Nobody Profile picture
Public Figure
Apr 13, 2021 18 tweets 3 min read
महाराष्ट्रातील कोविड-१९ संसर्गजन्य लोकांचा या रविवारचा आकडा ६३,२९४ होता. शनिवारच्या ५५,४११ पेक्षा रविवारच्या आकड्यांत १४ टक्क्यांनी झालेली वाढ ही काळजाचा ठोका चुकवणारी होती. १/१८ महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १२ कोटी आहे. ४५ वर्षे वयापुढील लोकसंख्या ही साधारण याच्या ३०% म्हणजेच ३.६ कोटी आहे. त्यांच्या पुर्ण लसीकरणासाठी ( प्रत्येकी २ डोसेस) ७.२ कोटी डोसेसची गरज आहे.
आतापर्यंत केंद्राकडून महाराष्ट्राला १ कोटी डोसेस मिळाले आहेत. २/१८
Oct 23, 2019 18 tweets 8 min read
काही महिन्यांपूर्वी Rajasthan Drugs Control Organisation (RDCO) ने J&J कंपनीच्या 'बेबी शॅम्पू' मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे Formaldehyde सापडल्याचे सांगितले.
J&J ने चाचणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उठवल्यावर ते नमुने चाचणीसाठी Central Drugs Laboratory (CDL) ला पाठवले गेले. १/क्ष पुनर्चाचणीनुसार CDL ने नमुन्यांमध्ये Formaldehyde आढळले नसल्याचे (?) अहवालात सांगितले, जे RDCO ला मान्य करावे लागले.
यावर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीचे निवेदन आले,
"जे लोक जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन ची उत्पादने वापरतात त्यांच्या सुरक्षिततेपेक्षा जास्त महत्वाचे कंपनीला काहीही नाही" २/क्ष
May 10, 2019 33 tweets 8 min read
मोदीजी की राहुल गांधीजी..?
निरिक्षणाअंती (सध्या मी इतकेच करतो) मला एक जाणवले की बऱ्याच जणांसाठी ही निवड सोपी होती.
माझ्यासाठी हे आधीही सोपे नव्हते, आताही नाही.
मोदीजी या देशाच्या लोकशाहीला घातक आहेत आणि राहुलजी या देशाला आर्थिकदृष्टय़ा घातक आहेत याची मला खात्री आहे.
१/क्ष आपल्या देशातील लोकांची लोकशाही मुल्यांची समज आणि आपले अज्ञान यांनी एकत्रितपणे आपल्यासमोर हे दोन पर्याय ठेवले. चांगले आणि वाईट यातुन एकाची निवड करावी इतके सोपे हे निश्चितच नव्हते.
आपल्याला दोन वाईटांमधून वेगवेगळ्या कसोट्यांवर जोखून कमीतकमी वाईटाची निवड करायची होती.

असो..!
२/क्ष