निरिक्षणाअंती (सध्या मी इतकेच करतो) मला एक जाणवले की बऱ्याच जणांसाठी ही निवड सोपी होती.
माझ्यासाठी हे आधीही सोपे नव्हते, आताही नाही.
मोदीजी या देशाच्या लोकशाहीला घातक आहेत आणि राहुलजी या देशाला आर्थिकदृष्टय़ा घातक आहेत याची मला खात्री आहे.
१/क्ष
आपल्याला दोन वाईटांमधून वेगवेगळ्या कसोट्यांवर जोखून कमीतकमी वाईटाची निवड करायची होती.
असो..!
२/क्ष
खरेतर मला आज ज्या विषयावर व्यक्त व्हायचे आहे तो म्हणजे #नोटबंदी ..!
३/क्ष
आणि बरेच उरलेले लोक ज्यांनी सुद्धा या अभूतपूर्व घटनेत त्रास झेलला ते अजून संभ्रमात आहेत की,
देशाचा तोटा झाला की फायदा झाला?
४/क्ष
जेव्हा सरकारचा अभ्यास पूर्ण झाला तेव्हा हा मोठा निर्णय घेण्यासाठी सरकार आणि आरबीआय यांच्यात एक मीटिंग झाली. श्री. वेंकटेश नायक या आरटीआय कार्यकर्त्याच्या जिद्दीमुळे त्या मीटिंगची मिनिटे (सार) आरबीआयला दोन वर्षे नकारघंटा वाजवल्यावर शेवटी ८ मार्च २०१९ ला द्यावी लागली.
५/क्ष
आपण ती समजून बघू.
१. सरकार: २०११-१२ ते २०१५-१६ या काळात ५०० आणि १००० च्या नोटा या अनुक्रमे ७६.३८% आणि १०८.९८% ने वाढल्या आहेत, तर त्या तुलनेत याच काळात जीडीपी फक्त ३०% ने वाढला आहे.
६/क्ष
त्यामुळे सरकारचे मानणे होते की ज्याअर्थी जीडीपी वृद्धिच्या तुलनेत इतक्या नोटा वाढल्या त्याअर्थी या दोन प्रकारच्या नोटांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात काळा पैसा अर्थव्यवस्थेत आला आहे.
७/क्ष
आरबीआय: जो जीडीपी वृद्धिचा दर (३०%) तुम्ही सांगत आहात तो Real rate आहे आणि जो नोटा वाढल्याचा दर (७६.३८% आणि १०८.९८%) तुम्ही सांगता आहात तो Nominal rate आहे.
म्हणजे, हुशार मोदी सरकारला हा निर्णय घेईपर्यंत Real rate आणि Nominal rate मधला साधा फरक सुद्धा माहित नव्हता?
८/क्ष
२०१७-१८ मध्ये भारताने फक्त १०रु पेनाच्या १०० नगांचे उत्पादन केले.
जीडीपी: १००x१०=१०००रु
समजा, २०१८-१९ मध्ये महागाई ५% ने वाढली, म्हणजे पेनाची किंमत १०.५ रु झाली. पण भारताचे ९८ नगांचेच उत्पादन झाले.
मग जीडीपी: ९८x१०.५=१०२९रु
पण महागाई दर वगळला तर जीडीपी:९८x१०=९८०रु
९/क्ष
२०१८-१९ चा १०२९रु जीडीपी हा Nominal जीडीपी आहे जो वाढल्याचे दिसते.
पण महागाई दर वगळता आलेला २०१८-१९ चा ९८०रु जीडीपी हा २०१७-१८ च्या १०००रु जीडीपीच्या तुलनेत Real जीडीपी आहे, जो दाखवतो की भारताचे उत्पादन २०१७-१८ च्या तुलनेत घटले आहे.
१०/क्ष
२०११-१२ मध्ये जीडीपी ८७.३६ लाख कोटी रुपये होते, जे २०१५-१६ मध्ये (महागाई पकडून) १३७.७२ लाख कोटी रुपये झाले. म्हणजेच या काळात ५८% ची Nominal जीडीपी वृद्धि झाली.
११/क्ष
परंतु,
सरकारला गणितात अजुन एका ठिकाणी हुशारी नडली. ती म्हणजे सरकारने हिशोबात फक्त ५०० आणि १००० च्या नोटा पकडल्या, बाकीच्या नाही.
१२/क्ष
म्हणजेच, ५८% Nominal जीडीपी वाढीच्या तुलनेत ५६% Nominal नोटा वाढीचा दर योग्य होता.
हेच आरबीआयने सरकारला सांगितले.
१३/क्ष
आपण वरती बघितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील सर्व नोटांचे मुल्य जे मार्च २०१६ ला १६.४२ लाख करोड रुपये होते ते नोटबंदीच्या वेळेला नोव्हेंबर २०१६ ला १७.९७ लाख करोड झाले होते.
१४/क्ष
हेच आरबीआय म्हणाली.
आरबीआय: ४०० कोटींच्या खोटा नोटा हे प्रमाण चलनात असलेल्या सर्व नोटांच्या तुलनेत विचारात घेण्याइतपत नाही.
१५/क्ष
१६/क्ष
२००६-०७ ते २०११-१२ मध्ये प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडींचा अहवाल तपासला असता तर संपूर्ण बेहिशेबी मालमत्तेपैकी फक्त ४.९% या नोटा होत्या.
तेच आरबीआयने मांडले.
१७/क्ष
थोडक्यात सरकारने पुढे केलेल्या कारणांपैकी एकही कारण पुरेसे नव्हते, की ज्याच्यासाठी #नोटबंदी करण्यात यावी हे आरबीआयने स्पष्ट केले होते.
१८/क्ष
म्हणजे सरकारचा निर्णय आधीच आततायीपणाने झाला होता, तो आरबीआयला ऐकवण्यासाठी मिटींग झाली होती, आरबीआयचे ऐकण्यासाठी नाही.
१९/क्ष
म्हणजेच मोदीसरकारने आरबीआयच्या परवानगीचीदेखील वाट नाही बघितली आणि निर्णय झाल्यानंतर आरबीआयच्या हातात परवानगी देण्याव्यतिरिक्त काही नव्हते.
२०/क्ष
बघूयात,
१. #नोटबंदी वेळी १७.९७ लाख करोड चलनात असलेल्या नोटांचे मुल्य या नोटबंदीनंतर नोटांअभावी ते १० लाख करोडच्या खाली गेले, आणि आता २०१९ मध्ये पाहिले तर २१ लाख करोडच्याही पुढे गेले आहे.
२१/क्ष
नवीन आलेल्या संशयास्पद ठेवींची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू असल्याच्या बातमीपलीकडे काही घडले नाही व काही ठोस घडायची अपेक्षापण नाही.
२५/क्ष
म्हणजेच नोटबंदीमुळे किमान ३००० कोटी रुपयांचा चुराडा झाला.
२६/क्ष
निर्णय चुकीचा आहे हे आधी माहीत असूनदेखील गडबडीत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले जाऊ शकतच नाही.
१०५ जीवांचे मोल देऊन तर नाहीच नाही.
क्ष/क्ष
त्यांनी प्रसिद्ध केलेली आरबीआय आणि सरकारमधील त्या नोटबंदी अगोदरच्या मीटिंगची मिनिटे आणि इतर दस्तऐवज यांचा दुवा:
humanrightsinitiative.org/blog/rbi-compe…
१. अनेक वृत्तपत्रांसाठीचे स्तंभलेखक आणि पुस्तकांचे लेखक विवेक कौल यांनी लिहिलेला हा ब्लॉग
vivekkaulpublishing.com/diary-details/…
याव्यतिरिक्त The Print, The Wire, Deccan Herald, Scroll यांच्या लेखांमधून मिळालेल्या माहितीची बरीच मदत झाली.
livemint.com/news/india/des…