्यास का करु नये? #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान गरज ही शोधाची जननी आहे. हे मान्य आहे, पण मला वैयक्तिक पातळीवर मोडीची गरज लागल्यावरच मोडीकडे वळणार नाहीतर नाही. असे करणे बंद केले पाहिजे. तहान लागण्यापूर्वीच विहीर खोदली पाहिजे, आणि इतर नव शोधासाठीची गरज शोधली पाहिजे. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान #मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या सर्व ट्विटरकर मित्रांना नम्र विनंती ! #मोडी लिपी प्रचार, प्रसारासाठी बरेच लोक अविरत कार्य करत आहेत. मोडी ही मराठीचीच लिपी आहे, ह्या कार्यात असलेल्या सर्व मोडी साधकांना,अभ्यासकांना आपला पाठींबा जरुर द्यावा. #ट्विटरसंमेलन #मोडीलिपी
#ट्विटरव्याख्यान तसेच आपल्या वैयक्तिक मोडी प्रशिक्षाणासाठी मला कधीही संपर्क करावा. मी आपल्याला फक्त तीन तासात सर्व मोडी मुळाक्षर ओळख शिकवू शकतो. ट्विटरवर मायमराठीचा जागर करण्याबरोबरच #मराठी ची ऐतिहासीक लिपी शिकण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान झालातर सर्वांगी फायदाच होईल, अन्यथा #मोडी प्रशिक्षण घेऊन #मायमराठी ची सेवा केली असे समजावे. फक्त अल्पवेळेचा फायदा पाहण्यापेक्षा दूरदृष्टी ठेऊन डोळसपणे मोडी लिपीकडे पाहणे गरजेचे आहे. काही नाहीतर आपण भविष्यात आपल्या नातवंडाना मोडी विषयी सांगू शकतो. #ट्विटरसंमेलन
#ट्विटरव्याख्यान सदरच्या कार्यानेच #मोडीलिपी चा वारसा, पुढच्या पिढीला देऊ शकतो. असे मला वाटते.

आज बोलताना काही चूकलं असेल तर लहान भाऊ समजून माफ करावे,
ही नम्र विनंती!

#ट्विटरसंमेलन मध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजक @MarathiWord@ShaileshBronato यांचे मपपूर्वक आभार!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Navinkumar Mali🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!